मध्यपूर्वेत युद्धाला सुरूवात?, इस्त्रायलचा पहिला एअर स्ट्राइक; दहाजणांचा मृत्यू, प्रचंड नुकसान

जगाच्या मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. अमेरिका आणि इराण आमने-सामने आले आहेत. गेल्या वर्षी इराण आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध झालं होतं. त्यानंतर आता इराणमध्ये सुरू असलेल्या अण्विक प्रकल्पांवरुन अमेरिका आणि इराणमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. अमेरिकेनं मध्य पूर्वेत आपल्या युद्ध नौका तैनात केल्या आहेत. तसेच सैन्यबळ देखील वाढवलं आहे. एका खात्रीलाय वृत्तानुसार तर इराणवर हल्ला नेमका कसा करायचा? याचा एक रिपोर्ट अमेरिकेच्या संरक्षण विभागानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सादर केल्याची माहिती समोर येत आहे, सध्या अमेरिकेत त्यावर चर्चा सुरू आहे.
मध्यपूर्वेत तणाव सुरु असतानाच आता इस्त्रायलकडून लेबनॉननवर एअरस्ट्राईक करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा हल्ला एवढा भीषण होता की या हल्ल्यामध्ये अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत, तसेच दहा लोकांचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या हल्ल्यामध्ये मारले गेलेले लोक हिज्बुल्लाह या संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, याबाबत लेबनानच्या आरोय मुत्रालयाकडून देखील अधिकृत स्टेटमेंट देण्यात आलं आहे. या हल्ल्यासाठी इस्त्रायल जबाबदार आहे. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. असं लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे, हा हल्ला एवढा भीषण होता की अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. एपीच्या रिपोर्टनुसार शुक्रवारी इस्त्रायलकडून लेबनानच्या उत्तर-पूर्वेला असलेल्या रायक गावावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये हिज्बुल्लाहचे जवळपास आठ अधिकारी मारले गेल्याचे वृत्त आहे. इस्त्रायलच्या या हल्ल्यात लेबनॉनचं मोठं नुकसान झालं असून लेबनॉनकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. या एअरस्ट्राईकमुळे वातावरण आणखीच तापण्याची शक्यता आहे. लेबनॉन काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



Comments