राज्यात मतदानाला गालबोट, निकालाकडे लक्ष
- Navnath Yewale
- Dec 2
- 4 min read
महायुती, महाविकास आघडीतील घटक पक्षच आमने-सामने

राज्यात नगरपालिका, नगरपरिषदांसाठी आज मतदान प्रक्रिया संपन्न झाली. कडाक्याच्या थंडीतही सकाळी 7:00 पासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. किरकोळ कारणावरून बहूतांश मतदान केंद्रावर वादाला तोंड फुटल्याचे दिसून आले. काही ठिकाणी महायुती तर काही ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षच आमने- समाने आल्याने मतदान केंद्राला संघर्षाचा वेढा पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. राज्यभरात महायुतीसह महाविकास आघाडीतील घटक आमने- सामने आल्याचे दिसून आले.
राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचयातींच्या 262 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ होती. राज्य निवडणूक अयोगाने 4 नोव्हेंबर रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या एकून 288 सार्वत्रि निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर रोजी किंवा त्यानंतर असल्याने 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडले. नगरपालिका- नगरपंचायत मतदानाची वेळ संपली तरी देखील राज्यातील अनेक केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रागा दिसून आल्या. तर अनेक ठिकाणी राडा झाल्याचे देखील दिसून आले. आता सर्वांचे लक्ष 21 डिसेंबरच्या निकालाकडे लागले आहे.
महाडमध्ये शिवसेना- राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये हाणामारी:
महाड नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान नवे नगर परिसरात तणाव निर्माण झाला. दोन्ही गटांचे समर्थक आमनेसामने आले आणि तुफान हाणामारी झाली. प्राथमिक माहितीनुसार सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला विकास गोगावले यांच्या समर्थकांनी मारहाण केली. जाबरे समर्थकांच्या अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली. ही बाचाबाची सुरू असताना सुशांत जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याची माहिती आहे. त्यानंतर विकास गोगावले हेच रिव्हॉल्व्हर घेऊन पोलिस ठाण्यात पोहचल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे महाडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला होता.
मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थ भिडले: मनमाडमध्ये नेहरु भवन मतदान केंद्राजवळ भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अचानक वाद पेटला. प्रभाग क्रमांक 11 मध्ये बोगस मतदान होत असल्याचा भाजप उमेदवाराने आरोप केल्यानंतर दोन्ही गट भिडले. पाहता पाहता ढकलाढकली आणि धक्काबुक्की सुरू झाली. या गोंघळात भाजपचे उपाध्यक्षही धक्काबुक्कीला सामोरे गेले. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मतदारांची पळापळ झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांना वेगळे केले आणि मतदान केंद्र परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला.
येवल्यात अजित पवार गट आणि शिवसेनेत हाणामारी: येवल्यातील सहस्त्रार्जुन मंगल कार्यालय मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) समर्थकांमध्ये झालेल्या वादातून राडा झाला. मतदान केंद्रात ये-जा करण्यावरून झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पांगवले. मतदान केंद्राबाहेर सतत तणाव निर्माण होत असल्याने पोलिस कर्मचारी कायम तैनातीत होते.
त्र्यंबकेश्वरमध्ये पोलिस आणि उमेदवारामध्ये बाचाबाची : त्र्यंबकेश्वरमध्ये नूतन विद्यालय मतदान केंद्रावर किरकोळ कारणावरून पोलिस आणि उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधिंमध्ये बाचाबाची झाली. वाद चिघळू लागल्याने मतदान केंद्राबाहेर तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात अणण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळावर दाखल झाल्याने वाद निवळला आणि मतदान प्रक्रिया सुरळीत झाली.
