माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी एपस्टीन फाईलचा बॉम्ब टाकलाच!भारतीय राजकारणा खळबळ; मोदींसह पेट्रोलियम मंत्री पुरी, उद्योगपती अनिल अंबानीचंही नांव

कराड: एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची आणि उद्योगपतींची नावं समोर येत आहेत. अर्थात त्यांची नावं समोर येत आहेत म्हणजे ती त्या कृत्यात, अथवा गुन्ह्यात सहभागी असतील असं नाही. पण त्यांचा उल्लेख या फाईलमध्ये आल्याचे समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणी धक्कादाय खुलासे केले आहेत.
मजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराडमध्ये पत्रकार परिषदेतून माध्यमांशी संवाद साधला. चव्हाण यांनी पुन्हा एपस्टीन फाईल्सबाबत खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी, प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या नावाचा उल्लेख केल्याने देशाच्या राजकारणासह उद्योगजगतात खळबळ उडाली आहे. चव्हाण म्हणाले की, एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची आणि उद्योगपतींची नावं समोर येत आहेत.
अर्थात त्यांचा या गुन्ह्याशी अथवा कृत्याशी थेट संबंध असेल असे नाही त्यासाठी याचं मोठं विश्लेशन करावं लागेल हे सिद्ध होण्यासाठी मोठी प्रक्रिया असल्याचंही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं. एपस्टीन हा विकृत होता. त्याने वलय वापरून अनेकांशी संबंध ठेवले होते. हा 300 जीबी डेटा आहे. त्यातून अनेक खुलासे समोर येतील असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
मी माहिती दिली होती अमेरिकेत काही घटना घडत आहे. जेफ्री एपस्टीन अनेक बालिकांचा लैंगिक छळ केला.
अमेरिकेच्या दोन्ही खासदारांना जेफ्री एपस्टीन प्रकरणातील माहिती फोटो, व्हिडिओ बाहेर काढावे लागले. गेल्या 30 वर्षाचा हा डेटा आहे. प्रचंड मोठा पुरावा जेफ्री एपस्टीन प्रकरणात आहे. जनतेच्या दबावामुळे अमेरिकेने सर्व माहिती प्रकाशित करावी असा कायदा केला आहे. त्यावर ट्रम्प यांना कायदा करावा लागला, तीस दिवसांच्या आत ही सर्व माहिती समोर आली पाहिजे असं ठरलं आहे. त्या प्रमाणे माहिती समोर येत असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात कोणतीही माहिती त्याला शोधण्यासाठी वेळ लागेल.
एपस्टीन फाईलवर सरकारने उत्तर द्यावं. जी माहिती आली आहे त्यात काही भारतीयांचे नाव आहे. पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंह पुरी यांचं नाव आहे. एपस्टीन फाईल खुल्या व्हायला अजून वेळ लागेल. 300 जीबी डेटा आहे, 95 हजार फोटो मागील कालावधीत ओपन करण्यात आले. मोदी ऑन बोर्ड असा संदेश एपस्टीनने ट्रम्प यांच्या सल्लागारास दिला होता. त्यामुळे एपस्टीन आणि मोदी यांची ओळख काय. मोदींचा संदर्भ 2014 चा आहे. तो देह व्यापार करतो हे माहिती असताना त्यांच्याशी संपर्क का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान नावं समोर आल्यावर एकही व्यक्ती त्यावर स्पष्टीकरण देत नाही. त्या माणसाचा ह्यांचा संबंध आला कसा हे समोर आले पाहिजे. प्रिन्स अँड्रयू यांच्या भावाचे सुद्धा नाव आलं होतं. एका बालिकेने इंग्लडच्या कोर्टात त्यांच्या विरोधात बर्याच दिवस खटला चालवला होता. प्रिन्स अँड्रयू यांनी त्या महिलेला 140 कोटी रुपये देवून प्रकरण बाहेर मिटवले होते. इतिहासात कधी एवढ डिस्क्लोजर झाले नव्हते. ज्यांच्यावर अत्याचार झाले, त्यांचे फोटो ब्लर केल्याचही माहिती यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
या प्रकरणात भरतीय उद्योगपती अनिल अंबानी यांचं नाव असल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यांच्याविषयी अधिक काही माहिती त्यांनी दिली नाही. मला ट्रोल करू द्या, मला काही फरक पडत नाही. अनिल अंबानी ह्यांच सुद्धा नाव आहे. त्यांना मोदींनी भेटायचं आहे, मोदींनी भेटायची तयारी दाखवली आहे असा एक ई-मेल असल्याचंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं. लवकरच मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेवून सरकारला प्रश्न विचारणार आहे, सरकारला प्रश्न विचारण्याचा हक्क मला संविधानाने दिला असल्याचेही चव्हाण यावेळी म्हणाले.



Comments