top of page


राष्ट्रवादीचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा लाडकी बहीण योजनेतील वंचित महिलांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस चा संबंधित मंत्र्यांच्या निवास्थानी मोर्चाचा इशारा
यवतमाळ: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी, तांत्रिक त्रुटी, नवीन पात्र युवतींना अर्जाची संधी तसेच विविध कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी युवती काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. पक्षाच्या कार्याध्यक्ष मनिषा काटे (भोसले) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मनिषा काटे (भो
Jun 21 min read


कॉक्रोच जनता पार्टीकडून मोदी सरकारविरोधात दिल्लीत पहिल्या आंदेालनाची घोषणा , सोशलमीडियावरुन देशभरातील युवकांना सहभागी होण्याची अवाहन; अभिजीत दिपके उपस्थितीत राहणार
सोशल मिडियात तरुणाईचे आकर्षण ठरलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने केंद्र सरकारविरोधात पहिल्या आंदोलनाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे सध्या अमेरिकेत असलेले पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके ही भारतात परतणार असून या आदोलनात सहभागी होणार आहेत. त्यांनी देशभरातील पार्टीच्या सदस्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियासह जगभरात कॉक्रोच जनता पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. या डिजिटल पार्टीचे सोशल मीडियात कोट्यवधी फॅालोवर्स आहेत. सोमवारी दिपके यांनी
Jun 21 min read


पुणे विषारी दारुकांडातील आरोपींवर फुगेवाडीकराचा हल्ल्याचा प्रयत्न सीआयडीच्या ताफ्यासमोर प्रचंड गोंधळ, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनुचित प्रकार टळला
पुणे: पुण्यातील पिंपरी- चिंचवड फुगेवाडी आणि हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विषारी दारुमुळे 18 हून अधकि जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात 22 हून अधिक अधिकारी, कर्मचार्यांना निलंबीत करण्यात आलं आहे. प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. आज या प्रकरणातील आरोपींना सीआयडीच्या पथकाने घटनास्थळी आणले तेव्हा संतप्त नागरिकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला. फुगेवाडी येथील विषारी दारुकांडात 18 हून अधिक लोकांच
Jun 11 min read


जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठं यश; सरकारने शब्द पाळला मराठा आरक्षण लढ्यात मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना नोकरीचा मार्ग मोकळा
मुंबई : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी लढा देणार्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या आंदोलकांच्या वारसांसाठी राज्य सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. एसटी महामंडळाच्या धर्तीवर आता एमआयडीसीमध्ये वारसांना नोकरी मिळणार आहे. याबाबत मराठा आरणि आंदोलनात मृत्यू पावलेल्या आंदोलकांच्या वारसांची पडताळी करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. मराठा आरक्षण आणि वेगवेगळ्या मागण्यासाठी मागील आवड्यात शनिवारी मनोज जरां
Jun 12 min read


तब्बल 1.25 कोटी लाडक्या बहिणीं ठरल्या अपात्र , सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र
मुंबई : राज्य सरकारच्या महत्वकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून राजकारण तापलं आहे. केवायसी आणि इतर कारणांमुळे लाखो महिला योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. आधी योजनेतील लाभ घेतलेल्या महिलांना अपात्र ठरवल्यावरुन विरोधकांनी सत्ताधार्यांवर टीकास्त्र डागलं आहे. सरकार योजना बंद करण्याच्या विचारात असल्याचा अरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्याच दरम्यान शरद पवार गट राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी योजनेसंदर्भात धक्का दायक खुलासा केला आहे. गेल्या काह
Jun 12 min read


भाजपकडून विधानपरिषदेच्या 11 जागांवरील उमेदवार्या जाहीर
मुुबई: भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 11 जागांवर आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात धाराशिव, लातूर, बीडमधून बसवराज पाटील, आहिल्यानगरमध्यून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भंडारा- गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राम्हणकर, अमरावतीतून प्रविण पोटे पाईल यांना उमेदवारी जाहिर झाली आहे. तसेच जळगावमधून नंदकिशोर महाजन आणि नागपूरमधून डॉ. रजीव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे सर्व उमेदवार आता उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपकडून या
May 311 min read


बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा वॉर ! धनंजय देशमुख यांच्यावर बीड पोलिसात गंभीर गुन्हा; घटना घडलीच नसल्याचं पोलिस तपासत उघड
बीड: मस्साजोगचे दिवंगत सरपंच सांतेष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावर पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबजनक अरोप करण्यात आला. धनंजय देशमुख यांच्या विरोधात समाधान खिंडकर यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपाची चक्रे फिरवली असता अशी काही घटना घडलीच नसल्याचे समोर आल्याने दोन्ही बाजूंनी खोटे गुन्हे दाखल केल्याचे निष्पन्न झाले आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हाद्दीतील मांजरीसुंबा शिवारातील एका हॉटेलमध्ये धनंजय देशमुख यांनी आपल्याला पिस्तुल लावून जि
May 312 min read


