पंतप्रधान मोदींची घोषणा ; भारत रशियन नागरिकांना देणार 30 दिवसांचा मोफत ई-टूरिस्ट व्हिसा
- Navnath Yewale
- 2 days ago
- 3 min read

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौर्यावर आले आहेत. रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धादरम्यान त्यांचा हा दौरा जागतिक राजनैतिक संबंधांसाठी महत्वाचा आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन शसंख्शस द्विपक्षीय चर्चा देखील हैदराबाद हाऊस येथे होणार आहे. शिवाय संरक्षण आणि इतर क्षेत्रांसह भारज- रशिया भागीदारीचा एक नवा अध्याय देखील सुरू होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या दिल्लीत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेने भारत- रशिया संबंधांमध्ये एक नवीन वळण घेतले. पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी घोषणा केली की, रशियन नागरिकांना आता भारत भेट देण्यासाठी 30 दिवसांचा मोफत ई-टूरिस्ट व्हिसा मिळेल. दोन्ही देशांमधील लोकांमध्ये संपर्क वाढवण्याच्या आणि संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे.
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौर्यावर संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष आहे. पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरुन ही भेट होत आहे. संरक्षण सहकार्य आणि व्यापारावर लक्ष केंद्रित केले जाईल आणि अनेक महत्वाच्या द्विपक्षीय भागीदारी स्थापित केल्या जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यातील शिखर परिषदेत विविध मुद्यांवर चर्चा केली जाईल. आरटी इंडिया चॅनेल देखील सुरू केले जाईल. युक्रेनशी सुरू असलेल्या युद्धानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. रशिया सध्या अनेक जागतिक निर्बंधांना तोंड देत आहे. यावेळी, भारतासोबतचे मजबूत संबंध जागतिक राजनैतिकतेचा एक महत्वाचा अध्याय बनू शकतात.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन म्हणाले की, “ रशियन प्रतिनिधी मंडळाचे उबदार आणि आदरातिथ्यपूर्ण स्वागत केल्याबद्दल मी भारतीय राष्ट्रपती द्रौपती मुर्मू आणि आमच्या सर्व भारतीय सहकार्यांचे आभार मानतो.. काल त्यांच्या निवास्थानी आयोजित केलेल्या रात्रीच्या जेवणाबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो.”
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत आणि रशिया दीर्घकाळापासून एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि क्रोकस सिटी हॉलवरील भ्याड हल्ल्याचा संदर्भ देत ते म्हणाले की या सर्व कृत्यांचे कूळ एकच आहे. दहशतवाद हा मानवतेच्या मूल्यांवर थेट हल्ला आहे आणि त्याविरुद्ध जागतिक एकता ही अपली सर्वात मोठी ताकद आहे. यावर भारताचा अढळ विश्वास पंतप्रधान मोदींनी पुन्हा व्यक्त केला. ते म्हणाले की भारत आणि रशिया संयुक्त राष्ट्रे, जी 20, ब्रिक्स, एससीओ आणि इतर व्यासपीठांवर एकत्र काम करतात आणि या सर्व व्यासपीठांवर त्यांचे संवाद आणि सहकार्य सुरू ठेवतील.
दरम्यान राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे स्वागत करतान प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, त्यांचा दौरा ऐतिहासिक आहे आणि त्याचे अनेक परिणाम आहेत. 2001 मध्ये पुतिन यांच्या पहिल्या भारत भेटीने, ज्याला आता 25 वर्षे झाली आहेत, धोरणात्मक भागीदारीचा मजबूत पाया रचला होता याची आठवण त्यांनी करून दिली. मोदींनी पुतिन यांचे वर्णन भारत-रशिया संबंधांना नवीन उंचीवर नेणार्या दूरदर्शी नेत्याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणून केले.
हैदराबाद हाऊस येथे पुतिन यांच्याशी झालेल्या भेटीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगाने कोविड-19 पासून आतापर्यंत अनेक संकटांचा सामना केला आहे. त्यांनी भारत आणि रशियामधील मजबूत भागीदारीची नोंद घेतली आणि जागतिक आव्हानंतर लवकरच मात केली जाईल अशी अशा व्यक्त केली. पंतप्रधान मोदी असेही म्हणाले की, “ मला विश्वास आहे की आज आपण अनेक महत्वाच्या जागतिक मुद्यांवर चर्चा करू. भारत आणि रशियामधील आर्थिक संबंध अधिक मजबूत केले पाहिजेत. या दोन्ही देशांमध्ये एकत्र नवीन उंची गाठण्याची क्षमता आहे. आपण अशा आशावादी दृष्टिकोनासह आपली भेट पुढे नेऊ.” हा एक दृढ विश्वास आहे.
पुतिन याचा हा दौरा भारत- रशिया धोरनात्मक भागीदारीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त होत आहे. ऑक्टोबर 2000 मध्ये सुरू झालेली ही भागीदारी डिसेंबर 2010 मध्ये “ विशेष आणि विशेषधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी” म्हणून वाढवण्यात आली. भारत आणि रशियाचा वैद्यकीय, पायाभूत सुविधा आणि सांस्कृतिक भागीदारीसह लष्करी सहकार्याचा दिर्घ इतिहास आहे. दोन्ही देशांमधील ही भागीदारी ऐतिहासिक आहे आणि त्यात अनेक महत्वाचे टप्पे जोडले जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर राष्ट्रध्यक्ष पुतिन यांचे वैयक्तिकरित्या स्वागत केले. त्यांनी भारताच्या दीर्घकालीन मित्राच्या राष्ट्रमुखांना मिठी मारली आणि दोन्ही नेते एकाच गाडीतून निघून गेले. रशियाच्या राष्ट्रध्यक्षांनी भारताला एक विश्वासू आणि दीर्घकालीन मित्र म्हणूनही वर्णण केले आणि म्हटले की दोन्ही देशांमधील मैत्री जागतिक राजनैतिकतेच्या पलीकडे आहे. भारतात पुतिन यांचे भव्य स्वागत होत आहे आणि दोन्ही देशांमधील महत्वाची भागीदारी येत्या काळात जागतिक रणनीती निश्चित करेल.



Comments