top of page

भाजपकडून विधानपरिषदेच्या 11 जागांवरील उमेदवार्‍या जाहीर

मुुबई: भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 11 जागांवर आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात धाराशिव, लातूर, बीडमधून बसवराज पाटील, आहिल्यानगरमध्यून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भंडारा- गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राम्हणकर, अमरावतीतून प्रविण पोटे पाईल यांना उमेदवारी जाहिर झाली आहे. तसेच जळगावमधून नंदकिशोर महाजन आणि नागपूरमधून डॉ. रजीव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे सर्व उमेदवार आता उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.


भाजपकडून यांना उमेदवारी : वर्धा- चंद्रपूर- गडचिरोली- अरुण लखानी, भंराडा-गोंदिया- अवनिाश ब्राम्हणकर, अमरावती - प्रविण पोटे पाटील, सांगली- सातारा- धर्यशील कदम, सोलापूर- राजेंद्र राऊत, अहिल्यानगर -प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर-जालना - सुहास शिरसाट, नांदेड -अमर राजुरकर, धारशिव- लातूर- बीड- बसवराज पाटील, जळगाव- नंदकिशोर महाजन, नागपूर- डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवरी जाहिर झाली आहे.


दरम्यान भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी कोणाला संधी मिळणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती.उमेदवारी निश्ति करण्यासाठी अनेक बैठकाही झाल्या होत्या. राज्यात झालेल्या बैठकांमध्ये 48 जणांची नावे अंतिम करण्यात आली होती. या 48 नावांची यादी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे सोपवली होती. त्यानंतर आज दिल्लीत भाजपची महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर आज रात्रीया नावांची घोषणा करण्यात आली आहे.


भाजपने विधानपरिषदेसाठी 11 उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर- जालना मतदारसंघ भाजपकडे आला आहे. ही जागा आपल्याकडे यासाठी कार्यकत्यांना आग्रह केला होता. भाजपचे संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष सुहरास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. तसेच सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणी यांनाही वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच अलिकडेच भाजपमध्ये सामील झालेले प्राजक्त तनपुरे यांना आहिल्यानगरमधून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच सोलापूरमधून राजेंद्र राऊत यांच्यावर पक्षाने विश्वास टाकला आहे. आता हे सर्व उमेदवार उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Comments


bottom of page