नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत महायुतीची मुसंडी
- Navnath Yewale
- Dec 21, 2025
- 5 min read

राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचयातीच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. विधानसभेनंतर पुन्हा एकदा नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीनं जोरदार मुसंडी मारत बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी काही ठिकाणी विजय मिळवला आहे.
समोर आलेल्या निकालात सध्यातरी महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचाच बोलबाला दिसून येत आहे. एकीकडे या विजयानंतर महायुतीकडून जल्लोष साजरा केला जात असताना माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र हा पक्षावरच आगपाखड केली आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत:च्याच पक्षालाच खडेबोल सुनावले आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडुणुकीत भाजपहा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, विदर्भात मात्र पक्षाला मोठा फटका बसला आहे. त्यात 11 पैकी अनेक नगरपरिषदा भाजपने गमावल्या असल्याचं निकालातून समोर येत आहे. भाजपच्या या विदर्भातील निराशाजनक कामगिरीनंतर मुनगंटीवार यांचा पारा चढला आहे.
मुनगंटीवार म्हणाले, विदर्भातील गडचिरोली भंडारा, गोंदिया या चारही जिल्ह्यातील एकाही नेत्याला मंत्री केलेले नाही. काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांना महाराष्ट्राचा नेता केलं. पण भाजपाने मला तर मंत्रिपद दिलंच नाही, पण चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यांजून कोणालाही मंत्रिपद दिलं नाही. शिवाय आम्ही बाहेरच्या लोकांना पक्षात प्रवेश देतोय. त्याचा परिणाम नक्कीच मतदारांवर झाल्याची कबुलीही माजी मंत्री मुनगंटीवार यांनी दिली आहे. तसेच पक्षानं माझी शक्तीच हिरावली असं म्हणत चंद्रपुरात गटबाजीसाठी पोषक वातावरण तयार केल्याचा आरोपही केला.
चंद्रपूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांपैकी 7 नगरपरिषदांवर काँग्रेसनं नगराध्यक्षपद खेचून आणलं आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 1 तर भाजपनं दोन नगराध्यक्षपद मिळवलं आहे. विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती अद्याप झाली नसली तरी भाजपचे सुधीर मुनगंटीवार सध्या विरोधी पक्ष नेत्याप्रमाणेच आपल्याच सरकारला धारेवर धरताना दिसून येत आहे.
तर दुसरीकडे माजी मंत्री सुनील केदारांनाही स्थानिकच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. विधानसभेला सावनेर विधानसभा मतदारासंघातील पत्नीच्या पराभवानंतर आता चारपैकी तीन परिषदा त्यांच्या हातून निसटल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे सुनील केदरांनी सर्व पदाधिकार्यांचा विरोध झुगारून नगराध्यक्षपदासाठी निवडलेले सर्वच उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यांचे नेतृत्व व निर्णयावरही शंका घेतली जात असून ही केदारांसाठी मोठा धक्का आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत मात केदारांनी एकहाती काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांना निवडूण आणले होते. त्यामुळे त्यांचे पक्षात चांगलेच वजन वाढले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर केदारांनी नागपूर जिल्ह्यातील सर्व सूत्रे आपल्या हाती घेतले होते. मात्र, अति धाडस करणे त्यांच्या अंगलट आले. नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्यात दोषी ठरल्यानंतर सुनील केदार यांना निवडणुक लढवता आली नव्हती. ते सावनेरमधून चारवेळा आमदार म्हणून निवडूण आले आहेत. पण आता नगरपरिषदा गमावण्याची वेळ आली आहे.
बदलापूर नगरपरिषद : शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त, भाजपचा मोठा विजय
कुळगाव बदलापुर नगरपरिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या विणा वामण म्हात्रे व भाजपच्या रुचिता घोडपडे यांच्यात सरळ लढत झाली. यामध्ये भाजपच्या रुचिता घोरपडे यांनी विजय मिळवला. शिवा, भाजप 23, शिवसेना 23 या दोन्ही पक्षांनी समान जागा मिळवल्या यामध्ये राष्ट्रवादीलाही 3 जागांवर विजय मिळवता आला.
अंबड नगरपपालिकेमध्ये माजी मंत्री राजेश टोपे यांना धक्का : अंबड नगरपालिकेमध्ये माजी मंत्री शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांना धक्का बसला असून नगरपालिकेवर भापचा झेंडा फडकला आहे. परंपरेने महाविकास आघाडीच वर्चस्व असलेल्या नगपालिकेवर भाजप आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वात भाजपला मोठा विजय मिळाला आहे. भाजपच्या देवयाणी कुलकर्णी यांचा विजय झाला असून त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा 5 हजार 900 मतांनी परभव केला आहे.
गडचिरोलीवर भाजपचे वर्चस्व : गडचिरोली नगरपरिषदेवर भाजपाने वर्चस्व कायम ठेवले आहे. येथे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणोती निंबोरकर- भांडेकर यांचा 4 हजार 952 मतांनी विजय झाला.
उदगीर नगरपरिषदवेर महायुतीचा विजय : उदगीर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारत नगरपरिषदेवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीने 40 पैकी तब्बल 33 जागांवर विजय मिळवत विरोधकांचा पूर्णपणे पराभव केला आहे. उदगीर नगरपरिषदेसाठी 40 सदस्य आणि एका नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणुक झाली या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 20 जागा तर भाजपाने 13 जागांवर विजय मिळवत महायुतील स्पष्ट बहुमत मिळवून दिले.
