राज्याच्या राजकारणात मोठा भुकंप?: मुंबईत शिवसेनेचं ‘ऑपरेशन टायगर’ , ठाकरे गटाचे दोन अंकी नगरसेवक नॉट रिचेबल; शिंदे गटाच्या संपर्कात!
- Navnath Yewale
- Jan 18
- 1 min read

मुंबई: महानगरपालीकेच्या निकालानंतर महापौरपदाचा संस्पेन्स कायम असताना एकनाथ शिंदे यांनी आपले विजयी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले आहेत. एकनाथ शिंदेना ‘ऑपरेशन लोटस’ की ‘मातोश्री’ची भीती अशा चर्चा होत असतानाच आता पुन्हा मोठ्या राजकीय उलथापालथची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना शिंदे गट ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत असल्याची चर्चा आहे. ठाकरे सेनेचे दोन अंकी नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान विरोधी बाकावर बसण्यास उदासिन असलेले नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात असल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकी शिवसेना ठाकरे गटाचे निवडून आलेले काही नगरसेवक हे नॉट रिचेबल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असल्यामुळे विरोधी बाकांवर बसण्याची मानसिकता नसलेले ठाकरे गाटाचे काही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यसा संपर्कात असल्याची माहिती आहे.
शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना वांद्रे येथील तराज हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. तसेच इतर पक्षातील नगरसेवकांना आपल्याकडे आणण्यासाठी शिवसेनेचे ‘ ऑपरेशन टायगर’ सक्रिय झाल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे काही नगरसेवक नॉट रिचेबल असून ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचवी माहिती मिळत आहे.
मुंबई महापालिक निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले तरी शिवसेनेच्या समर्थनाशिवाय त्यांची सत्ता येणे अशक्य आहे. त्यामुळे मुंबईत शिवसेनेची वाटाघाटीची शक्ती (बार्गेनिंग पॉवर) बरीचशी वाढली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला मुंबईकरांनी स्पष्ट बहुमत दिलं आहे. गेली 25 वर्षे मुंबई महापालिकेवर सातत्याने शिवसेनेचा महापौर विराजमान झाला आहे. यंदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्धी वर्ष आहे. त्यानिमित्ताने मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा महापौर असावा, अशी आग्रही मागणी शिवसैनिक करतो आहे. भाजपनेही त्योंचे जास्त नगरसेवक निवडून आले तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली म्हणून शिवसेनेचा महापौर मुंबई महापालिकेवर बसवावा, अशी मागणी शिवसैनिकांमधून होत असल्याचे सूत्रांनी सांगितले . शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी आपल्या भावना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केल्या आहेत.



Comments