दुष्काळात जनावरांची तहान-भूक भागवण्यासाठी‘पद्मश्री ’चा संघर्ष

130 वर गाय-वासरांचा चारा पाण्याचा प्रश्न; व्याकुळलेल्या जीवांना दुष्काळी उपाय योजनांची आस!

दुष्काळात जनावरांची तहान-भूक भागवण्यासाठी‘पद्मश्री ’चा संघर्ष
Published By: Navnath Yeole
Published On:

नवनाथ येवले : मानवते पलिकडे कोणताच धर्म नाही, मुक्या जीवांची सेवा हीच ईश्वर सेवा माणुन वडीलापार्जीत केवळ एका गायी पासून गोसेवेचा वसा घेतला. कर्तव्याला धर्मात महत्व नसले तरी केवळ मुक्या जीवांत ‘अल्ला’ शोधलेल्या शब्बीर सय्यद यांच्या गोवेची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कारने सन्मानीत केले. आयुष्यभराच्या गोसेवेला ‘पद्मश्री ’ सन्मान समपर्तीत करणार्‍या शब्बीर मामूंचा सध्याच्या दुष्काळात 130 लहान मोठ्या गाय- वासरांची तहान, भूक भागवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. दावणीला जनावरांची उपासमार पाहावत नसली तरी, पयाला भिंगरी बांधून शिवार पालथा घालूनही दाटल्या कंठाने जनावरांची तहान- भूक भागत नसल्याचे म्हणत  दुष्काळी उपायी उपाय योजनांवरच मुक्या प्राण्यांचा जीव अवबलंबून असल्याचे सांगणार्‍या पद्मश्री शब्बीर सय्यद यांचे पान्हावलेल्या डोळ्यांतून टपकणारा अश्रू दुष्काळाच्या भीषणतेवरप बरेच काही सांगून जातो. 

शिक्षणाचा लवलेस नसतना गोसेवेला ईश्वर सेवा माणुन वडीलोपार्जीत एक गायीपासून गोसेवेला समर्पीत झालेल्या बीडच्या दहिवंडी (ता. शिरुर कासार) स्थित वयाची पंचहत्तरी पार केलेल्या शब्बीर सय्यद यांनी वडीलोपार्जीत बालवयातच गोसेवेचा वसा घेतला. वडीलोपार्जीत एका गायी पासून सुरु झालेल्या या गोसेेचा वेल आज जेमतेम 130 लहान मोठ्या जनावरांपर्यंत पोहोचला. उभ्या आयुष्यात गाय, वासरांना कधी बाजार दाखवला नाही, गायींच्या चार्‍याची नेहमीच आबळ, त्यामुळे वासरांच्या भुकेपायी कधी गायीचे दुध काढले नाही. चारा-पाण्या अभावी मोकाट सोडून दिलेल्या जनावरांना दावणीची उब देणारे शब्बीर मामूंनी शेकडो शेतकर्‍यांना गायींचे वसरं (नर) शेती कामांसाठी विनामुल्या सोपवले. 

मुक्या प्राण्यांची सेवा हीच आमची ईश्वर सेवा असं ते ठणकावून सांगणारे शब्बीर मामू हातापुरत्या जिरायती शेतजमीनित गाय- वासरांच्या चार्‍यांस उपयुक्त हंगामी शेती पिके घेतात. शब्बीर मामूंच्या या निस्वासर्थ गोसेवेची दखल घेवून केंद्र सरकारने त्यांना 2019 मध्ये पद्मश्री पुरस्कारने सन्मानित केले. पुरस्कार जाहीर होताच पद्मश्री शब्बीर मामूंच्या चेहर्‍यावर हसू खुलले. भारत सरकारने आता एवढा मोठा पुरस्कार दिलाय, नक्किच आता गाय- वासरांच्या तहान भुकेचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार या भोळ्या आशेचे समाधान त्यांनी बोलून दाखवले होते. पण सन्मान हा सन्मानच असतो, सन्मानाने कर्तव्याची उर्जा मिळते, इतरांसाठी तो प्रेरणादायी ठरतो.  ना की समस्या सुटातात.? 

यंदा पासाच्या खंडामुळे खरिपाचे पिक गेलं, रब्बीची पेरणी नाही त्यामुळे हिवाळ्याच्या तोंडावरच जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला. मागील वर्षीच्या चार्‍यावर कसेबसे पुशधन आत्तापर्यंत जगवले मात्र आता चार्‍याची रसद संपल्याने अनेक शेतकरी दावणीच्या जनावरांना बाजार दाखवत आहेत. शब्बीर मामुंच्या जनावरांचा जवळपास दिड महिन्यापासून चारा-पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. सद्यस्थितीत 10 ते 15 किलोमिटर पायपीट करूनही जनावरांची तहान-भूक भागत नसल्याने शब्बीर मामुंच्या 130 जनावरांची दावणीलाच उपासमार सुरू आहे. उगवल्यापासून मावळेपर्यंत शिवार फिरणार्‍या शब्बीर मामू पुढे हिवाळ्याच्या तोंडावरच जनावरं जगवण्यासाठी संघर्षाची वेळ आली आहे. 

vartta033

दावणीला जनावरांची तहान भूक भागावी : सामाजीक कार्यकर्ते, सेवा संस्थांच्या पुढाकारामुळे भक्कम निवार्‍यामुळे उन,वारा, पावसात जनावरांची हेळसांड थांबली असली तरी दुष्काळात चारा पाण्या अभावी दावणीला जनावरांची उपासमार थांबावी एवढी माफक अपेक्षा व्यक्त करत गोसेवक शब्बीर मामूंच्या डोळ्यांच्या कडा पान्हावल्या. प्रशासनाने दुष्काळी उपाय योजनेंतर्गत तातडीने पाण्याचे टँकर, चारा उपलब्ध करून द्यावा, दानशुरांनी पुढे येऊन चारा-पाण्याच्या मदतीचे अवाहन पद्मश्री शब्बी मामुंनी वृत्तमाणसशी बोलताना केले.