top of page

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपची मुसंडी अजितदादांच्या राष्ट्रवादीने गड राखला; शिवसेना (शिंदे) गटाची शंभरी पार

राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांचा निकाल नुताच जाहीर झाला आहे. एकूण 7 हजार 438 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 12 जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी शनिवारी मतदान झालं. महापालिका निवडणुकाप्रमाणेच याही निवडणुकीत भाजप हा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. अजित दादाच्या राष्ट्रवादीने पुणे जिल्हा परिषदेवर निर्वीवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे, तर शिवसेना शिंदे गटाने शंभरी पार केली आहे.


राज्यातील जिल्हा परिषदांच्या निकालावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 2017 मध्ये देखील आम्ही अतिशय चांगली मुसंडी ग्रामीण भागामध्ये मारली होती. 2014 असेल 2019 असेल किंवा 2024 असेल, आम्ही ग्रामीण भागात विधानसभा निवडणुकांमध्ये अतिशय चांगला विजय प्राप्त केला होता. पण योवळी मात्र त्याहीपेक्षा मोठा विजय मिळाला आहे. त्यामुळे हेक जे मिथक होतं, की भाजप हा शहरी किंवा निमशहरी पक्ष आहे , ते आम्ही 2014 मध्ये तोडलं होतं. ते 2017 मध्ये आम्ही अधोरेखित केलं, आणि आता मात्र आम्ही ते पूर्णपणे स्थापित केलं आहे. की भारतीय जनता पार्टी शहर, निमशहर आणि ग्रामीण भागात नंबर एकचा पक्ष आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.


पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, हा जनतेचा विश्वास आहे, एकूणच या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे ग्राम विकासाचं कार्य हाती घेतलं. ज्या पद्धतीने ग्रामीण भागातील सोई सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यांनी विविध विकास योजनांमधून सकारात्मक वातावरण तयार केलं,आणि त्याचवेळी महाराष्ट्रातल्या सरकारने जे कार्य करून दाखवलं, त्यामुळे एक मोठा विश्वास जनतेच्या मनात तयार झाला. आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजप असेल किंवा आमचे मित्र पक्ष असतील त्यांना प्रचंड समर्थन मिळत आहे. आणि त्याचाच हा परिणाम आहे की, आम्ही एवढी मोठी भरारी घेतली आहे. असंही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, धाराशिव, परभणी आणि सातारा या ठिकाणी भाजप सार्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर शिवसेनेला दोन ठिकाणी यश मिळालं आहे. रत्नागिरी आणि रायगडमध्ये शिवसेनला यश मिळालं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यातनंबर एकवर आहे. आणि दोन ठिकाणी आम्ही तिनही पक्ष एकत्र लढलो होतो, कोल्हापुर आणि लातुरमध्ये तिथेही आम्हीच एक नंबर एकवर आहोत असं यावेळी फडणवीस म्हणाले.

Comments


bottom of page