top of page

पुणे महापालिकेला जानेवारीमध्ये तर मुंबईला फेब्रूवारीत मिळणार महापौर


पुणे : राज्यातील सर्व महापालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यासाठी राज्य सरकारने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, महापालिकांकडून महापौर-उपमहापौर निवड आणि नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सभा घेण्याची तांत्रिक तयारी सुरू झाली आहे.


महापालिकेच्या विभागाकडून शुक्रवारी (दि.23) विभागीय आयुक्तांना यासंदर्भात पत्र पाठविले गेले. विभागीय आयुक्तांकडून दोन दिवसांत पहिल्या सभेची तारीख आणि पीठासीन अधिकार्‍याची नियुक्तीची माहिती महापालिकेला कळविली जाणार आहे.


राज्य सरकारच्या कार्यक्रमानुसार, 26 जानेवारीनंतरच्या दोन दिवसांत म्हणजेच 27-28 जानेवारीला महानपौर-उपमहापौर पदासाठी इच्छुक सदस्यांनी नामनिर्देशनपत्र सादर करावले लागणार आहेत. त्यानंतर 30 किंवा 31 जानेवारी रोजी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन महापौर आणि उपमहापौरांची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.


दरम्यान महापालिका निवडणुकीचा निकला लागल्यानंतर गुरुवारी महापौर पदासाठीचे आरक्षण जाहीर झाले. पुणे महापालिकेसह अनेक ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे पुणे महापालिकेत भाजपकडून महिला उमेदवारांची नावे चर्चेत आहेत.


मुंबईचा महापौर फेब्रूवारीमध्ये : यंदा राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका एकाच वेळी झाल्याने सर्व सभागृहे एकाच दिवसी अस्तित्वात आली. नगरविकास विभागाने मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी एकत्रित कार्यक्रम आखला आहे, ज्यामुळे कारभारात सुसूत्रता येईल. मात्र, कमी कालावधीत नामनिर्देशन, अर्ज तपासणी, सभा तयारी, नवनिर्वाचित सदस्यांना नोटीस, पासेस इत्यादी कामांसाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तरीही विभागीय आयुक्तांकडून पीठासीन अधिकार्‍याची नियुक्ती झाल्यानंतर निश्चित होईल आणि फेब्रूवारीच्या सुरुवातील शहरांना नवे महापौर मिळण्याची शक्यता आहे.

Comments


bottom of page