top of page

एपस्टिन फाइल्सप्रकरणी कल्याणमध्ये काँग्रेसचा चक्का जाम; पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी

कल्याण: सध्या जगभर एपस्टीन फाईल्समुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. भारतातदेखील याचे पडसाद पहायला मिळत आहेत. या प्रकरणावरुन काँग्रेसने भाजपला घेरले आहे. या मुद्यावरुन काँग्रेस आक्रमक भूमिकेत आली असून , कल्याण पश्मिमध्ये युवक काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार आंदोन करण्यात आले. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते एकत्र जमले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्याच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान या आंदोलनात एक कार्यकर्ता तात्या विंचूच्या वेशभूषेत आला होता त्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.


आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांच्या हातात ‘एपस्टीन -मोदी -भाई -भाई’ असे आक्षेपार्ह पोस्टर्स झळकत होते. याचवेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून चक्का जाम करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. आंदोलन उग्र होत असल्याची शक्यता लक्षात घेता बाजारपेठ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये काँग्रेसचे प्रदेश सचिव नवीन सिंग, विधानसभा अध्यक्ष शादाब खान यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.


आंदोलनामध्ये तात्या विंचू आणि गोरिला’: एपस्टीन फाईलमध्ये भारतातील काही दिग्गज लोकांची नावं आली आहेत. यावरुन काँग्रेसने भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. याविषयी काँग्रेसकडून विविध ठिकाणी निदर्शनं सुरु आहेत. कल्याणमधेही काँग्रेसने चक्का जाम आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान सुप्रसिद्ध मराठी चित्रपट ‘ झपाटलेला’ मधील प्रसिद्ध पात्र तात्या विंचू यांच्या वेशभूषेत एक व गोरिलाच्या वेषभूषेत एक आंदोलक दिसून आले त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.


यावेळी आंदोल म्हणाले की, जेव्हा केरला फाईल्स, कश्मीर फाईल्स, बंगाल फाईल्स आले तेव्हा अंधभक्त खूप खूश होते. मात्र मोदींचे नाव एपस्टिन फाईल्समध्ये आल्यावर अंधभक्त का गप्प आहेत.? एपस्टिन फाईल्समध्ये मोदींच्या नावाचा उल्लेख आला आहे. जेफ्री एपस्टिनसोबत त्यांचा काय संबंध आहे? आज देशाची प्रतिमा आणि गरिमा धोक्यात आले. नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, तसेच आजच्या आमच्या आंदोलनात नाचलेले गोरिला आणि तात्या विंचू तुम्हाला कसे वाटले, नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावं किंवा राजीनामा द्याव अशी मागणीही आंदोलकांनी यावेळी केली.

Comments


bottom of page