महाराष्ट्रातील राजकीय प्रयोगाचा शेवट?

महाराष्ट्रातील राजकीय प्रयोगाचा शेवट?
Published By: Navnath Yeole
Published On:

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा जाहीरक ेल्याने महाराष्ट्रासह देशच्या राजकारात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा मोठा परिणाम होणार आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा महाराष्ट्रात विरोधात असलेल्या महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष आहे. शरद पवारांनी एनडीए ला पाठिंबा जाहीर केल्याने महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या अस्तित्वाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

डिलिमिटेशन अर्थात परिसीमन विधेयकावरून महाविकास आघाडी राहणार की नाही याबाबत आता उलटसूलट चर्चा रंगल्या आहेत. कारण या विधेयकाला पाठिंबा देण्याचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा निर्णय काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला पटलेला नाही. काँग्रेस नेते आणि संजय राऊतांनी उघडपणे पवारांच्या राष्ट्रवादीवर थेट निशाणा साधला आहे. 

काँग्रेसनं तर सगळी उणीधुणी काढली आहेत. त्यामुळे भाजपच्या धोरणांना विरोध करण्यासाठी शरद पवार आणि संजय राऊतांच्या पुढाकारातून उदयास आलेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग संपुष्टात येणार अशीच चिन्ह दिसत आहेत. या फुटीची औपचारिकता शिल्लक राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळास सुरू आहे. पोपट मेलाय , मात्र सांगणार कोण हेच आता बाकी राहिली. दरम्यान टीकेनंतर सोमवारपर्यंत शरद पवारांची भूमिका बदहणार का याचीही उत्सुकता लागली आहे. 


डिलिमिटेशनवरून अंबादास दानवेंचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर प्रहार केला आहे. पक्ष चिन्हात तुतारीऐवजी कमळाचा फोटो टाकत घणाघात केला आहे. तुतारी चिन्हामध्ये कमळाचा फोटो पोस्ट केला आहे. 
महाविकास आघाडीत ढकलून स्वत: पळून गेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चंद्रकांत खैरे यांचा शरद पवारांनी आम्हाला धोका दिला. पवारांच्या मागे जाऊन आम्ही आमचं नुकसान केलंय, असा संताप खैरेंनी व्यक्त केला आहे. तसंच आम्हाला महाविकास आघाडीत ढकलून स्वत: पळून गेले, त्यांच्यासोबत राहून काय मिळाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. शरद पवार भाजपसोबत जातील, मात्र आम्ही तिथेच राहू, असे अनेक नेते पूर्वी सांगत होते. प्रत्यक्षात सत्ताही मिळाली नाही आणि राजकीयदृष्ट्याही नुकसान झाले. अशी खंत खैरेंनी व्यक्त केली.सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांचे तळ्यात मळ्यात सुरू आहे, अशी टीका केली.  


दरम्यान, शरद पवारांच्या राजकीय इतिहासाचा उल्लेख करत खैरे म्हणाले, वसंतदादांपासून आम्हाला शरद पवारांची हिस्ट्री माहिती आहे. ते बाळासाहेबांचे मित्र होते. त्यांनी आम्हाला एकत्र आणले आणि स्वत:च निघून गेले. शरद पवारांना आपण बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे मानतो, असे सांगतानाच त्यांच्या भूमिकेमुळे दु:ख झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. खैरेंच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत नाराजी आणि रजाकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.


  

Related Posts