top of page


पंचवीस कोटी आणि विधानपरिषदेची ऑफर ठोकरली, मैत्री तेव्हाच संपली; मला मारण्यासाठी गुंड पाठवले, माझ्याकडं रेकॉर्डिंग, गंगाधार काळकुटेंचे धनंजय मुंडेवर पलटवार
बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांचे नाव काल आमदार धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत घतले. काळकुटे काझा चांगला मित्र आहे. तो माझ्याकडे आठ आठ तास कशासाठी थांबत होता? बीडमधून लोकसभेसाठी त्याने अर्ज भरला असे सांगून मुंडे यांनी काही दावे केले होते. त्यानंतर गंगाधर काळकुटे यांनी आज पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांना माझा मित्र म्हणून उल्लेख केला. मला समाजात बदनाक करण्याचा आणि मनोज जरांगे पाटील यांच्यापासून तोडण्याचा त्यांचा प्रयत्न
Nov 9, 20252 min read


दादा गरुडचा व्हिडिओ व्हायरल; जरांगे पाटील हत्या कट आरोप प्रकरणात मोठं ट्विस्ट
जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आपल्या हत्येचा गट रचल्याचे गंभीर आरोप केले आहेत, धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येची सुपारी दिली, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे, दरम्यान आता या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दादा गरुड याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. असा आरोप आहे. या प्रकरणात जालना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अक केलं आ
Nov 8, 20252 min read


पंढरपुरात मराठा समन्वयक हाके समर्थकात शाब्दीक चकमक
पंढरपुर: पंढरपुरातील शासकिय विश्रामगृहावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा समन्वयकामध्ये शाब्दीक चकमक समोर आली आहे. दोन्ही गटाच्या पत्रकार परिषदेनंतर हा राडा झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने प्रकरण निवाळले. पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमिन गैरव्यवहार प्रकरणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी पंढरपुरात पत्रकार परिषद आयोजीत केली होती. शासकिय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत हाके यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल पत्रकारांना माहिती दिली. याचवेळी मराठा आर
Nov 8, 20251 min read


जरांगे पाटीलांना ‘झेडप्लस’ सुरक्षा द्या- क्रांती मोर्चा गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाईची आमदार, खासदारांची मागणी
वडीगोद्री, (जालना): मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या घातपाताचे धक्कादायक प्रकरण समोर आल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणाचे गांभीर्य राखून जरांगे पाटील यांना ‘झेडप्लस’ सुरक्षेची मागणी क्रांती मोर्चाच्या वतिने करण्यात आली आहे. दरम्यान, अडीच कोटी रुपयांच्या डिलचं प्रकरण समोर आल्याने आता विविध आमदार, खासदारांनी गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या खूनाची आडीच कोटी रुपयांना सुपारी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला
Nov 7, 20252 min read


टॅक्सचा झोल? : पवारांच्या अडचणी वाढल्या!,पार्थ पवाराच्या कंपनीपाठोपाठ ;‘जिजाई’ बंगलाही वादात
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी आपल्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून कोरेगाव पार्क येथे 40 एकर जमिनीच्या व्यवहारामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून अनेक अधिकार्यांना गुरूवारी निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचे कंपनीमधील भागिदार दिग्विजय पाटील, शितल तेजवानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच सदर 300 कोटींच्या व्यवहारा
Nov 7, 20252 min read


माजीमंत्री धनंजय मुंडेचा जरांगे पाटलांवर घणाघात; सर्वात मोठी मागणी थेट फडणवीसांनाच आव्हान
बीड: मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेेक गंभीर आरोप केले. मुंडेनी त्यांच्या हत्येचा कट रचला आहे. यामध्ये यश न मिळाल्याने, हत्येचा कट रचण्यात आला आणि नंतर औषध किंवा गोळ्या देऊन घातपात करण्याचा विचार झाला, असा आरोप केला. त्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्यावर आरोप करणार्या मनोज जरांगे यांच्यासह माझी सबीआय,नार्कोटेस्ट, ब्रेनमॅपिंग करा, अशी मोठी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
Nov 7, 20251 min read


मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येसाठी अडीच कोटींची डील?जरांगे पाटील यांचे पत्रकार परिषदेतून खुलासे; धनंजय मुंडेचे नाव घेत केला घटनाक्रम उघड, कोण आहे पीए कांचन?
अंतरवाली: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज महत्वाची पत्रकार परिषद घेतली. काल मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकारानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. जालना पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणार्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची हत्या करण्यासाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आली असून यामध्ये एका बड्या नेत्याचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे. याबाबत मनोज जरांगे पाटील यांन
Nov 7, 20252 min read


