पुण्याच्या नवीन महापौरपदी मंजुषा नागपुरे
- Navnath Yewale
- 9 hours ago
- 1 min read

पुणे: पुणे महानगरपालिकेत पुण्याच्या नवीन महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. काँंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. उच्चशिक्षित आणि अनुभवी नगरसेवक असलेल्या मंजुषा नागपुुरे पुण्यातील रोड परिसरातील आहेत.
आरपीय (आठवले) चे परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. जवळजवळ चार वर्षाच्या कालावधीनंतर पुण्याला नवा महापौर मिळाला आहे. भाजपच्या या विजयाने शहराच्या राजकारणात पक्षाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
मंजुषा नागपुरे पुण्याच्या नवनियुक्त महापौर आहेत. 46 वर्षीय नागपुरे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आणि 2021 मध्ये एमबीए केले. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी आयटी क्षेत्रात काम केले. त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येतात. त्यांनी भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि महापौरपदाच्या उमेदवारी अर्जादम्यान ऑटो रिक्षातून आल्यावर त्या मीडियाच्या बातम्यांमध्ये आल्या त्यांच्या निवडणुक प्रतिज्ञापत्रानुसार, नागपुरे आणि त्यांच्या कुटुंबांची मालमत्ता 3.22 कोटी आहे. त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत त्यांच्या व्यवसाय आणि व्यवसायिक मालमत्तांपासून मिळणारे भाडे आहे.
दरम्यान, मंजुषा नागपुरे यांनी 2026 च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत सिंहगड रोडवरील सनसिटी-माणिकबाग (प्रभाग क्रमांक 3) येथून विजय मिळवला. त्या या प्रभागातून बिनविरोध निवडून आल्या. नगरसेवक म्हणून त्यांचा हा तिसरा कार्यकाळ आहे. यापूर्वी 2012 आणि 2017 मध्ये नगरसेवक म्हणून काम केले होते. 165 सदस्यांच्या सभागृहात भाजपचे स्पष्ट बहुमत आणि विरोधी पक्षांनी (राष्ट्रवादी काँग्रेस) त्यांचे अर्ज मागे घेतल्याने, त्या आता अधिकृतपणे पुण्याच्या महापौरपदाची सूत्रे स्वीकारतील.
दरम्यान,165 सदस्यांच्या पुणे महानगरपालिकेत भाजपचे संख्याबळ असल्याने मंजुषा नागपुरे यांचे महापौरपद निश्चित आहे. आलिकडच्या निवडणुकीत भाजपने 165 पैकी 119 वॉर्ड जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. विरोधी पक्षांकडे पुरेशी संख्या नसल्याने आणि उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे नागपुरे बिनविरोध निवडून आल्या आहेत. या प्रचंड विजयामुळे, शहर आता भाजपच्या तब्यात आहे.



Comments