जामनेरमध्ये बीडची पुनरावृत्ती, मॉबलिंचिंग प्रकरणात पोलिसांवर गंभीर आरोप
- Navnath Yewale
- 5 days ago
- 2 min read
जामनेर येथे अल्पसंख्यांक समाजातील युवकांची मॉबलिंचिंग करून हत्या झाली. या प्रकरणावरून आता वातावरण तापू लागले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांनी याबाबत कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

जामनेर येथील मॉबलिंचिंग प्रकरण हे दिसते तेवढे सोपे नाही. यामध्ये मोठे षडयंत्र असून त्यात अनेक मोठे मासे अद्यापही पोलिसांच्या तपासापासून दूर आहेत. त्यांना सध्याचे पालिस संरक्षण तर देत नाही ना? असे अविश्वासाचे वातावरण जामनेर शहरातील नगारिकांमध्ये असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
गेल्या आठवड्यात जामनेर (जळगाव) येथे अल्पसंख्यांक समाजातील युवकाची जमावाकडून हत्या करण्यात आली. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यानिमित्ताने पोलिसांनी कारवाई देखील वादाचा विषय बनली आहे. त्यामध्ये विरोधकांनी राज्य शासनावर गंभीर आरोप केले आहेत.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर जामनेर येथील जमावाकडून झालेली हत्या हा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था मोडकळीस आल्याचे प्रतीक असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रकरण म्हणजे बीड येथील संतोष देशमुख हत्याप्रकरणासारखेच गंभीर असल्याचा दावाही त्यांनी केला.
जामनेर येथून संबंधित युवकाला जमावाने मारत मारत दुसर्या गावी नेले. त्याची नखे काढण्यात आली. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. त्याच्या कुटुंबीयांनाही धमकावण्यात आले आहे. हे सगळे घडत असताना पोलिसांनी काय कारवाई केली हा नागरिकांमध्ये संताप निर्माण करणारा प्रश्न आहे.
या संदर्भात हत्या झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांनी दोन दिवसापूर्वी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी विचारणा केली.
यावेळी संबंधित तपास करणार्या पोलिस अधिकार्यांनी अतिशय दर्जाची वर्तणूक केली. पिढी त्यांना अतिशय अवमानजनक भाषेत उत्तरे देण्यात आली. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळाच वास येऊ लागल्याचे सपकाळ म्हणाले. प्रकरणाची चौकशी करणार्या पोलिसांकडून हा तपास काढून घेण्यात यावा. एसआयटी पथक नेमून निष्पक्षपणे मॉब लिंचिंग प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. आयएएस अथवा आयपीएस दर्जाच्या अधिकार्याकडून हा तपास केला जावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
जामनेर येथील घटना ही सामान्य हत्या किंवा केवळ मॉबलिंगचिंग नव्हे तर यामध्ये मोठे षडयंत्र असल्याचा संशय आहे. सध्या टक करण्यात आलेली आरोपी त्यापेक्षाही त्यांच्या मागे असलेले आणि षडयंत्र रचणारे कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे. त्यातील मोठे मासे जाळ्यात सापडत नाहीत तोवर या प्रकरणाचा निष्पक्ष तपास झाला असे म्हणता येणार नाही. असे सपकाळ यावेळी म्हणाले.
Commentaires