जरांगे पाटील धनंजय मुंडे यांच्यातील वादाचा पुन्हा तोंड फुटले? धनंजय मुंडे यांच्यासह तीन आरोपींच्या ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्टची मागणी
छत्रपती संभाजीनगर : अंतरवाली सराटीमध्ये रखरखत्या उन्हात उपोषणानंतर जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पीटलमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. आमदार प्रसाद लाड यांनी आज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी कथित घातपात प्रकरणावरुन त्यांनी पुन्हा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या ब्रेन मॅपिंग नार्कोटेस्टची मागणी केली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यातील वाद उभ्या महाराष्ट्रासमोर आहे.
May 312 min read


मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय
जालना : मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवली सराटी येथे सुरू पुन्हा एकदा रणरणत्या उन्हात उपोषणास बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मध्यरात्री 1:30 आपले उपोषण वाजता मागे घेतले. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत तब्बल दीड तास चाललेल्या सविस्तर आणि सकारात्मक चर्चेनंतर जरांगे यांनी हा मोठा निर्णय घेतला.तत्पूर्वी जरांगे पाटील यांनी आरक्षणावर अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा केली. कडक उन्हात विना छत, मंडप अथवा सावला कोणताही अश्रय न घेता उपोषणाला बसल्यामुळे मनोज जरांगे
May 312 min read


संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू
बीड: बीडमध्ये गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे बीडचं बिहार झालंय का असं उगाच म्हटलं जात नाही. अशातच मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देखमुख प्रकरणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील साक्षीदाराला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. साक्ष दिली तर तुला आणि धनंजय देशमुख यांना ठार मारू, अशी धमकी दिल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील साक्षीदार दादा खिंडकर या
May 311 min read


सरकारचं शिष्टमंडळ अंतरवालीत दाखल, जरांगे पाटील उपोषण सोडणार? ; जरांगे पाटलांची अभ्यासकांसी चर्चा
जालना: मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज रखरखत्या उन्हात अमरण उपोषणाला सुरुवात केली. उपोषणा पूर्वी सरकारच्या शिष्ठमंडळाने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली, मात्र मागण्यावर ठाम राहून जरांगे यांनी उपोषण सुरू केले. उपोषण सुरू होताच सरकार दरबारी हालचालींना वेग आला. जरांगे पाटीलयांच्या मागण्यांनुसार सरकारने अश्वासनाचा मसूदा शिष्ठमंडळासमवेत आंदोलनस्थळी पाठवला. पण अभ्यासकांशी चर्चेनंतर निर्णय घेण्याचे जरांगे पाटील यांनी शिष्ठमंडळास अश्वस्थ केल
May 301 min read


मुंबईसह देशाच्या राजधानीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट!दिल्लीत 9 जणांना अटक; अरोपींकडून अत्याधुनिक शस्त्र, संशयित साहित्य ताब्यात दिल्ली पोलिसांची कारवाई
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतून खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. दिल्लमध्ये पोलिसांनी एकूण नऊ जणांना अटक केली आहे. या नऊ जणांचा दिल्ली, मुंबई तसेच देशातील इतर महत्वाच्या शहरांवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट होता, अशी माहिती समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण नऊ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या हिटलिस्टवर मुंबई शहरदेखील होते. दिल्ली पोलिसांनी एकूण नऊ जणांना अटक केली आहे. त्यांचा दिल्ली, मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याचा कट होता, अशी माहिती समोर
May 301 min read


ममता बॅनर्जींचे भाचे खासदार अभिषेक बनर्जी यांच्यावर हल्ला
पश्चिम बंगाल येथे बॅनर्जी यांची सत्ता जाऊन प्रथम भाजपाचे सरकार आल्यानंतर भाजपा आणि टीएमसी कार्यकर्त्यांमधील संघर्ष संपण्याचे नाव घेत नसताना, आता पश्चिम बंगालमधील सोनारपूर येथे टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ल्याची माहिती समोर येत आहे. काही निदर्शकांनी त्यांचा रस्ता आडवत त्यांच्यावर दगड फेक केली. यावेळी सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई करत त्यांना हेल्मेट घालून सुरक्षितपणे जमावापासून कसेबसे बाहेर काढल्याचे म्हटले जात आहे. हा प्रकार सोनारपूर येथील कामराबाद भागात घडल्याच
May 302 min read


जरांगे पाटलांची दक्षता घेण्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रशासनाला सूचना
जालना: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून पुन्हा उपोषणाला सुरूवात केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. रणरणत्या उन्हात बाज टाकून जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केले आहे. अशातच आता मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रशासनाला मोठा आदेश दिला आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करावी तसेच जरांगे पाटलांची तब्येत बिघडू नये याची प्रशासनाने दक्षता घ्यावी अशा सूचना मंत्री पकंजा मुंडे यांनी दिल्या आहेत. जरांगे पाटी
May 301 min read


मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद
जालना: मराठा आरक्षण आंबलबजावणीसह इरतर मागण्यांसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी (दि.29) सकाळी दहा वाजल्यापासून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा अमरण उपोषण सुरू केले आहे. जरांगे पाटील यांनी जाहिर केल्यानुसार रणरणत्या उन्हात कुठलेही छत, मंडप, झाड अथवा सावलीचा अश्रय न घेता खुल्या मैदानात (शेतात) डोक्याला भगवा रुमाल गुंडळून विना पायतान कठोर अमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसह हैदराबाद गॅझेट नुसार प्रमाणपत्र, सातारा
May 304 min read


जायकवाडीच्या पाण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांच्या घरासमोर उपोषणाचा इशारा; विराट बैलगाडी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, रखरखत्या उन्हात शेतकर्यांचा टाहो
बीड: येत्या दीड महिन्यात गोदावरी-सिंदफणा नदीजोड प्रकल्प व उपकालव्याचे सर्वेक्षण करा, १६८ टीएमसी मध्ये बीड जिल्ह्यातील शेतीला हक्काचे पाणी द्या यासह इतर मागण्या पूर्ण करा, अशी मागणी विराट बैलगाडी मोर्चातून रखरखत्या उन्हात आलेल्या शेतकर्यांनी केली. मागणीची पूर्तता नाही झाल्यास पायी दिंडी काढत जलस़ंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला. यावेळी कालीदास दादा आपेट, सुशीलाताई मोराळे, भाऊसाहेब जरांगे पाटिल, समन्वयक दिनेश गुळवे, राहुल लोंढे, अप्पासा
May 302 min read


गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा
शाम देऊलकर दिल्लीचे महाराष्ट्राशी नाते फार जुने आणि ऐतिहासिक आहे. पण असं असलं तरी रांगड्या महाराष्ट्राशी 'दिलवालों की दिल्ली'चं फारसं कधी जमलं नाही. हे सांगायचं कारण म्हणजे तब्बल दोन दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर जवळपास अर्ध्या डझन मंत्रिमंडळाने दिल्लीत तळ ठोकला होता. आता नवी दिल्ली देशाची राजधानी आहे म्हटल्यावर काँग्रेस असो वा भाजप या राष्ट्रीय पक्षांची मुख्य कार्यालये दिल्लीतच असणार हे स्वाभाविक आहे. त्यामुळे आधी काँग्रेस आणि आता भाजप या
May 303 min read


सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक प्रेम प्रकरणाचा दुर्दैवी अंत बदनामीच्या भीतीने मुलाची आत्महत्या; विरह सहन झाल्याने सावत्र आईने गळफास घेवून संपवली जीवनयात्रा
बीड: समाजव्यस्थेतील अतुट नात्याची नैतिकता ओलांडून एकत्र आलेल्या सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधाचा अत्यंत दुर्दैवी शेवट झाल्याचे बीडच्या आंबेजागाईमधून समोर आले आहे. बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने देखील रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे केज आणि अंबाजोगाई तालुक्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील सोनी
May 292 min read


भारतात इबोला व्हायरसची एंट्री? युगांडाहून परतलेले दोन प्रवासी क्वारंटाईन
आफ्रिकेतील इबोलाच्या वाढत्या संकटाला पाहता डब्ल्यूएचओने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. त्यानंतर भारत सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. पण भारतासह महाष्ट्रात इबोला व्हायरसची एंट्री झाली काी काय अशी भीती निर्माण झाली आहे. नागपूर विमानतळावर युगांडावरून एक प्रवासी परतला आहे. त्यामुळे इबोलाच्या धोक्याने नागपूर विमानतळ हायअलर्टवर आहे. या 47 वर्षीय प्रवाशावर आरोग्य विभागाची नजर असून सध्या तरी त्याच्यामध्ये इबोलाचे कोणतेही लक्षणं दिसत नाहीत. पण सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्याला पु
May 281 min read


जरांगे पाटलांचा एल्गार रणरणत्या उन्हात उपोषण, बस्स.. आता आरपारची लढाई, 30 मे पासून आंतरवली सराटीत उपोषण; उष्माघाताने मेलो तर मुख्यमंत्री जबाबदार - जरांगे पाटील
जालना: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाना साधत आरक्षणाच्या मुद्यावर वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर शनिवार दि. 30 मे पासून आतापर्यंत देशात कधीही झाले नसेल असे कठोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे जरांगे पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महिनाभरापूर्वी पत्रकार परिषदेत आंदोलनाचा इशारा दिल्या नंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्
May 282 min read
bottom of page