शेतकरी चिंतेत : हमीभाव खरेदी केंद्राची प्रतिक्षा; अडचणी वाढल्या, उत्पादित शेतीमाल माल कवडीमोल दरात विकण्याची वेळ
निसर्गाच्या अवकृपेने खरिप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच, शासनाकउून हमी भावाने माल खरेदी करणारी केंद्रे (सीसीआय आणि नाफेड) सुरू होण्यास विलंब होत असल्याने शेतकरी बांधवांना आपला उत्पादित माल नाईलाजाने कमी दरात आडत बाजारपेठेत विकावा लागत आहे. दरवर्षी दिवाळीच्या आसपास सुरू होणारी खरेदी केंद्रे यंदा नोव्हेंबर उजाडला तरी सुरू झालेली नाहीत. पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे उत्पादन घटले आहे. अशा परिस्थितीत, हमी भावात माल विकल्यास रब्बी हंगामासाठी बियाणे आ
Nov 2, 20251 min read


मुख्यमंत्री फडणवीस,जरांगे पाटील एकाच व्यासपीठावर
सोलापुर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यो अनावरण येत्या रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचीही उपस्थिती राहणार असल्याने मुख्यमंत्री फडणवीस आणि जरांगे पाटील हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर दिसणार असल्याची माहिती समाधान अवताडे यांनी दिली आहे. आमदार समाधान अवताडे यांनी या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती देताना सांगितले क
Oct 24, 20251 min read


कर्जमाफी कशी होत नाही बघातेच.. फडणवीस तुमच्या परवानगी शिवाय.., शेतकर्यांसाठी जरांगेंनी ठोकला शड्डू
शेतकर्यांसाठी मोठं आंदोलन उभं करणार असून कर्जमाफी न करता नेते कसे हिंडतात हे आम्हाला बघताच, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. रविवारी 2 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता अतरवालीत शेतकरी नेते, शेतकरी संघटनांचे अध्यक्ष आणि पदाधिकार्यांची बैठक होणार आहे. ही बैठक चर्चेसाठी आहे, शेतकर्यांनी येऊ नये, असे जरांगेंनी स्पष्ट केले. आज आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे-पाटील यांनी सांगितलं की, शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रातील सगळे अध्यक्ष, पदाधिकारी,शेती तज्ञ आणि अभ
Oct 24, 20252 min read


शेतकर्यांसाठी मनोज जरांगेचा एल्गार;भुजबळांवर टीका, सरकारला इशारा
मराठा आंदोलनासाठी रान पेटवणारे मानेज जरांगे पाटील यांनी आता शेतकर्यांसाठी एल्गार पुकारला आहे. अतिवृष्टीने शेतकर्यांचं कंबरडं मोडलं आहे. पण अजुनही मदतीचा हात पोहोचला नाही. त्याविरोधात जरांगेनी दंड थोपाटले आहेत. मराठा कुणबी आंदोलनाबाबत हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याचा निर्णय झाला आहे. आता जरांगे पाटील हे शेतकर्यांसाठी मैदानात उतरले आहेत. राज्यातील 29 जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. अतिवृष्टीने शेतकर्यांचं मोठं नुकसान झालं. शेताना तळ्याचं स्वरुप आलं नदी-
Oct 24, 20253 min read


जाटनांदूर परिसरातील पूरग्रस्त, गरीब गरजूंना साहित्यांचे वाटप
प्रवरा मेडिकल ट्रस्ट, तालुकाप्रमुख सोपान मोरे यांच्या पुढाकारातून आपत्तीग्रस्तांना मिळाला दिवाळीचा गोडवा बीड : मागील पंधरावाड्यात ढगफूटीसदृष्य मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या महापुराने शिरुर कासार तालुक्यातील जाटनांदूरसह परिसरातील शेतजमीन पिकांसह खरडून गेली. हाता-तोंडाशी आलेला खरिपाचा घास हिरावल्याने संकटाशी दोन हात करणार्या हतबल शेतकरी-शेतमजुर, गरीब,गरजूंना दिवाळी सनासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्ट यांच्या सहकार्याने शिवसेना (उबाठा) चे तालुका प्रमुख सोपान (काका) मोरे यांच्या
Oct 22, 20251 min read


सरकारकडून शेतकर्यांना तात्पुरता आनंद देण्याचा प्रयत्न- जरांगे पाटील
आता शेतकर्यांसाठी रस्त्यावरची लढाई; लवकरच राज्यस्तरावर बैठक, आंदोलनाचा इशारा जालना: राज्यात परतिच्या पावसाने धुमाकूळ घातला,ढगफूटीसदृष्य, मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. महापुरामुळे लाखो हेक्टर शेती पिकांसह खरडून गेली. राज्यातील खासकरून मराठवाड्यातील हजारो हेक्टर शेती नामशेष झाली आहे. शेतकर्यांना आधार देण्यासाठी सरकारने पॅकेज जाहिर करत दिवाळी सनाला मदत जाहिर केली असली तरी सरकारकडून शेतकर्यांना तात्पुरता आनंद देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपकरत लवकरच श
Oct 22, 20252 min read