काँग्रेसच्या गड शिवसेना (शिंदे गट) ने हिरावला: काँग्रेसचा गड असलेल्या कळमनुरी नगरपालिकेत संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा विजय झाला आहे. बांगर यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या वैभव चौधरी यांची पत्नी आश्लेषा चौधरी 1300 मतांनी विजयी झाल्या आहेत. संतोष बांगर त्यांची प्रतिष्ठा राखण्यात यशस्वी झाले आहेत. विजयी उमेदवार आश्लेशा चौधरी यांचा विजय झाला आहे.
पंढरपूर नगर परिषदेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिता भालके विजयी
पंढरपूर नगर परिषदेतचे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार प्रतिणा भालके विजयी, जवळपास 11500 मतांनी प्रणिता भालके यांचा विजय झाला आहे. पंढरपूर आणि मंगळवेडा नगरपालिकेवर तीर्थक्षेत्र विकास आघाडीने नगराध्यपदावर दणदणीत विजय मिळविल्यांनतर, पंढरपूरच्या नगराध्यि डॉ. प्रणिता भालके आणि मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा सनंदा अवताडे यांचे एकच हारात सत्कार करण्यात आला.
जामखेड नगरपरिषदेत राम शिंदे च्या नेतृत्वाखाली भाजपाचा विजय : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या आहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगरपरिषदेमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत 15 जागा आणि नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला आहे या विजयानंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टिकास्त्र सोडले. नगरपरिषद निवडणुकीत आमच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले मात्र जामखेडच्या मतदारांनी आच्या बाजूने कौल दिला आहे. अशाच पद्धतीने येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना (शिंदे) गटाने शेवगाचा गड काबीज केला : आहिल्यानगर शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या माया मुंडे नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. माया मुंडे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. माया मुंडे भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या पत्नी आहेत. भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवून माया मुंडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विद्या लांडे यांचा 86 मतांनी पराभव केला आहे. शेवगाव नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवारगट अशी चौरंग लढत झाली. यात भाजप तिसर्या क्रमांकवर राहिला असून अजित पवार गटाच्या उमेदवाराला दुसर्या क्रमांकाचे मतं मिळाली.
क्षीरसागारांच्या बालेकिल्याला सुरूंग: बीड नगरपरिषदेवर गेल्या 35 वर्षापासून क्षीरसागरांचे वर्चस्व राहिले आहे. विषेश म्हणजे येथेे आद्यापर्यंत भाजपला एकूण जागांवर उमेदवार उभे करता आलेले नाहीत. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप अशी तिरंगी लढत पाहावयास मिळाली. डॉ. योगेश क्षीरसागर यांनी ऐन वेळी राष्ट्रवादी( अजित पवार गट) पक्षातून भाजपात प्रवेश केला. त्यामुळे बीड नगरपरिषदेची राजकीय समिकरणं बदलली. भाजपाने सर्व जागांवर उमेदवार उभे केले मात्र, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजपमधील मतांचे धु्रूवीकरण राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पथ्यावर पडले आणि मागील 35 वर्षाच्या परंपरेला छेद मिळून नगरपरिषदेवर आमदार विजयसिंह राजे पंडित यांच्या नेतृत्वात प्रेमलता पारवे यांचा 3779 मतांनी विजय झाला. कधीकाळी अवघ्या दोन नगरसेवकांवरील भाजपला या निवडणुकीत तब्बल 15 जागांवर यश मिळाले, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 19, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 11. शिवसेना (उबाठा) 1, शिवसेना शिंदे गट 3, एमआयएम 2, काँग्रेसला 1 जागेवर विजय मिळाला आहे.
परळीत नगरपरिषदेवर धनंजय मुंडे यांचे निर्वीवाद वर्चस्व
परळी नगरपरिषदेवर आमदार धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांचा 15662 मतांनी विजय झाला.
रेनापूर नगरपरिषदेवर भाजपची परंपरा कायम : रेनापूर नगरपंचायत निवडणुक अतिशय चुरशीची ठरली. नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून येथे भाजपचीच सत्ता आहे. ही परंपरा यानिवडणुकीतही कायम राहिली. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा आकनगिरे यांनी 2 276 मतांनी विजय मिळवला.
पुण्यात ‘दादा’ चीच हवा : जिल्ह्यात 17 महत्वांच्या जागांपैकी तब्बल 10 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. यामध्ये 9 नगराध्यक्ष आणि 1 युतीचा उमेदवार निवडून आला आहे. उमेदवार निडणून आला आहे. 2017 मध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले होते, मात्र या निवडणुकीत अजित पवारांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन करत जिल्ह्यावर आपली पकड पुन्हा घट्ट केली आहे. दरम्यान महायुतीमध्ये असूनही या निवडणुकीत तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे नशीब आजमावले होते. मात्र, भाजप आणि शिसेनेला (शिंदे गट) राष्ट्रवादीच्या झंझावातासमोर मर्यादित यश मिळाले आहे.
जिल्ह्यात जाहीर झालेल्या निकालानुसार शिवसेना (शिदे गट): 4 जागांवर समाधान मानवे लागले यामध्ये जुन्नर, चाकण, राजगुरूनगर, मंचर चा समावेश आहे. भाजप : केवळ 3 ठिकाणीच कमळ फुलवता आले यामध्ये सासवड, आळंदी, तळेगाव
माळेगाव नगरपंचायतीत अपक्ष जयश्री तावरे यांनी बाजी मारत सर्वांचे लक्ष वेधले आहे.



Comments