मुंबईचा महापौर मराठीच!, भाजपकडून महापौरपदासाठी रितू तावडे यांची घोषणा, उपमहापौरपदी शिंदेसेनेचा संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब
- Navnath Yewale
- 7 hours ago
- 2 min read

मुंबई: देशातील बहूचर्चीत मुंबई(बीएमसी) महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी ही घोषणा केली. शिवसेना शिंदे गटाकडून उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. भाजपकडून रितू तावडे आणि शितल गंभीर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती. पण रितू तावडे यांनी बाजी मारली आहे. सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेल्या महापौरपदाची 11 फेब्रूवारी रोजी निवड होणार आहे. रितू तावडे यांना भाजपच्या मुंबईमधील पहिल्या महिला महापौर होण्याचा बहुमान मिळणार आहे.
नावाची घोषणा होताच रितू तावडे म्हणल्या की, मुंबईच्या महापौरपदी निवड झाली असली तरी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. महापौरपद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना होती. मुंबईच्या हितासाठी सर्व नगरसेवक निवडून गेले आहेत. सभागृहाची गरिमा ठेवून मुंबईच्या हितासाठी पक्षभेद विसरुन निर्मळ आणि प्रामाणिक काम करावं अशी माझी अपेक्षा आहे. असं मुंबईच्या नव्या महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे म्हणल्या.
कोण आहेत रितू तावडे?
रितू तावडे या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत, 2012 मध्ये प्रभाग क्रमांक 127 मधून त्यांनी विजय मिळवला, 2017 मध्ये घाटकोपरमध्ये प्रभाग क्रमांक 121 मधून पहिल्यांदा निवडून आल्या होत्या, 2025 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 132 मधून विजय मिळवला, मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले आहे, महापौर पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या.
शिवसेना (शिंदे) पक्षाकडून संजय घाडी यांची उपमहापौरपदासाठी घोषणा करण्यात आली. संजय घाडी 1988-89 पासून शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचा विभाग प्रमुख, सन 1990-91 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष व सिनेट सदस्य, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्य सरचिटणीस, शिवसेना उपनेते व सध्या शिवसेनेचा रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आहेत. सन 2017 ते 2022 शिवसेना नगरसेवक होते. त्यांनी सलग दुसर्यांदा विजय मिळवला. त्यांच्या पत्नी संजना घाडी शिवसेना उपनेत्याव प्रवक्त्या आहेत. मुलगा सुयश युवासेना विधानसभा समन्वयक आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार दिला जाणार! : गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून कोणाला संधी दिली जाणार? याची चर्चा रंगली होती. भाजपचा उमेदवार मराठी असणार की अमराठी असणार? अशीही चर्चा होती. मात्र आता भाजपने ठकारेंना कोणतीही संधी न देता रितू तावडे यां मराठी उमेदवाराला संधी दिली आहे. रितू तावडे या गुजरातीबहूल घाटकोपरमधील आहेत. आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून अमेदवार देण्यात आल्याने ठकारे गटाकडूनही उमेदवार दिले जाणार का? याची उत्सुकता आहे. या संदर्भात आज राज ठाकरे यांच्या बैठकीत महापौर निवडणुकीसाठी उमेदवारावर निर्णय होणार आहे.



Comments