top of page

जगात नव्या युद्धाचा भडका?, उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उनने डागले मिसाईल; जगभरात खळबळ

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. हे युद्ध दिवसेंदिवस चांगलेच भडकत आहे. या युद्धाचा परिणाम भारतासह जगातील अनेक देशांवर झाला आहे. भारतात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. या यद्धामुळे जगाची झोप उडालेली असतानाच आता पुन्हा जगाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने जपानच्या दिशेने क्षेपणास्त्र डागले आहेत. किम जोंग उनच्या या कृत्यानंतर आता दक्षिण कोरियाने समोर येत मोठा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे दक्षिण कोरियाने संभाव्य धोका लक्षात घेता आपल्या सैन्याला सज्ज राहण्यास सांगितले आहे.


किम जोंग उन याची सत्ता असलेल्या उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने क्षेपणास्त्र डागले आहेत. सुरूवातीला हे क्षेपणास्त्र एकच होते, असे सांगितले जात होते. परंतु आता दक्षिण कोरियाच्या दाव्यानुसार उत्तर कोरियाने एक नव्हे तर तब्बल दहा क्षेपणास्त्रे जपानच्या दिशेने डागले आहेत. एकीकडे दक्षिण कोरिया आणि अमूेरिका यांचे लष्कर संयुक्त शस्ताभ्यास करत आहेत. असे असतानराच उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने ही क्षेपणास्त्रे डागली आहेत.


दक्षिण कोरियाच्या जॉइंट चिफ ऑफ स्टाने दिलेल्या माहितीनुसार ही क्षेपणास्त्रे प्योंगयांग या क्षेत्रातून डागण्यात आली आहेत. परंतु ही क्षेपणास्त्रे नेमकी किती दूर गेली, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. दुसरीकडे जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही क्षेपणास्त्रे विशेष आर्थिक क्षेत्राच्या बाहेर समुद्रात डागण्यात आली. उत्तर कारियाच्या या कृत्यानंतर आता दक्षिण कोरियाने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे.


दरम्यान, दक्षिण कोरियाने आपल्या सैनिकांना सीमेवर पाहारा वाढवण्यास सांगितले आहे. तसेच भविष्यकालीन संभाव्य हल्ल्यांना लक्षात घेऊन लष्कराला सज्ज राहण्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती अमेरिका आणि जपानला देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Comments


bottom of page