डिलिमिटेशन बिलाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
भाजपा ‘व्हिप’ जारी करणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी नवी दिल्लीतील ‘ सेवा तिर्थ’ येथे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत संसदीय जागांमध्ये 50 टक्के वाढ प्रस्तावित करणारे परिसीमन विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकातील दुरुस्त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळने मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी (डिलिमिटेशन) संबधित घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे. यामध्ये विविध राज्यांमधील जागांची संख्या 50 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यांमध्ये जागांच्या सध्याची व्यवस्था पुढील 25 वर्षापयृऐत म्हणजेच 2051 सालापर्यंत कायम राहील. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरपकार आणत असलेल्या डिलिमिटेशन बिलाला पाठींबा मिळावा यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यासोबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा संपर्क केला असल्याची माहिती आहे. सर्व सहकार्य मिळावं यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
केंद्र सरकाची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संसदेच्या आगामी कामकाजावर चर्चा करण्यात आली. बैठकीत, ‘ डिलिमिटेशन बिल’ मंजूर करण्यात आले. याव्यतिरिक्त, महिला आरक्षणाशी संबंधित एक दुरुस्तीही मंजूर करण्यात आली आहे.
ही मंजुरी संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी मिळाली, भाजपा एक ‘ व्हिप’ जारी करून आपल्या सर्व खासदारांना आगामी अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश देणार आहे.
दुपारी 1:00 वाजता सुरू झालेली मंत्रिमंडळाची बैठक राजधानीतील ‘ पुसा’ संकुलात सुरू असलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय पदाकिधार्यांच्या दोन दिवसीय बैठकीच्या कालावधीतच पार पडली. लोकसभा सचिवालयानं गुरुवारी जाहीर केले की, 18 व्या लोकसभेच्या आठव्या अधिवेशनाचा दुसरा भाग 30 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि तो 3 डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा डिलिमिटेशनला पाठिंबा : डिलिमिटेशन बिलावर शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर डिलिमिटेशन विधेयकाबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याची भूमिका जाहीर केली. मात्र त्यानंतर काही वेळातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंक यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादीने अद्याप कोणताही पाठिंबा दिलेला नाही, डिलिमिटेशन बिल आल्यानंतर आम्ही ड्राप्ट वाचणार मग निर्णय घेणारप असे त्यांनी म्हटले. राष्ट्रवादीने अद्याप कोणताही पाठिंबा वगैरे दिलेला नाही. गैरसमज काही निर्माण करू नका, डिलिमिटेशन विधेयकाचा ड्राप्ट वाचून त्यामध्ये काय काय गोष्ट आहे ते वाचून निर्णय घेतले जाणार आहेत, असेही लंके म्हणाले.
मतदारसंघ पुनर्रचनरा म्हणजे डिलिमिटेशनबाबत शरद पवार मला अनौपारिक चर्चेत म्हणाले होते की, मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे डिलिमिटेशन हे घटनात्मक आहे, ते करावं लागतं, त्याला काही पर्याय नसतो, असे मला साहेब म्हणाले होते, असं म्हणत शरद पवार साहेब माझे दैवत आहेत, साहेबांची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे. आठ खासदारांना घेऊन सुप्रिया सुळेंनी घेतलेला निर्णय अंतिम असेल. डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याचा आमचा निर्णय झाल्याचेही आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा डिलिमिटेशन विधेयकास पाठिंबा असल्याचे उघड झाले आहे.