राष्ट्रवादीच्या नेत्याने विभागीय समितीसमोर मांडले पुराव्याचे गाठोडं!

बीडच्या शिरुर शहर मतदारयादी प्रकरण: तहसील कार्यालयात मतदारयादीची तपासणी

राष्ट्रवादीच्या नेत्याने विभागीय समितीसमोर मांडले पुराव्याचे गाठोडं!
Published By: Navnath Yeole
Published On:

शिरुर कासार: शहरातील मदारयादीच्या तपासणीसाठी विभागीय आयुक्तांनी नियुक्त केलेले पथक आज तहसील कार्यालयात दाखल झाले. अतिरिक्त विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली पथकाने शहर मतदार यादीची तपासणी करून निष्पक्ष अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या. तक्रारदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी प्रत्यक्ष समितीसमोर पुरावे सादर करत दोषींवर कारवाईची मागणी केली. 

 मतदार पुर्नरचना प्रक्रिया (एसआयआर) द्वारे शहराच्या मतदार यादीत मर्जीतील बाहेरगावच्या लोकांची बोगस कागदपत्रांच्या आधारे नावे समाविष्ठ केल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी केला होता. बोगस कादपत्रांच्या आधारे मर्जीतील, कार्यकर्त्यांची नावे शहर मतदार यादीत समाविष्ठ केल्यावरून महेबुब शेख यांनी एसआयआर प्रक्रियेवर आक्षेप घेत पत्रकार परिषदेत पुरावे सादर केले होते. विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्याकडे प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत तक्रार दाखल केली होती.   नेत्याने च्या माध्यमातून मतदारयादीत बनावट कागदपत्रांच्या आधारे मर्जीतील लोकांची नावे समाविष्ठ केल्याचा आरोप करत एसआयआर प्रक्रियेवर जोरदार आक्षेप घेतला. 

बोगस कागदपत्रांच्या आधारे, यंत्रणेतील मर्जीतल्यांना हाताशी धरून शहराच्या नगरपंचायत निवडणुक प्रक्रियेत मतदानाचा हक्क बजावून पुन्हा ग्रामीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हेराफेरीचा आरोपही महेबुब शेख यांनी पत्रकार परिषदेत केला होता. नगरपंचायतीच्या मागील पंचवर्षीक सार्वत्रिक निवडणुकीत मर्जीतल्या लोकांसह, कार्यकर्ते व त्यांच्या नातेवाईकांची नावे शहर मतदार यादीत समाविष्ठ करून निवडणुक जिंकल्याचा धक्कादायक आरोपही महेबुब शेख यांनी पत्रकार परिषदेत केला होता. 

बीड येथील पत्रकार परिषदे महेबुब शेख यांनी आक्रमकपणे मतदार यादी माध्यमांसमोर मांडून शहराच्या मतदार यादीत बोगस कागदपत्रांच्या आधारे मोजक्या मर्जीतल्या लोकांची नावे समाविष्ठ केल्याचे कथित पुरावे माध्यमांसमोर मांडले. याशिवाय यंत्रणेवर घणाघाती आरोप करत प्रकरणाची निष्पक्ष चौकशीची मागणीही त्यांनी केली होती. बीडमध्ये सर्व काही अलबेल असल्याचं सांगत त्यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे रेशनकार्ड दाखवत खळबळ उडवून दिली होती. 

मतरदार यादी प्रकरणाची निष्पक्ष चौकशीची मागणी करत महेबुब शेख यांनी संपूर्ण एसआयआर प्रक्रियेवर आक्षेपाची तक्रार विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्याकडे केली. त्यानुसार अतिरिक्त विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेली चौकशी समिती शुक्रवारी (दि.27) तहसील कार्यालयात दाखल झाली. अप्पर जिल्हाधिकारी, 2 उप विभागीय अधिकारी, 4 तहसीलदारांचा समितीमध्ये समावेश होता. चौकशी समितीसमोर एसआयआर प्रक्रियेनुसार पुर्नअवलोकन यादी सादर करण्यात आली, ज्यामध्ये तक्रादाराच्या अक्षेपानुसार नावांची तपासणी करण्यात आली. शिवाय मतदार यादीत नावे समाविष्ठ करण्यासाठी लागणार्‍या पुरव्यांचेही अवलोकन करण्यात आले. समितीने प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सुस्पष्ट अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्याची माहिती शेख यांनी दिली. यावेळी महेबुब शेख यांनी समिती समोर कथित पुरावे सादर करत दोषींवर कारवाईची मागणी केली.

Related Posts