top of page

भारतीय महिलेची अमेरिकेत निर्घुण हत्या; मृतदेह घरी सोडून आरोपी भारतात फरार


अमेरिकेत नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान, एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 27 वर्षीय भारतीय महिला गोडिशा हिची निर्घुण हत्या करण्यात आली. मेरीलँडमधील एलिकॉट सिटीमध्ये डेटा आणि स्ट्रॅटेजी विश्लेषक निकिता हिचा तिच्या माजी प्रियकराच्या अपार्टमेंटमध्ये मृतदेह आढळला. तिच्या शरीरावर चाकूच्या अनेक खोल जखमा आढळल्या. धक्कादायक म्हणजे, आरोपीने हत्येनंतर पोलिसांची दिशाभूल केली आणि संधी मिळताच भारतात पळून आला. या घटनेने भारतीय समुदायाला धक्का बसला आहे.


निकिता गोडिशा मूळची भारतातील होती आणि अमेरिकेतील मेरीलँडमध्ये डेटा आणि स्ट्रॅटेजी विश्लेषक म्हणून यशस्वी कारकीर्द करत होती. पोलिसांच्या अहवालानुसार, ती 32 डिसेंबरच्या संध्याकाळपासून बेपत्ता होती. नवीन वर्षाच्या उत्सवात ती दिसली नाही, तेव्हा तिचा शोध सुरू झाला. अखेर 3 जानेवारी रोजी, तिचा मृतदेह तिचा माजी प्रियकर अर्जुन शर्माच्या अपार्टमेंटमधून सापडला. निकिताच्या हत्येमुळे एका आशादायक कारकिर्दीचा आणि तरुण आयुष्याचा दु:खद अंत झाला.


या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी अर्जुन शर्माचे वर्तन, निकिताची हत्या केल्यानंतर, अर्जुनने स्वत:चे रक्षण करण्यासाठी 2 जानेवारी रोजी पोलिसांकडे बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली. त्याने दावा केला की, त्याने निकिताला शेवटचे 31 डिसेंबर रेाजी पाहिले होे.पोलिसांना दिशाळूल करण्यासाठी आणि त्याला पळून जाण्यासाठी पुरेसा वेळ देण्यासाठी हा एक जाणूनबुजून केलेला कट होता. मात्र, शोधा दरम्यान, त्याच्याच घरात हे रहस्य उघड झाले.

मेरीलँड पोलिसांचा दावा आहे की, अर्जुन शर्माने 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता निकिताची हत्या केली. हत्येनंतर, तो पोलिसाकडे गेला आणि त्याच दिवशी अमेरिका सोडण्याची योजना आखली.


3 जानेवारी रोजी पोलिसांनी अपार्टमेंटची झडली घेतली आणि निकिताचा रक्ताळलेला मृतदेह सापडला तोपर्यंत अर्जुन आधीच भारताला जाणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानात चढला होता. पोलिसांनी आता आरोपीविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे आणि प्रत्यार्पणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.


अमेरिकेतील भारतीय दुतावासाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दूतावासाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, निकिताच्या शोकाकुल कुटुंबाशी सतत संपर्कात आहेत आणि निकिताचा मृतदेह भारतात परत आणण्यापासून ते कायदेशीर लढाईपर्यंत सर्व शक्य मदत करत आहेत. हत्येचे नेमके कारण अज्ञात आहे, परंतु पोलिस याला घरगुती हिंसाचाराचा एक अत्यंत गंभीर प्रकार मानत आहेत. तपास आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरला आहे.

Comments


bottom of page