top of page


संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी जेल बाहेर
बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे शुक्रवारी (दि.13) 14 महिन्यानंतर जेल बाहेर पडला आहे. त्यानंतर केल्या जाणार्या विधीसाठी जयराम चाटेच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला होता. याच अर्जावर अटी शर्ती घालत न्यायालयाने जयाराम चाटेला 12 व्याच्या विधीस उपस्थित राहण्याची परवपानगी दिली आहे. आरोपी जयराम चाटे यास दुपारी चार वाजेपर्यंत हा वेळ दिला गेला आहे. बीड जिल्हा कारागृहातून जयराम चाटे पोलिस बंदोबस्तात बाहेर पडला असून त्याच्या मूळ तांबवा या गावी चाटेच्या भावाच
Mar 132 min read


ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय क्रीमी लेयर साठी केवळ उत्पन्नच नाही तर आता पालकांचे पदही ग्राह्य धरले जाणार
नवीदिल्ली: ओबीसी आरक्षणांतर्गत ‘क्रीमी लेअर’ निश्चित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे. यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केले आहे. की,क्रीमी लेयर ठरवण्यासाठी केवळ पालकांचे उत्पन्न हा एकमेव निकष असू शकत नाही. उत्पन्नासोबतच पालकांचे पद आणि त्यांचा सामाजिक दर्जा विचारात घेणे अनिवार्य आहे. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारचे अपील फेटाळून लावत दिल्ली, मद्रास आणि केरळ उच्च न्यायालयांने पूर्वीचे निर्णय कायम ठेवले आ
Mar 132 min read


पैठण- पंढरपूर पालखी मार्ग: कंत्राटदार कंपनीच्या भल्यासाठी शाश्वत विकासाला सुरुंग!
निमुळत्या रस्त्याचा हट्ट कोणाचा?; हद्द 30 मिटर काम प्रत्यक्षात 22.5 मिटरचे बीड: शिरुर शहर हद्दीत सुरू असलेले पैठण- पंढरपूर पालखी मार्गाची शहरीभागातील हद्द सोडून निमुळत्या रस्त्याचा घाट कोणी घातला? प्रत्यक्षात रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नाल्यांचा व्यास चार मिटर सांगण्यात येत असला तरी एका नालीचा व्यास केवळ 1.25 प्रमाणे 2.5 मिटर एवढा आहे. त्यामुळे कंत्राटदार कंपणीच्या भल्यासाठी प्रदिर्घ आणि शाश्वत विकाला सुरुंग लावणारे अदृष्य हात कोणाचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महामार्ग, र
Mar 132 min read


वाल्मिक कराडच्या घरातून काहितरी सूत्र हालतात; एसआयटीकडूनही शून्य तपास- ज्ञाणेश्वरी मुंडे सघर्ष करत राहणार, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
बीड: परळीतील व्यवसायिक महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास एसआयटीमार्फत तपास सुरू आहे. आयपीएस पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीने आतापर्यंत पाच जणांच्या नार्कोटेस्ट, ब्रेन मॅपिंग केल्या आहेत. नार्को टेस्टचा अहवाल जाहीर नसल्याने आज ज्ञाणेश्वरी मुंंडे यांनी एसआयटी प्रमुखांची भेट घेतली. त्यानंतर ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधून तीव्र नाराजी व्यक्त करत गंभीर आरोपासह संताप व्यक्त केला. ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी आज एसआयटी प्रमुख आयपीएस पंकज कुमावत यांची भेट घेवून त
Mar 122 min read


गॅस तुटवडा : चिंताग्रस्त हॉटेल व्यवसायिकांची सरकारकडे धाव मंत्री भुजबळांचा केरोसिन वापरण्याचा सल्ला पण...
मुंबई : आखाती देशातील युद्धांमुळे निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आता शहरातील हॉटेल उद्योगावरही दिसू लागला आहे. व्यवसायिक गॅसचा पुरवठा बंद असल्याने शहरातील हॉटेल व्यवसायिकांची चिता वाढली आहे. सध्या काही हॉटेल्सकडे असलेल्या शिल्लक गॅस साठ्यावर व्यवसाय सुरू असला, तरी परिस्थिती कायम राहिल्यास येत्या दोन दिवसांत सुमारे 20 टक्के हॉटेल बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री भुजबळ म्हणाले की
Mar 112 min read


पैठण-पंढरपूर पालखी मार्गाला शहरीभागातच हद्दीचे ग्रहण!
निमुळत्या रस्त्यावरून होणार दोन मार्गाची वाहतूक; संभाव्य वाहतूक कोंडीचा प्राधिकरणाला विसर बीड :पैठण- पंढरपूर पालखी मार्गाचे गेल्या पाच वर्षापासून प्रगतीपथावर आहे. पैठण-पंढरपूर मार्ग व राजूरी नवगन-चिंचपूर मार्ग शिरुर कासार शहरातून जवळपास 600 मिटर अंतरावरून एकत्रित मार्गस्थ होत आहे. शहरीभागात या मार्गाचे काम केवळ 20 मिटरच्या हद्दीपर्यंत मजबुतीकरण प्रगतीपथावर आहे. जबाबदार प्रशासन व कंत्राटदार कंपनीच्या संगनमताने ठरवून नियोजीत मार्गावर कायम वाहतूक कोंडी, अपघाताला निमंत्रण दिले जा
Mar 112 min read


उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महिलांसाठी मोठी घोषणा
‘लवकर या, लवकर जा..’ प्रणाली लागू ; मुंबई महानगर क्षेत्रातील शासकी महिला कर्मचार्यांना मोठी भेट मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विधिमंडळ अधिवेशनात राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय कर्मचारी महिलांसाठी मोठी घोषणा केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचार्यांसाठी ‘लवर या, लवकर जा’ प्रणाली लागू करण्याची घोषणा केली. शासकीय नोकरीत असलेल्या महिला सकाळी 9:15 वाजता कार्यालयात
Mar 112 min read


जिष्णू देव वर्मा महराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. जिष्णू देव वर्मा हे महराष्ट्राचे 22 वे राज्यपाल आहेत. सुरुवातील मुख्य सचिव राजेश
Mar 102 min read


घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले; देशभरात एस्मा लागू
अमेरिका-इस्त्रायल -इराण युद्घामुळे जगभरात कच्चा तेलाचे भाव वाढले आहे. एलपीजी सिलिंडेरचे दर तीन दिवसापासून वाढवण्यात आले आहेत. पेट्रोल, गॅस यांचा तुटवडा होऊ नये म्हणून केंद्र सरकार उपाययोजना करीत आहे. अशातच घरगुती गॅस सिलेंडरबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीमवर पेट्रोलियम मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाचा फटका थेट सामान्य घरगुती ग्राहकांना बसणार आहे. घरगुती गॅसचे वितरण सध्या सुरळीत सुरू आहे. पण व्यवसायिक गॅसबाबत काही ठिकाणी काळाबा
Mar 102 min read


राज्यातील बड्या आयएएस अधिकार्याचे निलंबन मागे, अचानक निर्णय बदलला
मुंबई : चंद्रपुर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषणाच्या मुद्यावरद राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा झाली. महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सभागृहात माहिती दिली की, चंद्रपुरमधील पर्यावरणविषयक गंभीर समस्या सोडवण्यासाठी त्यांनी वारंवार बैठकांचे आयोजन केले होते. मात्र, एमपीसीबीचे काही वरिष्ठ अधिकारी या बैठकांना सातत्याने गैरहजर राहिले. यावेळी पंकजा मुंडे चांगल्याच संतापल्या, माझ्या आदेशानंतरही आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग हे बी्रफीनगसाठी हज
Mar 101 min read


युद्धाचा भडका: गॅस तुटवड्याचा संभाजीगनर मधील उद्योगांना फटका 5 मोठे उद्योग बंद; लघु उद्योगांनाही घरघर!
छत्रपती संभाजीनगर: अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम जगभरातील देशांवर होत आहेत. भारतातील इंधन पुरपठ्यावरही याचा परिणाम झाल्याचे पाहायल मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकारचा संदर्भ देत इंधन पुरवठा कमी होणार नाही, मूुबलक गॅस पुरवठाही असल्याचे म्हटले आहे. मात्र, पुरेशा इंधनाअभावी छत्रपती संभाजीनगरमधील पाच मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. गॅसचा तुटवडा कायम राहितल्यास उद्या मोठ्या प्रमाणात उद्योग बंद होतील. ऑटो इंडस्ट्री, फार
Mar 102 min read


संतोष देशमुख हत्या प्रकरण: विशेष न्यायालयात दोन्ही पक्षाकडून आरोप-प्रत्यारोपांचा युक्तीवद कोर्ट परिसरात तणावाचे वातारण; वाल्मिक कराडचा सुप्रिम कोर्टाचा आदेश विशेष कोर्टात सादर
बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणी शुक्रवारी (दि.6) न्यायालयातील सुनावणी दरम्यान सरकारीपक्षाचे वकील उज्वल निकम आणि आरोपींचे वकील एकमेकांना भिडल्याचे दिसून आले. त्यामुळे न्यायालयाच्या आवारातील वातावरण चांगलेच तापले होते. दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या युक्तीवादात सुनावणी पार पडली दि.24 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. बीडच्या विशेष न्यायालयात शुक्रवारी (दि.6) संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. मा. न्यायालयाने डिजिटल, इलेक्ट्रॉनिक पुरावे आरोपी पक्षाला देण्
Mar 62 min read


राहुल गांधींचा तो इशारा, ट्रम्पनी काढले फर्मान अन् मोदी सरकारची अशी झाली कोंडी
इराण आणि इस्त्राईल युद्धाचा भडका उडालेला असतानाच भारताबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. या यद्धामुळे जगातील अनेक देशांना गॅस आणि इंधनाचा तुटवडा जाणवण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामध्ये भारतही आहे. त्यावर अमेरिकेकडून भारतासाठी एक फर्मान काढण्यात आले आहे. त्याच्या काही दिवस आधीच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलर्ट केले होते. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभेत बोलताना आपल्याला तेल कुठून, कुणाकडून खरेदी करायचे, यासाठी अमेरिकेकडून परवानगी घ्यावी लागू शकते
Mar 62 min read


