top of page


धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत मांडली भूमिका
नवी दिल्ली: देशात महिला आरक्षण आणि मतदार पुनर्रचना (131 वी घटनादुरुस्ती) विधेयकावर चर्चा असताना केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. तसेच लोकसभा निवडणुकांसाठी मतदार पुनर्रचनेची गरजही व्यक्त केली लोकसभेच्या एका एका मतदारासंघात 49 लाख मतदार आहेत, म्हणून संविधानात परिसीमनाची/ पुनर्रचना तरतूद करण्यात आली आहे. जे परिसीमनाचा विरोध करतात ते एससी/एसटी जागा वाढवण्याचा विरोध करतात, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदार पुनर्रचना संद
Apr 172 min read


पुन्हा बदली : आयएएस जी. श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकार्यांच्या बदल्या
राज्यातील आयएएस अधिकार्यांच्या बदल्यांचा धडका सुरुच असून कालच 5 सनदी अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर, आज पुन्हा एकदा चार आयएएस आधिकार्यांच्या बदल्या करणत आल्या आहेत. विशेष म्हणजे, या चार अधिकार्यांमध्ये जी. श्रीकांत यांचाही समावेश आहे. जी श्रीकांत हे सध्या नवी मुंबई जल जीवन मिशन अभियानाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, आता त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 3 एप्रिल रोजीच त्यांची जल जीवन मिशन नव
Apr 162 min read


सीबीएसईकडून दहावीचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी; 93.70 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेचे सीबीएसईनं दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 चा निकाल 93.70 टक्के लागला आहे. गेल्या वर्षी सीबीएसईच्या दहावीचा निकाल 93.66 टक्के होता. त्या तुलनेत यंदा निकालात सुधारणा झाली आहे. बोर्डानं यावेळी उत्तरपत्रिकांची तपासणी विक्रमी वेळेत पूर्ण करत निकाल दरवर्षीच्या तुलनेत एक महिना अगोदर जाहीर केला आहे. मुलींनी मारली बाजी: दरवर्षीप्रमाणे यंदाही सबीएसईच्या दहावीच्या निकाला मुलींनी मुलांना मागं टाकत बाजी मा
Apr 151 min read


अजित पवार यांच्या घरासमोरील भानामाती प्रकाराशी अशोक खरातचा संबंध; अवघ्या 34 सेकंदात खरातचे 6 मोठे व्यवहार, अंजली दमानिया यांचे पत्रकार परिषदे स्फोटक दावे
अजित पवारांच्या पुण्यातील घराबाहेर ज्या दिवशी भानामतीचा प्रकार घडला त्याच दिवशी अशोक खरातने एका हॉटेलमध्ये बसून पैशांचे मोठे व्यवहार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. 17 जानेवारी रोजी अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार झाला आणि त्याच दिवशी अशोक खरातने 34 सेकंदात मोठे व्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे अजित पवारांच्या अपघाताशी अशोक खरातचा काही संबंध आहे का याचा तपास करावा अशी मागणी त्यांनी केली. अंजली दमानिया यांनी बुधवारी पत्रकार परि
Apr 152 min read


स्वयंघोषीत कॅप्टन, भोंदूबाबा अशोक खरताची सासू पार्वती शिंदे माध्यमांसमोरतो तिकाडे काय करायचा..?
नाशिकमधील स्वयंघोषीत कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरात याला चौथ्या गुन्ह्याप्रकरणी आज पुन्हा नाशिक सत्र न्यायलयात हजर करण्यात येणार आहे. महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा अरोप अशोक खरातवर आहे. त्यामुळे पोलीस पुन्हा आज अशोक खरातची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. त्याआधी अशोक खरातची सासू आणि कल्पना खरातची आई पाव शिंदे यांनी मीडियाशी बोलताना खरात बाबत महत्वाची माहिती दिली आहे. मी एक महिन्यापासून इथे आली आहे. काय चौकशी होते आम्हाला काही माहिती नाही. कल्पना कुठे आहे मला
Apr 151 min read


रुपाली चाकणकरांनी अखेर मौन सोडलं; ..त्या पत्राबाबत म्हणाल्या
पुणे: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणावरुन सध्या आरोप प्रत्यारोप आणि राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. दुसरीकडे एसआयटीकडून आरोपी खरातची कसून चौकशी सुरू असून ईडीनेही त्याच्या घरी, कार्यालयात छापेमारी केली आहे. विशेष म्हणजे कालच रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची देखील एसआयटीने तब्बल 10 तास चौकशी केली. मात्र, आपल्या नावे बनावट खाते उघडण्यात आले असून बँकेच्या व्यवहाराशी आपला कुठलाही संबंध नसल्याचं त्या म्हणाल्या. त्यातच आता तब्बल 28 दिवसानंतर रुपाली चाकणकर यांनी
Apr 152 min read


राजधानीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन
नवी दिल्ली:भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज राजधानीत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विशेष आयुक्त श्रीमती श्वेता सिंघल यांनी पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर, नवीन महाराष्ट्र सदनातील प्रांगणात बसवण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी माजी खासदार अमर साबळे, महाराष्ट्र प
Apr 151 min read


ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलिन , शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, शब्द हिरमुसले, सूरही गहिवरले!
संपूर्ण देशानं साश्रू नयनांनी सूरसम्राज्ञी अशा भोसले यांना अखेरचा निरोप दिला. दशकानुदशके भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या दिग्गज गायिका आशाताईंच्या पार्थिवावर आज (13 एप्रिल 2026) रोजी दुपारी 4:00 वाजता शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तब्बल दहा दशकं रसिकप्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज अनंतात विलिन झाला. आशाताईंच्या जाण्यानं सूरही गहिवरलेत. तर शब्दही हिरमुसलेत. फक्त सिनेसृष्टीच नाहीतर, अख्खा देश शोकसागरता बुडाला. आशा भोस
Apr 142 min read


भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात ईडीचा फास आवळला; एकाच वेळी नाशिक,पुणे, शिर्डीत छापेतिसर्या गुन्ह्यातील पोलिस कस्टडीची मुदत आज संपली, व्हिसीद्वारे खरात न्यायालयात हजर; शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकरा
नाशिक: नाशिकच्या बहुचचिर्र्त भोंदू बाबा अशोक खरात याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आज त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने पोलिसांच्या वागणूकीबद्दल विचारणा केली असता, त्याने अवघ्या एका शब्दात उत्तर दिले. सुरक्षेच्या कारणास्तव अशोक खरातला आज प्रत्यक्ष न्यालयालयात न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. सात महिन्यांच्या गरोदर महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या खरातची तिसर्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत आज
Apr 132 min read


मुंबईत रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य प्रकरण: बिष्णोई गँगची थेट आरटीओलाच धमकी
मुंबई: मुंबईत रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा शिकणे अनिवार्य करण्याच्या हालचाली सुरू असताना आता लॉरेन्स बिष्णोई गँग अमराठी भाषिकांच्या बाजूने मैदानात उतरली आहे. लॉरेन्स बिष्णाई गँग मिरा भाईंदरमधील वाहतूक विभागाचे (आरटीआ) मराठी अधिकारी नलावउे यांना धमकीचा फोन केल्याची माहिती समोर आली आहे. रिक्षा चालकांना मराठी भाषा बोलणे अनिवार्य केल्यामुळे बिष्णाई गँगने ही धमकी दिल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या प्रकरणात आता परिवहन विभागाकउून गुन्हा दाखल करण्याची प्
Apr 132 min read


मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्वाचे निर्णय; ‘आशा भोसले संगीत अकॅडमी’ स्थापनेला मंजूरी!
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेतेखाली राज्य सरकारच्या बॅबिनेट बैठकीत आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये मुंबईत ‘आशा भोसले संगीत अकॅडमी’स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत पार पडली. आशाताईच्या नावाने संगीत अकॅडमीसह पदभरती प्रक्रियेत सुधारणा, मुंबईत आयईएस स्किल टेक विद्यापीठाच्या स्थापनेसह आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनानं
Apr 132 min read


मराठवाडा, विदर्भाला भूकंपाचे सौम्य धक्के नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ वाशिम जिल्ह्यात जाणवले धक्के
महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागात शनिवारी (दि.11) सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिमसह यवतमाळमध्ये भूूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची नोंद आहे. तर काही ठिाकणी भूकंपाची तिव्रता जास्त असल्याने घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. दरम्यान घराच्या छतावरील पत्रे हादरल्याचे यावेळी जावले. अचानक सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. हे भूकंपाचे धक्के सकाळी अंदाजे 8:46 वाजता जाणवल्याची प्राथकमिक माहिती आहे. हिंगोली जिल्ह्यात शनिवारी सक
Apr 111 min read


संतोष देशमुख हत्या प्रकरण:धनंजय देशमुखांच खळबळजनक दावा!मस्साजोग गावातील चोरी प्रकरणी आमदार धस, धनंजय देशमुख, दादासाहेब खिंडकर यांनी घेतली पोलिस अधिक्षकांची भेट
बीड: केज तालुक्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता जवळपास दिड वर्ष झाली आहेत. या हत्या प्रकरणाचा तपास सुरू असून न्यायालयीन सुनावणी देखील सूरू आहे. त्यातच आता भाप आमदार सुरेश धस, धनंजय देशमुख, आणि त्यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली यावेळी त्यांनी पोलिस अधीक्षकांसोबत मस्साजोग गावात होणार्या चोर्या, घरफोडी आणि विविध विषयांवर चर्चा केली. त्यामध्ये आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळत अ
Apr 112 min read


मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरची पार्किंगमध्ये लँडिंग सुदैवाने हानी टळली; लँड करताना पायलटची मोठी चूक
पुणे: जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान मोठी चूक झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.11) समोर आली. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे महात्मा फुले जयंतिनिमीत्त आयोजित कार्यक्रमासाठी येथे येत होते. मात्र, नियोजीत हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरण्याऐवजी पायलटने ते थेट कार पार्किंगच्या जागेत उतरवल्यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमासाठी स्वतंत्र हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती, तरीदेखील खानवडी गावात पोहो
Apr 111 min read


सुनेत्रा पवारांच्या जीवित्ताला चाकणकरांकडून धोका? बीडच्या व्यक्तीची एसआयटीकडे तक्रार
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्यातील पूर्वीचे गुरू शिष्याचे संबंध समोर आले होते. दिवंगत उपमुख्यमंत्री यांच्या अपघाती मृत्यू पूर्वी त्यांच्या घरासमोर जादू-टोण्याचा प्रकार आणि त्या नंतर खरातकडे अजितदादा पवार यांच्या फोटोवर फुल्ली या सर्व बाबी संशीयित असतानाच भोंदू बाबा अशोक खरात आणि व्हिएसआर कंपनीशी संबंध या सगळ्या बाबी संशयास्पद असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरचंद्र पवार) पक्षाकडून वारंवार बोलले जात आहे. यासर्व प्रकरणाची सखोल निष्पक्ष चौकशीची मागणीही करण्य
Apr 112 min read


मोनालिसा अल्पवयीन असल्याचे सत्य उघड; मुस्लिम पतीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
महाकुंभ व्हायरल झाल्याने प्रसिद्धिच्या झोतात आलली मोनालिसा पुन्हा एकदा चर्चेत आहे. मोनालिसाच्या लग्नावरुन देशभरात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता एक मोठे वळण आले आहे. तपासात मोनालिसा अल्पवयीन असल्याचे उघड झाले असून, त्यानंतर तिचा मुस्लिम पती फरमान खान याच्यावर गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील खरगोल जिल्हा पोलिसांनी मोनालिसाचा पती फरमान खान याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेनुसार गुन
Apr 102 min read


दिवंगत संतोष देशमुख यांच्या घरी चोरी,चोरट्यांनी मौल्यवान साहित्यांसह रोकड लांबवली
कुटुंब झोपत असताना चोरट्यांनी मारला डल्ला; मस्साजोगमध्ये इतर ठिकाणीही घरफोडी बीड: जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथे गुरुवारी (दि.9) मध्यरात्री खळबळजनक घटना घडली. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरासह गावातील इतर अनेक ठिकाणी चोरांनी डल्ला मारल्याचे घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी त्यांचे बंधू धनंजय देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख, त्यांची आई आणि कुटुुंबातील इतर सदस्य रात्री झोपल
Apr 101 min read


निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच इव्हिएम तपाणीचे कोर्टाचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल; शिंदेच्या शिलेदाराच्या अडचणी वाढल्या?
मुबई: भारताच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच, मुंबई उच्च न्यायालाने ईव्हएमची तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती सोेमशेखर सुंदरेसन यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणातील याचिकाकर्ते हे काँग्रेस आर्यसमितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान आहेत तर प्रतिवादी दिलीप लांडे आहेत. याचिकार्ते हे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान आहेत तर प्रतिवादी दिलीप लांडे आहेत. 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दिलीप लांडे यांनी
Apr 91 min read


लातूर- अंबाजोगाई महामार्गावर कारचा भीषण अपघात, केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा मृत्यू
लातूर- अंबाजोगाई महामार्गावर रेणापूर फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या भीषण कार अपघातात केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेमुळे सर्वस्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तहसीलदार गिड्डे हे स्वत:च्या कारने प्रवास करत होते. यावेळी त्यांची गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले. पघाताची तीव्रता इतकी जबरदस्त होती की त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. राकेश गिड्डे हे कार मध्ये एकटेच होते. गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी दीडशे फुट घासत गेल
Apr 91 min read


(व्हिडीओ): नांदेडमध्ये दिव्यांग बांधव आक्रमक! तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, परिसरात चक्काजाम
नांदेड : महाराष्ट्रातील सनदी अधिकारी आणि नुकतेच दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरुन बदली करण्यात आलेले आयएएस तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील दिव्यांंगांनी आज बुधवार (दि.8) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन केले. तुकाराम मुंढे यांची बदली रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. विशेष म्हणजे मुढे यांची बदली रद्दच्या मागणीसाठी संघटनेचे राहूल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बांधवांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री
Apr 82 min read
bottom of page