top of page

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ; थलपती विजय यांना जबर धक्का, राज्यपालांचं नियमावर बोट

तामिळनाडू राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुक निकालात अवघ्या एक वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात उद्य झालेल्या थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूमधील प्रस्तापीत पक्षांना मोठा धक्का दिला आहे. तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके आणि डीएमके सारख्या पक्षांचा पराभव झाला आहे.


थलपती विजय यांचा पक्ष असलेल्या टीव्हीकेला तामिळनाडूमध्ये तब्बल 107 जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने देखील टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता टीव्हीकेकडे 112 एवढं संख्याबळ आहे. मात्र तरी देखील थलपती विजय बहुमतापासून अजूनही साहा जागा दूर आहेत. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता हालचालींना वेग आला आहे. थलपती विजय यांनी आज राज्यापालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.


राज्यपालांना 107 टीव्हीकेचे आमदार आणि 5 काँग्रेसचे आमदार अशा एकूण 112 आमदारांच्या सहीचं पत्र दिलं आहे. मात्र तामिळनाडूमध्ये जर कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करायची असेल तर 118 सदस्यांची गरज आहे. त्यामुळे राज्यपालांनी थलपती विजय यांना 118 आमदारांच्या सहीचं पत्र सादर करण्यास सांगितलं आहे. यावर आता थलपती विजय यांनी राज्यपालांकडून सत्तास्थापनेसाठी संख्याबळ पूर्ण करण्यासाठी एआयएडीएमकेचा पाठिंबा विचारात आहेत, मात्र सध्या तरी त्यांनी या पक्षाला होल्डर ठेवलं आहे. त्यामुळे आता थलपती विजय सत्ता स्थापन करण्यासाठी आमदाराची जुळवाजुळव कशी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


दरम्यान, या निवडणुकीत सर्वात जास्त फटका हा स्ताधारी डीएमकेला बसला आहे. डीएमकेला या निवडणुकीत तब्बल 74 जागांचा फटका बसला आहे. डीएमकेला या निवडणुकीत फक्त 59 जागाच मिळवता आल्या आहेत. मुख्यमंत्री स्टॅलीन यांचा देखील पराभव झाला आहे. तर दुसरीकडे एका वर्षापूर्वीच एन्ट्री झालेल्या टीव्हीकेनं तामिळनाडूमध्ये मोठा चमत्कार घडवून आणला आहे. टीव्हीकेला या निवडणुकीत तब्बल 107 जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे टीव्हीकेकडून राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र तरी देखील त्यांना अजूनही 8 आमदारांची गरज आहे. आता हा आकडा टीव्हीके कसा जुळवणार हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Comments


bottom of page