इराणचा सर्वात मोठा हल्ला; फुजैराहवर मिसाइल चार मिसाइल डागल्या, हल्ल्यात तीन भारतीय जखमी

मध्यपूर्वेतुन संपूर्ण जगाची झोप उडवणारी घटना समोर आली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा युद्ध भडण्याची शक्यता आहे. इराणने शस्त्रसंधीचे उल्लंघण केले आहे. इराणने युएईवर हल्ला केला आहे. फजैराहमध्ये हा मिसाईल हल्ला झाला आहे. यामुळे परिसरता आग लागली आहे. यामुळे युएईने आपली डिफेन्स सिस्टीम सक्रिय केली आहे. या हल्ल्यात 3 भारतीय जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
फुजैराहमध्ये भीषण आग: इराण कडून झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे फुजैराह येथील पेट्रोलियम औद्यागिक परिसरात भीषण आग लागली आहे. आग नियंत्रणात आणण्याासठी प्रयत्न केले जात आहेत. फुजैराह हा त्या पाईपलाईनचा शेवटचा टोक आहे, ज्याचा वापर यूएईने इराणच्या युद्धाच्या काळात होर्मुझ सामुद्रधुनी मार्गे देत पाठवणे टाळकण्यासाठी केला होता. युएईच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की त्यांची एअर डिफन्स प्रणाली सध्या इराणकडून येणार्या मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यांना प्रत्यूत्तर देत आहे.
मिसाईल आडवल्या..! : संरक्षण मत्रालयाने एक्स वर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘ देशाच्या विविध भागांत ऐकू येणारे आवाज हे एअर डिफेन्स प्रणालीकडून बॅलिस्टिक मिसाइल, क्रूझ मिसाइल आणि ड्रोन हल्ले अडवताना निर्माण होत आहेत. फुजैराह मीडिया कार्यालयानुसार, इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर अमिरातीतील पेट्रोलियम औद्योगिक क्षेत्रात मोठी आग लागली आहे. ही घटना युएईच्या सरंक्षण मंत्रालयाने काही वेळापूर्वी चार मिसाइल डागण्यात आल्याची माहिती दिल्यानंतर घडली. मंंत्ररालयाने दिलेल्या माहितीनुसार इराणकडून चार मिसाइल डागण्यात आले, त्यापैकी तीन अडवण्यात यश आले, तर एक समुद्रात पडली.
युएईकडून अलर्ट जारी : या घटनेनंतर युएईने नवीन मिसाइल अलर्ट जारी केला आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने इशारा दिला आहे की त्यांची एअर डिफेन्स प्रणाली संभाव्य मिसाइल धोक्यात उत्तर देत आहे. याआधी दोन तासांपूर्वीही असाच इशारा देण्यात आला आहे. अशातच आता इराणने युद्धविराम तोड्याचे समोर आले आहे, त्यामुळे आता मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्ध पेण्याची शक्यता आहे. आगामी काळात अमेरिकेकडून इराणवर हल्ले होण्याची शक्यता आहे.



Comments