अमेरिका, इस्त्रायल - इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात लाकडाऊन? केंद्र सरकारची स्पष्ट घोषणा
- Navnath Yewale
- 1 day ago
- 2 min read

नवी दिल्ली: भारतीय नागरिकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भीतीचे वातावरण तयार झाले होते. पश्चिम आशियातील तणाव आणि ईराण - अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता भारतात अनेक गोष्टी महागाल्या आहेत अशी चर्चा आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये चिंता वाढली. याच दरम्यान भारताचे पंतप्रधान आणि त्यांनी केलेल्या भाषणातील काही मुद्यांचा लोकांनी चुकीचा अर्थ घेतला. यामुळे सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या. या अफवांमुळे लोकांमध्ये “ भारतामध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू होणार आहे का?” अशी चिंता निर्माण झाली होती. याशिवाय पेट्रोल-डिझेलचे दर आणि साठा याबाबतही लोकांना चिंता होती. या परिस्थितीत सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्यूटीत मोठी कपात करून एक बाजू मजबूत केली आणि लॉकडाऊनसंबंधी अफवांवरही स्पष्ट भूमिका घेतली आहे. ज्यामुळे सर्व सामान्याला नक्कीच दिलासा मिळेल.
सरकारने पेट्रोल व डिझेलवर लागू असलेली स्पेशल अॅडिशनल एक्साईज ड्यूटी अर्थात अतिरिक्त उत्पाद शुल्क मोठ्या प्रमाणावर कमी केली आहे. पेट्रोलवर लागू असलेली अतिरिक्त उत्पादक शुल्क दर 13 रुपये प्रति लिटर वरुन 3 रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे. तर डिझेलवरची अतिरिक्त ड्यूटी पूर्णपणे शून्य करण्यात आली आहे. यामुळे लोकांच्या खिशावर ताण कमी होईल आणि जेल कंपन्यांना जागतिक कच्चा तेलाच्या वाढत्या दराचा दबाव ग्राहकांवर कमी करण्याची क्षमता मिळेल. या निर्णयामुळे देशभरातील पंपावर ईंधनाच्या किंमतीवर होणारा दबाव कमी झाली आहे, त्यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे, शांत राहण्याचे आणि योग्य माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आधीच लोकांना सावध केले होते की, अशा संकटाचा गैरफायदा घेणारे लोक देशात असतील. सरकारने अशा लोकांविरुद्ध तातडीने कारवाई सुरू केली आहे.
हॉर्मुज सामुद्रधुनीमध्ये वाढलेल्या तणावामुळे जागतिक कच्चा तेलाच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. एका वेळेस तेलाचा भाव 114 प्रति बॅरलला पोहचला होता. नायरा एनर्जी ने अलीकडेच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. या निर्णयानुसार पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5.30 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांनी वाढ झाली आहे. या पॅनिक स्थितीमुळे लोकांनी पंपावर लोक मोठ्या संख्येने रांगा लावत होते. सरकारने एक्साईज ड्यूटी कमी करून ही स्थिती नियंत्रणात आणली आहे. हा निर्णय तेल कंपन्यांच्या घाट्यावर नियंत्रण ठेवण्यासह मदत करतो,
केंद्रीय मंत्री पुरी यांनी नागरिकांना असे अवाहन केले आहे की, सध्याच्या परिस्थितीत संयम बाळगणे, अफवा न पसरवणे आणि जाबाबदार राहणे अत्यंत आवश्यक आहे. खोट्या बातम्यांमुळे लोकांमध्ये घबराट निर्माण होते आणि समाजिक वातावरणावर प्रतिकूल परिणाम होतो. सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर कपात करून आर्थिक ताण कमी केला आहे आणि लॉकडाऊन संबंधी अफवांवरही स्पष्टपणे उत्तर दिले आहे.
सोशल मिडियावर येणार्या अफवाहा अनावश्यक पद्धतीने शेअर करू नयेत, अधिकृत सरकारी घोषणांवर विश्वास ठेवावा, संयम बाळगून परिस्थितीवर लक्ष ठेवावे, ऊर्जा आणि सप्लाय चेनवर लक्ष ठेवावे. पुरी पुढे बोलताना म्हणाले की, सरकार सतत ऊर्जा, ईंधन आणि आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात कोणत्याही प्रकारच्या पुरवठा अडथळ्याशिवाय आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवण्याची तयारी आहे. सरकार सर्व संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.



Comments