ऐन दिवाळीत महारष्ट्राला मिळाले 47 नवे अपर जिल्हाधिकारी
देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असून दिवाळी बोनसही अनेक कर्मचार्यांना मिळालं आहे. त्यामुळे सणाचा आनंद वाढला आहे. त्याचदरम्यान राज्य सरकारने महसूल विभागातील अधिकार्यांसाठी एक खूशखबर दिली आहे. गेल्या दहा वर्षापासून बदल्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या अधिकार्यांना गोड बढत्या झाल्याची बातमी मिळाली आहे. आज राज्याच्या महसूल विभागातील 47 अधिकार्यांना बढत्या देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्राला नवे 47 अपर जिल्हाधिकारी मिळाले आहेत. गेल्या काही वर्षापासून अधिकार्यांच बढ
Oct 20, 20252 min read


मराठा सेवक काळकुटे यांची मोबाईल दाखवत भुजबळवर टीका
... तर त्याच भाषेत प्रत्यूत्तर, गंगाधार काळकुटेंचा इशारा मराठा आरक्षण हैदराबाद गॅझेट च्या जीआरमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप करत जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी बीड मध्ये ओबीसींचा एल्गार पार पडला. अखिल भारतीय महात्माफुले समता परिषदेच्या वतिने आयोजीत मेळास संबोधीत करताना मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा सेवक गंगाधर काळकुटे यांच्यावर काळतोंडे म्हणत जोरदार टीका केली. भुजबळाच्यां टीकेला प्रत्यूत्तर देताना काळकुटे यांनी मोबाईलमधील गोरीलाचे चित्र दाखवत आम्ही याची उपमा द्यायची क
Oct 19, 20252 min read


महाराष्ट्राला ऐन दिवाळीत अमित शहांकडून मदतीचा हात!
पुरग्रस्त शेतकर्यांसाठी खुषखबर; आपत्ती मदत निधीचा हिस्सा मंजूर महाराष्ट्रात मान्सूनने अखेरच्या टप्प्यात अनेक भागात अक्षरश: धुमाकुळ घातला. ढगफूटीसदृष्य मुसळधार पावसामुळे नद्यांच्या महापूराने शेतीपीकांचे, शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लाखो एकर जमिनिवरील पीके उद्धवस्त झाली. शिवाय हजारो हेक्टर क्षेत्र जमिन खरडून गेली. त्यामुळे या शेतकर्यांना मदतीसाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी ऐन दिवाळीत महाराष्ट
Oct 19, 20251 min read


शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल
पुण्यात नवा वाद, गोमुत्र शिंपुन शुद्धीकरण; खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक, पुन्हा असले प्रकार... पुण्यातल्या शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर शनिवार वाड्यात जाऊन पतित पावन संघटनेने आंदोलन केलं आहे. तसंच सदर जागा गोमूत्र शिंपडून पवित्र केल्याचेही सांगण्यात येत आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसंच यापुढे असले प्रकार आम्ही काहीही झालं तरीही खपवून घेणार नाही असंही मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. पुण्याचे वैभव-
Oct 19, 20252 min read


दहशवादी हल्ल्याची धमकी, तिरुपती हाय अलर्टवर यंत्रणांची मंदिर, न्यायालय परिसारात शोधमोहीम
आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्हा शुक्रवारी दहशवादी धमकीने हादरला. दहशतवादी धमक्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे आणि अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला आहे. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद सामग्री जप्त करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी आयएसआय आणि माजी एलटीटीई दहशतवादी तिरुपतीच्या चार भागात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत आहेत आणि त्यांची तयारी करत आहेत असा धमकी देणारे ईमेल पाठवले. इमेलद्वारे धमकीनंतर, बॉम्ब शोध नाशक पथकाने तिरुपतीच्या
Oct 18, 20251 min read


शेतकर्यांना आधार: राज्यातील 21 लाख शेतकर्यांना 1,356 कोटी रुपयांचे वाटप
मागील पंधरवाड्यात राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड जिल्ह्यातील 21 लाख 66 हजार शेतकर्यांना 15 लाख 16 हजार 681 कोटी 30 लाख 22 हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच जुलै व ऑगस्ट 2025 या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या 19 लाख 22 हजार 909 शेतकर्यांना 15लाख 45 हजार 250.05 हेक्टरवरील शेतीपिकाच्या नुकसानीपोटी 1 हजार 339 कोटी 49 लाख 25 हजारांच्या मदतीसही मान्यता देण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्
Oct 18, 20251 min read


भुजबळ फेक नरेटिव्ह फॅक्टरीचे मेंबर झाले- वडेट्टीवार
ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये काल मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भर सभेत जूना व्हिडीओ दाखवून सडकून टीका केली होती. भुजबळ यांच्या टीकेला वडेट्टीवार यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे. बीड येथील ओबीसी एल्गार मेळाव्यातून अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, वडेट्टीवार यांचा जरांगे पाटील यांच्या आंदोलनास्थळावरील जूना व्हिडीओ दाखवत भुजबळ यांनी वडेट्टीवार ठाम नसल्याचे सांग
Oct 18, 20251 min read
bottom of page