नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना डांबून ठेवले, अंबरनाथमध्ये गोळीबार
- Navnath Yewale
- 12h
- 1 min read

नांदेड/ अंबरनाथ : नगरपरिषद निवडणुक मतदान प्रक्रियेसाठी चक्क मतदारांना अमिष दाखवून शहरातील एका मंगलकार्यालया डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे उघडकीस आला आहे. भाजप आमदाराच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पैशाचे प्रलोभन देवून मंगलकार्यालयात डांबून ठेवले होते. वेळीच काही पत्रकार घटनास्थळावर पोहोचल्याने हा प्रकार उघडकीस आल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अंबरनाथमध्ये भाजप-शिवसेना (शिंदेगट) पक्षात पैसे वाटपाच्या आरोपांवरून गोळीबाराची घटना समोर आली आहे.
आज बारामती, अंबरनाथ, फलटण, नांदेडजिल्ह्यांसह राज्यातील 23 नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये आज मतदान होत आहे. राज्यभरात मतदान शांततेत सुरू असतानाच नांदेडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडच्या धर्माबाद येथे मतदारांना डांबून ठेवल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. मतदान करू नका असे सांगत हजारो मतदारांना एका मंगल कार्यालयामध्ये डांबल्याच्या आरोपाने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
धर्माबाद नगरपरिषदेच्या सर्वात्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असताना शहरातील इराणी मंगल कार्यालयामध्ये मतदारांना पैसाचे अमिष दाखवून बोलवण्यात आले. मंगलकार्यालयात आलेल्या मतदारांना मतदान करू नका असे सांगण्यात आल्याचा आरोप आहे. घटनास्थळी तात्काळ पोलिस व काही पत्रकार दाखल झाले. पैसे देाते असे सांगत या मतदरांना बोलावून घेतले. मंगल कार्यालयात सर्वांना तुम्हाला चार वाजेपर्यंत पैसे देतो असं सांगत थांबवून ठेवले. मात्र सकाळपासून या मतदारांना थांबवून ठेवण्यात आले. ज्यावेळी माध्यमांना याबाबतची माहिती मिळाली. तेव्हा सर्वजण पैसे न देता पळून गेले, असा आरोप या मतदरांनी केला आहे. या धक्कादायक प्रकाराने नांदेड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अंबरनाथमध्ये मतदानामध्ये राडा : अंबरनाथ शहरातील मातोश्रीनगर परिसरात आज मतदानाच्यावेळी तणावाचं वातावरण निर्माण झालं. भाजपकडून शिंदे गटाच्या शिवसेनेवर पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते परिसरात एकत्र आल्याने मोठा राडा झाला.



Comments