खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर अंडीफेक; बैठकी दरम्यान मोठा राडा मोईत्रा यांचे भाजप कार्यकर्त्यांवर आरोप
- Navnath Yewale
- 3 hours ago
- 1 min read

पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा तणावपूर्ण निर्माण झाले आहे. विरोधकांवर जोरदार टीका करणार्या आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणार्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर अंडीफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाल्याची चर्चा सुरू झाली असून, या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बुधवारी महुआ मोईत्रा या कोलकत्यातील एका हॉटेलमधील रेस्टॉरंटमध्ये पक्षाच्या काही कार्यकर्त्यांसोबत बैठकीसाठी उपस्थित होत्या. त्याचवेळी काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अंडेफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती तणापूवर्ण झाल्याने महुआ मोईत्रा आणि त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते जवळपास दोन तास हॉटेलमध्येच थांबून राहिल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाची माहिती स्वत: महुआ मोईत्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली. त्यांनी या हल्ल्यामागे भाजप समर्थक असल्याचा अरोप करत संबंधितांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच पश्चिम बंगाल पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.



Comments