महाराष्ट्राचा 7 लाख 69 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडला अर्थसंकल्प; दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या स्मृतींना अर्थसंकल्प समर्पीत, शेतकर्यांना कर्जमाफीची घोषणा
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प 2026-27 सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतकर्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची देण्यात आली आहे. तसेच गावांमध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवणार, लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसाठी विशेष करमुक्त आल्या आहेत. हा अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी राहिलेल्या दिव
Mar 64 min read


सीआयडी कार्यालयासमोर रोहित पवार समर्थकांचा राडा!
पुणे: अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणाचा तपास करणार्या सीआयडी कार्यालयात आज दुपारी मोठा राडा झाला. व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंह यांना चौकशीसाठी बोलावले असताना त्यांना ‘ शाही पाहुणचार केल्याचा गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या समर्थकांसह सीआयडी मुख्यालय गाठले. यावेळी पोलिस अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. रोहित पवार आपल्या कार्यकर्त्यांसह सीआयडी कार्यालयात दाखल झाले असता अधिकार्यांनी
Mar 61 min read


शेतकर्यांसाठी सरकारची मोठी, ऐतिहासिक घोषणा शेतकर्यांना दोन लाखापर्यंत कर्ज माफी, नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना आनुदान
मुंबई: राज्य सरकारने आज शेतकर्यांना दिलासा देणारी मोठी घेाषणा केली आहे. विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांसाठी अत्यंत महत्वकांक्षी कर्जमाफीची घोषणा केली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पिक कर्ज थकित असणार्या शेतकर्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असून या योजनेचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ असे करण्यात आले आहे. योजनेचे स्वरुप : दोन लाखांपर्यंत कर्जमाफी: ज्या शेतकर्यांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 20
Mar 61 min read


इराणवरील हल्ल्याचा विनापरवान निषेध; माजी आमदारासह 26 जणांवर सोलापुरात गुन्हा
सोलापूर: सोलापुरात विनापरवाना आंदोलन करणे मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या चांगलेच आंगलट आले आहे. जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्यासह 26 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवाना आंदोलन करून जमाबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी आमदार आडम, अनिल वासम, युसूफ हनीफ शेख, नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी सर्व रा. सोलापुर यांच्यासह 26 जणांवरा सदर बाझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोलापुरा
Mar 51 min read


महादवे मुंडेंची हत्या धनंजय मुंडेनीच घडवून आणली, ब्रेन मॅपिंग अहवाल जाहीर करा; तुम्हा कोणी संपवत नाही, तुम्हीच परळीतल्या दहा लोकांना संपवलं- राजाभाऊ फड
बीड: परळीतील व्यापारी महादेव मुंडे प्रकरणात एसआटीने पाच जणांची ब्रेन मॅपिंग व काहींची नार्कोटेस्ट केल्याची माहिती एसआयटीकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात अद्याप आरोपी निष्पन्न नसून कोणालाही अटक झाली नाही. त्यातच आज राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते राजाभाऊ फड यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक दावे करत महादवे मुंडे यांची हत्या धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच झाली असून ब्रेन मॅपिंगचा अहवाल जाहिर करण्याची मागणी केल्याने बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महादवे मुंडे यांच्
Mar 54 min read


पुण्यातील लोहगावात पोलिसांचा विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज; विद्यार्थी जखमी
पुणे: पुण्याच्या लोहगाव येथील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वसतिगृहात मंगळवारीरात्री होळी साजरी करणार्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून कॅम्पसमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलाजीच्या वसतिगृहात विद्यार्थी धुलिवंदन साजरा करत होते. रात्रीच्या वेळी अचानक पोलिस कर्मचारी वसतिगृहात घुसले आणि त्यांनी सेलबे्रेशन थांबवण्याचे आदेश दिले. कॅम्पसमध्ये काही
Mar 51 min read


तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विमान इराक- इराण पाडणार होते -रोहित पवारांचा धक्कादायक दावा
मुंबई: अजित पवारांच्या विमान अपघातातील कंपनी व्हीएसआर वर बेजाबाबदारपणाचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच विमान इरान पाडणार होतं असा खळबळजनक दावा केला आहे. रोहित पवार मुंबई येथील आयोजीत पत्रकार परिषदेत अजितदादांच्या विमान अपघाताच्या डीजीसीएच्या प्राथमिक अहवालावर बोलत होते. दिवंगत अजितदादांच्या बारामती विमान अपघात प्रकरणी चार दिवसांपूर्वी डीजीसीएचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध झाला. डीजीसीएच्या अहवालावर अक्षेप घेत रोहित पवार यांनी आज मुंबई येथी
Mar 42 min read
bottom of page