शरद पवारांची राष्ट्रावादी ट्रोल..!, राज ठाकरेंच्या जुन्या व्हिडिओवर कमेंटचा पाऊस, रोहित पवार वेगळा निर्णय घेणार?

शरद पवारांची राष्ट्रावादी ट्रोल..!, राज ठाकरेंच्या जुन्या व्हिडिओवर कमेंटचा पाऊस, रोहित पवार वेगळा निर्णय घेणार?
Published By: Navnath Yeole
Published On:

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन विधेयकाला दिलेल्या पाठिंब्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच आता रोहित पवार यांचे ट्विटही तेवढेच चर्चेत आले आहे. “ तेव्हा नातं बाजूला ठेवून लढलो, अताही तीच भूमिका...” या सूचक ट्विटने पक्षाच्या अंतर्गत संघर्षाला वाट मोकळी करून दिली आहे. पक्षाच्या भूमिकेबद्दल काही नेत्यांमध्ये नाराजी असून, रोहित पवारांची स्वतंत्र भूमिका तेवढीच चर्चेचा विषय ठरली आहे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी पुरोगामी विचारांना घेऊन चालायचे असेल तर आमच्या पक्षात रोहित पवारांचे स्वागत असल्याचं म्हणत एकप्रकारे रोहित पवार यांच्या स्वतंत्र भूमिकेल महामार्ग तयार केला आहे. 

तीन महिन्यापूर्वी संसदेत मांडलेलं डिलिमिटेशन विधेयक संविधान विरोधी असल्याचं सांगत इंडिया आघाडीच्या सर्व घटकपक्षांनी त्यास कडाडून विरोध केला. महाराष्ट्राचंच पाहिलं तर शरद पवार यांची राष्ट्रवादीही त्यातलीच, मग अवघ्या तीन महिन्यानंतर पुन्हा हेच डिलिमिटेशन विधेयक शरद पवारांच्या राष्ट्रवादीला संविधानीक कसं वाटलं?, तीन महिन्यात डिलिमिटेशन विधेयकामध्ये काय बदल करण्यात आलेत? जर काही बदल करण्यात आले असले तर त्याचा ड्राप जनतेसमोर आला आहे का? आला असेल तर राष्ट्रवादीने अगोदर तो ड्राप समोर मांडून इंडिया आघाडीतील घटक पक्षांचा गैरसमज दूर केला करत भूमिका घेतली असती. 

दर वीस वर्षाने डिलिमिटेशन होत असतं, ते संविधानिक आहे, असं पक्षाच्या प्रवक्त्यांकडून आता ठासून सांगण्यात येत असलं, तरी मागील तीन महिन्यांपूर्वी वीस वर्षाचा काळ पूर्ण झाला नव्हता का? झाला असेल होता तर संसदेत घसा कोरडा पडेपर्यंत विरोध का केला? असे अनेक प्रश्न एकीकडे निर्माण होत असतानाच काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी थेट शरद पवारांच्या राजकीय कार्यशैलिवर घाव घालत ‘ शरद पवारांचा इतिहास खंजीर खुपसणारा, सत्तेसाठी जन्म,आणि सत्तेतच मरणं’ घणाघात केला. 

