top of page

तेलंगणात ‘स्थानिक’ निवडणुकीत भाजपचा धुव्वा! ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान, काँग्रेसची मुसंडी; राहुल गांधींच मोठं विधान..

तेलंगणात 123 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात आल्या. त्यामुळे त्या ठिकाणच्या निकालाची उत्सुकता सर्वाना लागून राहिली होती. एकीकडे महाराष्ट्रात ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली जात होती. मतदान प्रक्रियेतील गैरप्रकार दूर करावेत मतचोरिच्या विरोधात महाराष्ट्रातील विरोध पक्षांनी निवडणूक अयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निरवडणुकीत ईव्हीएमवर झालेल्या मतदानात भजापला मोठे यश मिळाले होते. तर दुसरीकडे तेलंगणात 13 फेब्रूवारी रोजी पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर पार पडल्या. या निवडणुकीत काँग्रेसने विरोधकांचा धुव्वा उडवत एकहाती यश मिळवले आहे.


तेलंगणात 13 फेब्रूवारीला मतपत्रिकेवर निवडणुका झाल्या. त्याची मतमोजणी शनिवारी पार पडली. या निवडणुकीत 2 हजार 996 वॉर्डचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 1हजार 498 जागांच्या पुढे जात काँग्रेसने 1 हजार 537 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. टक्केेवारीत बोलायचे तर 51.3 टक्के जागांवर विजय मिळवत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.


तेलंगणात सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेसविरुद्ध नाराजी आहे, असा दावा करणार्‍या विरोधकांना मतदारांनी फारसा प्रतिसाद दिलेला दिसत नाही. भारत राष्ट्र समिती (बीएसआर) 781 जागांसह दुसर्‍या क्रमांकावर राहिली, तर भाजपला केवळ 336 जागांवर समाधान मानावे लागले आहे.


तेलंगणात शहरी भागात आपला प्रभाव टिकून ठेवणार्‍या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिम (एआयएमआयएम) ने 70 जागा जिंकल्या. अपि उमेदवारांनी 183 जागा जिंकल्या सीपीआय (एम) ला 13 आणि बीएसपी ला 2 जागा मिळाल्या, तर टीडीपी आणि जनसेना पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. या निवडणुकीत एकून 1638 महिला निवडून आल्या, तर पुरुषांची संख्या 1356 राहिली.


हा विजय जनतेच्या विश्वासाचा थेट पुरावा : राहुल गांधी

तेलंगणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. यया विजयानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे निकाल सामाजिक न्याय, आदर आणि समावेशक विकासाच्या दृष्टिकोनाला जनतेचा पाठिंबा स्पष्टपणे दर्शवितात. त्यामुळे हा विजय जनेतेच्या विश्वासाचा थेट पुरावा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तेलंगणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील विजय हा काँग्रेस सरकारच्या लोकप्रिय धोरणांचे प्रमाणीकरण आहे. हा विजय तळागळातील कार्यकर्त्यांचा आणि राज्यातील जनतेचा असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

Comments


bottom of page