तोतया आयएएस महिलेचा बनावटकागपत्रांच्या आधारे पंचतारांकीत हॉटेलमध्ये मुक्काम
- Navnath Yewale
- 4 days ago
- 2 min read
अफगाणिस्तानी बॉयफ्रेंड सात वर्षापासून भारतातच; बँक खात्यांमधून 32 लाखांचा व्यवहार

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरातील जालना रोडवली एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शहरातील एका महिनेने तब्बल सहा महिने बनावट कागदपत्रांच्या आधारे मुक्काम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिडको पोलिसांनी संशयाच्या आधारे कारवाई करत हॉटेलमधील त्या महिलेच्या रूमची झडती घेतली असता महिलेच्या बॅगेत 2017 च्या यूपीएससी निवड यादीची प्रत अढळली, ज्यात तिने तिचे नाव 333 व्या क्रमांकावर होते. आधार कार्डवरही खाडाखोड केल्याचे स्पष्ट झाले.
चौकशीत तिच्या खात्यात अफगणिस्तानातील बॉयफ्रेंड अशरफ खलील व पाकिस्तानातील त्याचा भाऊ आवेद यांच्या खात्यातून मोठ्या रकमा आल्याचे समोर आले. दोघांचे पासपोर्ट, व्हिसा आणि भारतात येण्याच्या अर्जाचे फोटोही तिच्या मोबाईलमध्ये आढळून आले आहेत. संपूर्ण प्रकरण अत्यंत संशयास्पद ठरल्याने एटीएस व आयबीकडून महिलेची कसून चौकशी सुरू आहे. या महिलेचे नाव कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय 45) ही महिला तब्बल सहा महिन्यांपासून जालना रोडवरील अॅम्बेसेडर या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत असल्याचं उघड झालं आहे.
सुकामेवा व्यवसायाचे कारण पुढे करत सात वर्षापासून भारतात: या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, जालना रोडवरील एका पंचातारांकित हॉटेलमध्ये बनावट कागदपत्रांसह सहा महिन्यांपासून मुक्काम ठोकणार्या या 45 वर्षीय कल्पना भागवत (रा.चिनार गार्डन, पडेगाव) या महिलेची केंद्रीय गुप्तचर यंत्रणांसह राज्य गुप्तचर विभागाकडून सध्या कसून चौकशी सुरू आहे. सात वर्षापासून सुकामेवा व्यवसायाचे कारण पुढे करून भारतात राहणार्या तिच्या प्रियकराशी तिची एसएफएस शाळेच्या मैदानावर ओळख झाली होती. तेव्हा कल्पानाने लॉबिस्ट, लायजनिंगचे काम करत असल्याचे सांगून संवाद वाढवला होता.
दरम्यान सहा महिन्यांपासून एका पंचतारांकित हॉटेलमध्ये संशयास्पद वास्तव्य करणार्या कल्पना भागवतला पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी केंद्रीय गुप्तचर यंत्रणांसोबत राज्य गुप्त वार्ता विभागाने काल (मंगळवारी) तिची 3 तास चौकशी केली. त्यातही तिने लायजनिंगचे काम करत असल्याची माहिती दिली आहे. त्यासाइी तिने बनावट कागदपत्रे तयार केल्याचे सांगितले आहे. आज (बुधवारी ) तिची पोलिस कोठडी संपत आहे. न्यायालयात हजर करून तिची वाढीव पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
कल्पानाने केलेल्या प्रत्येक आर्थिक व्यवहाराच्या माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी बँकेला पत्र पाठवले होते. यात 32 लाखांच्या व्यवहाराची माहिती समोर आली आहे. मात्र, यातील एक खाते बद झाल्याचे दिसून आले. हे कधी व का बंद झाले, यााचा तपास पोलिस करत आहेत.
प्रियकर निघाला ड्राय फ्रूटचा व्यवसायिक: मूळ अफगाणिस्तानचा असलेला कल्पनाचा प्रियकर सात वर्षापासून देशात वास्तव्यास आहे. ड्राय फ्रूटचा व्यवसायिक: मूळ अफगाणिस्तानचा असलेला कल्पनाचा प्रियकर सात वर्षापासून देशात वास्तव्यास आहे. ड्राय फ्रूटचा व्यवसाय करत असून तो सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे. त्याला भेटण्यासाठी ती कायम विमानाने दिल्लीला जात होती. दिल्लीशिवाय ती उदयपूर, जयपूरलाही सातत्याने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
कल्पना भागवत हिचे पोलिस तपासादरम्यान समोर आलेले कारणामे: कल्पना भागवत जयपूर दिल्लीला सातत्याने गेल्याचे समोर आलं आहे, ती दिल्लीच्या पावर मिनिस्ट्रीमध्येही अनेकांना भेटली. गृह विभागातही अनेकांना भेटल्याचा तिचा दावा आहे, ज्यांना व्हिजा मिळत नाही त्यांना व्हीजा मिळून देण्याचं ती अश्वासन देते, मोठ्या बदल्याचं काम करण्याचं अश्वसान देखील ती देते, पुण्यातील एका माजी कुलगुरूचं ही बेस्ट आयएस अधिकारी, सामाजिक काम असल्याचे सर्टिफिकेट तिच्याकडे आहे.
तिने ते बनवलं का खरोखर दिल याचा पोलिस तपास करत आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये ती राहत होती. तिचा मित्र अफगाणचा आहे, तो तिच्यापेक्षा दहा वर्षानी लहान आहे. सदरील मित्राची आई आणि भाऊ पाकिस्तानमध्ये राहतो या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना भेटल्याचा तिचा दावा आहे. प्रति दिवस सात हजार रुपये भाडं असलेल्या शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सहा महिन्यांपासून आईसोबत वास्तव्यास होती.



Comments