top of page

युतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच मोठं वक्तव्य

नाशिकमध्ये भाजपाची बैठक ; शक्य तिथेच महायुती म्हणून निवडणुक लढवणार


ree

आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे, महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आज नाशिकमध्ये भाजपाची महत्वाची बैठक पार पडली, या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. जिथे शक्य तीथे महायुती म्हणून निवडणूक लढवणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


संघटनात्मक परिस्थिती युती कुठे होऊ शकते याचा आढावा घेत आहोत. जिथे शक्य तीथे महायुती करणार आहोत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुढे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं विभागाच्या बैठका घेतल्या आहेत, त्या विभागामधल्या, नगरपालिका, जिल्हा परिषदा महापालिका या संदर्भातील आढावा आम्ही घेत आहोत. तीथली संघटनात्मक परिस्थिती, तीथली बूथची रचना, तिथे मागच्या निवडणुकीत काय परिस्थिती होती, आता काय परिस्थिती आहे. युती कशी करायची, युती कुठे- कुठे कराची? असा सर्व प्रकारचा आढावा आम्ही या बैठकांच्या माध्यमातून घेत आहोत.


नाशिकमध्ये आम्ही उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतला आहे. आम्ही या बैठकीत कार्यकर्त्यांचं म्हणणं एकून घेतलं आहे, त्यांना पुढंच मार्गदर्शन केलं आहे. मागच्या निवडणुकीत आम्ही तिथे चांगल यश मिळवलं होतं, याही वेळी चांगलं यश मिळेल अशी मला अपेक्षा आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणुकीसंदर्भात बोलताना फडणवीस यांनी म्हटलं की, जिथे शक्यत असेल महायुती करू, असंच वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील केलं होतं, कोणत्याही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, तिथे जर आपला चांगला कार्यकर्ता असेल तर मैत्रीपूर्ण लढत होईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर आरोप केला होता की, भाजप एकीकडे युतीबाबत बोलते, तर दुसरीकउे एकांतात स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करते, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे महायुतीमध्ये नेमकं काय सुरू आहे? आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी युती होणार का? हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Recent Posts

See All
स्वबळाचा नारा काँग्रेसचा ! फायदा मात्र भाजपाचा !!

मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार! असा नारा भाई जगताप यांनी दिला आणि मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले. मतदार यादीत घोळ झाला असा आरोप करीत भाजपा विरोधकांनी एकजुटीने आक्रमक भूमिका

 
 
 

Comments


bottom of page