सुप्रिम कोर्टाचा ‘तो’ व्हिडिओ हटवण्यास सुप्रिम कोर्टाचा नकार !
काँग्रेसच्या हैदराबाद येथील कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आलेला ‘ वोट चोर, गद्दी छोड’ हा व्हिडिओ हटविण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. यासोबतच या संपूर्ण प्रकराची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी करणारी याचिकाही न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे या व्हिडिओवरून सुरू असलेल्या वादात न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
हैदराबाद येथे 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी आयोजित ‘ द भारत समिट 2026’ या कार्यक्रमात युरोपियन सोशलिस्ट पक्षाचे (पीईएस) महासचिव जियाकोमो फिलिबेक सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या समथनार्थ भूमिका मांडत ‘ वोट चोर, गद्दी छोड’ अशी घोषणा दिली होती. भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचा दावा तिच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले होते.
या वक्तव्यावरप आक्षेप घेत याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या याचिकेचा उल्लेख केला. परदेशी राजकीय संघटनेच्या पदाधिकार्याने भारतीय सरकारवर टीका करणे आणि विरोधी पक्षाला पाठिंबा देणे हा देशाच्या अंतर्गत राजकारणातील हस्तक्षेप असल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला. संबंधित व्हिडिओ हटविण्यासह या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे दोन्ही मागण्या फेटाळून लावल्या.