कर्मचारीच मतदारांना सांगत होते कमळाचे बटन दाबा: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील मतदान केंद्रावरील कर्मचारी मतदारांना कमळाचे बटण दाबा असे सांगत असल्याच्या संशयावरून काही जणांनी आक्षेप घेतल्याचा प्रकार घडला. यामुळं मतदान केंद्रावर गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. वरणगाव नगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरु असताना प्रभाग क्रमांक दहा मधील सिद्धेश्वर नगर येथील बुथ क्रमांकावर हा गोंधळ झाला. बुथ क्रमांकावरील जावळे नामक अधिकारी हा मतदारांना कमळाचे बटण दाबण्यासाठी सांगत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळं काही काळ या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र चौधरी आणि माजी नगराध्यक्ष व लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे राजेंद्र चौधरी आणि माजी नगराध्यक्ष व लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार सुनील काळे यांनी या बुथवरती भेट देत त्या कर्मचार्यांना तात्काळ निलंबीत करा आणि फेर निवडणूक घ्यावी अशी मागणी लावून धरली. यावेळी पोलिस आणि निवडणूक अधिकारी आणि उमेदवार यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांना मोठा झटका: राज्यतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत असताना हिंगोलीतील कळमनुरी येथे शिसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर मोठ्या वादात सांतपडले. मदान केंद्रातच मतदानाच्या गोपनियतेचा भंग आणि आचारसंतिचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला असून या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संतोष बांगरांना कठोर शब्दांत सुनावले. तर सतोष बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याल आलेला आहे.
बीडच्या गेवाराईत तुफान राड: गेवराईमध्ये आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर दोन्ही गटाचे समर्थक आमने- सामने आले. शब्दीक बचाबाचीचे रुपांतर हानामारीत झाले आणि दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जयसिंह पंडित माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर धावून गेले असता पवारही धावून आले यावेळी दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये राडा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. वेळीच पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.
बुलढाण्यात बोगस मतदाराला पळवले: बुलढाण्यात बोगस मतदारास पकडून त्यास चोप देण्यात आला. आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड वेळीच घटनास्थळावर आले आणि त्यांनी बोगस मतदारास पळवून लावल्याचा आरोप विरोधकांनी केला.
परळीत राष्ट्रवादी-राष्ट्रवादी आमनेसामने : परळीमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटात राडा झाला. शहरातील 12 मतदान केंद्रावर राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या कार्यकर्त्याकडून बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे राजाभाऊ फड यांनी मतदान केंद्रास भेट दिली असता मतदान केंद्रावर असलेल्या दोन्ही गटाचे समर्थक आमने-सामने आले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले दादासाहेब देशमुख, दीलीप देशमुख, राजाभाऊ फड यांनी बोगस मतदानाचा आरोप केला आहे.
पंढरपुरमध्ये बोगस मदानाचा आरोप: सोलापूरच्या पंढरपूरमध्ये प्रशासनाचे कर्मचारीच चिठ्ठ्या फाडून एका विशिष्ट पक्षाच्या उमेदवारास मतदान करण्यास सांगत होते. उमेदवार प्रणिता भालके, भगिरथ भालके यांनी मतदानकेंद्रास भेट देवून कर्मचार्यांना समज देत वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला दरम्यान, प्रशासनाच्या हताने बोगस मतदान होत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.
माजलगावच्या वार्ड क्रमांक पाच मध्ये पैसे वाटल्याचा आरोप : माजलगाव नगरपरिषदेच्या वार्ड क्रमांक पाच मध्ये पैसे वाटल्याचा आरोप करत मतदान केंद्राबाहेर भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांत शाब्दीक चकमक झाली वेळीच पोलिसांनी मध्यस्थी करत जमाव पांगवल्याने प्रकरण निवळले.
बीडमध्ये दगडफेक : बीडमध्ये राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) ग्रामीण भागातील मतदार शहरात आल्याचा आरोप करत आमदार संदीप क्षीरसागर यांनी शाहूनगर भागातील मतदान केंद्रास भेट दिली यावरून दोन्ही गटाचे समर्थक समोरासमोर भिडले आणि याचे पर्यावसान तुफान दगडफेकीत झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिस बळाचा वापर करावा लागाला. वेळीच पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्वत: रस्त्यावर उतरुण जमाला पांगवण्यासाठी उपाययोजना केल्याने प्रकरण निवळले.



Comments