top of page

जग हादरलं! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला; व्हाईट हाऊसमध्ये घुसून गोळीबारहल्ल्यावेळी सिक्रेट सर्व्हिस ने तात्काळ सूत्रे हाती घेतली; आरोपीस तत्काळ अटक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्ट्स डिनर’ दरम्यान गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेमुळे राजधानी वॉशिंग्टन डी.सी. मध्ये एकच गोंधळ निर्माण झाला असून जगभरात खळबळ उडाली आहे.


गोळीबाराच्या घटनेनंतर या अतिशय महत्वाच्या कार्यक्रमादरम्यानच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अचानक मंचावरून बाजूला नेण्यात आले आणि एका सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलं आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

वृत्तानुसार, सुरक्षा यंत्रणांच्या कानावर गोळीबाराचा आवाज पडताच, अमेरिकेच्या ‘सीक्रेट सर्व्हिस’ ने तात्काळ सूत्रे हाती घेतली. धोक्याचा इशारा देत ‘ एजंट्सनी ट्रम्प यांना मुंचावरून वेगाने बाजूला केले आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर नेले.

दरम्यान, उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्यही त्यांच्यासोबत उपस्थित होते, त्यांनाही त्याचप्रमाणे तात्काळ एका सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. गोळीबाराच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये गोळीबार ट्रम्प यांच्या अगदी समोर होताना दिसत आहे. गोळीबार अचानक सुरू झाला तेव्हा ट्रम्प मंचावर बसले होते. गोळीबाराचा आवाज येताच सुरक्षा जवानांनी त्यांना तात्काळ घेरले आणि त्यांना टेबलखाली लपवलं.


या डिनरसाठी 2600 जणांना निमंत्रण देण्यात आलं होत. गोळीबारानंतर सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ कारवाईकरत हॉटेल रिकामे केलं. दरम्यान संशयित हल्लेखोराला घटनास्थळी अटक करण्यात आली आहे.


तर या हल्ल्याची माहिती खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून दिली आहे. त्यांनी सांगितले की, “ आज संध्याकाळी डीसीमध्ये खूप धावपळ घडली. सिक्रेट सर्व्हिस आणि सुरक्षा यंत्रणांनी उत्कृष्ट काम केल्याचं पाहायला मिळालं. गोळीबारा दरम्यान त्यांनी मोठे शौर्य आणि चपळाई दाखवली. गोळीबार करणार्‍याला पकडण्यात आलं आहे. मी कार्यक्रम सुरू ठेवण्याची विनंती केली होती, पण पुढील निर्णय पूर्णपणे सुरक्षा यंत्रणांच्या निर्णयावर अवलंबून असतो. मात्र, आजची संध्याकाळ अपेक्षेप्रमाणे नव्हती आणि आम्हाला तो कार्यक्रम पुन्हा आयोजित मकरावा लागेल. असं ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. दरम्यान, या हल्ल्यामागचा उद्देश नेमका काय होता? या बाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Comments


bottom of page