अलिकडच्या काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील चर्चेतला चेहरा आमदार रोहित पवार, दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत चौकशीची मागणी असो की पंढरपुरमधील शेतकरी आंदोलन, पुण्यातील एमपीएससी आंदोलन, नागपूर येथील विद्यार्थी आंदोलनामध्ये रोहित पवार यांनी पक्षाचा झेंडा वापरला नाही, शिवाय पक्षश्रेष्टींपासूनची विलगी इथंच राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी लपून राहिली नाही.  याच काळात आमदार रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याच्या बातम्या आल्या. यावर रोहित पवार यांनी भूमिका स्पष्ट करत पुरोगामी विचार पुढे घेवून जाण्यावर ठाम असल्याचं सांगितलं. एका मुलाखतीमध्ये रोहित पवार यांना परिसिमन विधेयका बाबत शरद पवार सत्तेसोबत गेले तर? या प्रश्नावर रोहित पवार यांनी ‘हात जोडून वेगळा निर्णय घ्याव लागेल’ असं सुचक वक्तव्य केलं होतं. 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच परिसिमन विधेयकाला पक्षाने पाठिंबा जाहिर केल्यानंतर पक्ष जोरदार ट्रोलचा धनी झाला आहे. त्यातच पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकाचा ड्राप आल्यानंतर भूमिका मांडू असं म्हणत विधेयकाबाबत एकप्रकारे संमती दर्शवली. परिसिमन विधेकाबाबत इंडिया आघडीच्या बैठकीस हाजर राहणार नसल्याचंही सुप्रिया सुळे यांनी आधिच जाहीर केलं होतं. त्यातच पक्षाची भूमिका सामान्य जनतसमोर आली. सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेनंतर महाविकास आघडीतील घटक पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीवर टिकेची झोड उठवली. त्यानंतर पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडून सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीस झुमद्वारे उपस्थित राहणार होत्या मात्र, काँग्रेस नेत्यांनी बेताल वक्तव्य केले, त्यांनी सोमवारची वाट पाहायला हवी होती. त्यांच्या वक्तव्यामुळे सुप्रिया सुळे हजर राहणार नाहीत अशी सारवा सारव केली. इंडिया आघडीच्या बैठकीस हाजर राहनार नसल्याचं म्हणताना खासरदार सुप्रिया सुळेे स्वत:च झुम मिटींगवर बोलल्या असत्या पण त्यांची भूमिका स्पष्ट होती त्यामुळे त्या असं काही बोलल्या नाहीत हेच म्हणावं लागेल. 
 
सुप्रिया सुळे यांच्या बाबतचा राज ठाकरे यांचा जुना व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘ मी म्हटलं होतं, पहाटेची शपथ अठवती का? एक टीम यांनीच पाठवली, आणि आता दुसरी जाण्याच्या मार्गावर आहे. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवयचे सुळं वेगळी आहेत.’ राज ठाकरे यांच्या व्हिडिओवर सोशलमिडियावर सकारात्मक तर राष्ट्रवादीला ट्रोल करणार्‍या कमेंटचा अक्षरश: पाऊस पडत आहे. 

त्यातच अद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार याची ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेवून माहितीनुसार दोन तास चर्चा केली. जानकारांच्या मते पंधरा दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये आरोग्याच्या चाचण्या घेतल्यानंतर त्यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रफुल्ल पटेल, एकनाथ शिंदे यांच्यासोबतच गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेवून विचारपूस केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शरद पवार यांना फोन संवादाच्या बातम्या आल्या. ‘ मी आणि सुप्रिया देश सांभाळतो, तुम्ही आराम करा’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार यांना म्हणाले असल्याच्या बातम्या समोर आल्या. 

परिसिमन विधेयकावरून राष्ट्रवादी ट्रोल होत असतानाच आता आमदार रोहित पवारांचं ट्विट चर्चेत आहेत ‘ 2022 ला अजित दादांनी वेगळा निर्णय घेतला, तेव्हा नांत बाजूला ठेवून मी विचाराच्या बाजून लढलो. आजही आणि उद्याही तीच भूमिका कायम असेल असं सूचक वक्तव्य केलं. आमदार रोहित पवार यांनी डिलिमिटेशन विधेयकावर सावध भूमिका मांडतात तर दूसरीकडे खासदार सुप्रिया सुळेंच्या निर्णयाशी सहमत असल्याचं सांगत परिसिमन विधेयकाचा ड्राप समोर आल्याशिवाय भूमिका घेता येणार नसल्याचंही ते म्हणतात. यावरून रोहित पवार पुरोगामी विचारावर ठाम आहेत, यावरुन ते वेगळी भूमिका घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.