top of page

व्हाइट हाऊसजवळ, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थान परिसरात गोळीबार , अमेरिकेत खळबळ, संशयितांच्या शोधात तपास यंत्रणा; प्रशासनाचे नागरिकांना शांततेचे आवाहन

अमेरिकेत व्हाइट हाऊसजवळ गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी पहाटे ही घटना घडल्याने राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये एकच खळबळ उडाली. सुरक्षा यंतणा तत्काळ सतर्क झाल्या आणि संशयित व्यक्तीचा शोध सुरू आहे.

अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांच्या निवासस्थानाजवळ,लाफायेट पार्कमध्ये रविवारी रात्री सुमारे एक वाजता गोळीबार झाल्याची माहिती समोर आली. हे पार्क व्हाइट हाऊसच्या उत्तरेकडील भागात आहे. स्थानिक सुरक्षा एजन्सींना अर्ध्या रात्रीच्या सुमारास गोळ्यांच्या आवाजाचे वृत्त आहे. लगेचच परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस आणि सुरक्षा कर्मचारी दाखल झाले. संपूर्ण पार्क आणि आजूबाजूच्या रस्त्यांची झडती घेण्यात आली.यामुळे रात्री उशिरा संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण होते.


अमेरिकन सीक्रेट सर्व्हिस, वॉशिंग्टन डीसी पोलिस आणि यूएस पार्क पोलिस यांनी एकत्र येऊन मोहिम हाती घेतली. सीक्रेट सर्व्हिसच्या युनिफॉर्म विभागनेही सहभाग घेतला. अधिकारी आणि कर्मचारी पार्कात आणि आसपाच्या भागात सखोल शोध घेत होते. एच स्ट्रीट, आय स्ट्रीट आणि 16 वी स्ट्रीट एनडब्ल्यू या काही प्रमुख रस्त्यांचे काही भाग तात्पुरते बंद करण्यात आले. रात्रभर तपास सुरू होता. पोलिस गाड्यांच्या दिव्यांनी परिसर उजळून निघाला. अधिकारी मात्र पुरावे गोळा करण्यात व्यस्त होते.

ही घडली असली तरी सुदैवाने कोणालाही इजा झाल्याची किंवा मृत्यूची बातमी नाही. तरीही सुरक्षा यंत्रणा पूर्ण सावध आहेत. राष्ट्रपती निवासाचे कामकाज पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. असे सीक्रेट सर्व्हिसने स्पष्ट केले. फक्त एखाद्या अनपेक्षित प्रसंगाची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. व्हाइट हाऊसचे दैनंदिन कामकाज यामुळे थांबले नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.


संशयीत व्यक्तीचा शोध : सुरक्षा अधिकारी एका संशयित व्यक्ती आणि संभाव्य वाहनाचा शोध घेत आहेत. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही किंवा संशयित व्यक्ती सापडलेली नाही. डीसी पोलिस आणि पार्क पोलिस यांच्यासोबत मिळून चौकशी सुरु आहे. असे सीक्रेट सर्व्हिसेच संचार प्रमुख अँथनी गुग्लिएल्मी यांनी सांगितले. या घटनेशी संबंधित कोणतीही माहिती किंवा मोबाइल व्हिडिओ फुटेज असेल तर ती तातडीने पोलिसांना द्यावी. यामुळे तपासाला मदत होईल, असे अवाहन लोकांना करण्यात आले आहे. सध्या तपास सुरू असून सुरक्षा घेरा कायम आहे. व्हाइट हाऊसच्या उत्तरेकडील भागात विशेष नजर ठेवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पत्रकार पोलिसांनी परिसरात गर्दी केली. प्रशासनाने लोकांना शांततेचे अवाहन केले आहे. ही घटना कितीही गंभीर असली तरी राष्ट्रपती निवासाच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण झालेला नाही.

Comments


bottom of page