top of page


मुंबईत श्रेय चोरणारी टोळी, यात अबोल बालकांचाही समावेश- मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराला आज सुरूवात झाली. वरळीत महायुतीची प्रचार सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर सडकून टीका केली. काही लोक आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत असा आरोप करताना मुख्यमंत्र्यांनी केला आहे. तसेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचा उल्लेख अबोध बालके असा केला. तसेच इतरही अनेक मुद्यांवरून ठकारेंवर निशाना साधला. प्रचार सभेला संबोधीत करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आज मुंबईत महायुतीच्या प्रचाराचा नारळ आपण फोडला आहे, आज
Jan 42 min read


महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीच एकनाथ शिंदेंना मुंबईत धक्का
मुंबई: महानगरपालीका निवडणुकीच्या मतदानापूर्वी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. गोरेगावमधील 200 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. उमेदवारी आणि पदांच्या वाटपावरून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचा हा सामूहिक राजीनामा आहे. मुंबई गोरेगाव आणि दिंडोशी भागात विभागप्रमुखांसह 200 हून अधकि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. या वादाचा मुख्य मुद्दा वार्ड क्रमांक 54 आहे, जो शिंदे गटाकडे होता. परंतु
Jan 41 min read


ठाकरे बंधूंचा संयुक्त वचननामा कायद्याच्या कचाट्यात?
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वचनामा प्रसिद्ध करण्यात आला. स्वत: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यासंनी शिवसेना भवनात एकत्रित येत ‘ मुंबईसाठी शिवशक्तीचा वचननामा’ मांडला. ‘ ठाकरेंचा शब्द ’ अशी टॅगलाईन असलेल्या या वचननाम्यामध्ये अनेक अश्वासने देण्यात आली आहेत. ठाकरे बंधूंनी वचननामा प्रसिद्ध केल्यानंतर काही मिनिटांतच त्यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ‘ आरोपत्रा’ च्या माध्यमातून प्रहार केले. त्यानं
Jan 41 min read


मुंबईकर उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवणार नाहीत- मंत्री बावनकुळे
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संयुक्त वचननामा प्रकाशित केला. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार, असा निर्धार त्यांनी केला. ठाकरे बंधूंच्या वचननामावर भाजपने पहिली प्रतिक्रीया दिली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.“ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकासाचे मॉडेल उद्धव ठाकरे कधीच पुढे नेऊ शकत नाहीत. फडणवीस यांनी मुंबईचे 2047 चे व्हिजन तयार के
Jan 41 min read


शिवसेना भवनामध्ये ठाकरे बंधूनी केला संयुक्त ‘वचनामा’ प्रकाशित
मुंबई: मुंबईसह राज्यभरातील महापालिकांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातवरण तापले असतानाच आज (दि.4) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू संयुक्त वचननामा प्रकाशित केला. यावेळी दोन्ही नेत्यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेला नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी काही दिवसांचाच अवधी उरला असतानाच ‘ ठाकरे बॅ्रंंड’ प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. आज शिवसेना भवन ये
Jan 42 min read


मनेसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं लवकरच लाव रे तो व्हिडिओ! बिनविरोध विजयी उमेदवारांच्या विरोधात पुरावे, कोर्टात जाण्याचा जाधव यांचा इशारा
मुंबई: राज्यातील 29 महानगरपालीका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काल (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज मागे घ्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे बंडखेारांची नाराजी दूर करून त्यांची मनधरणी करणे प्रत्येक पक्षासमोर आव्हान होते. त्यात भाजपाने अनेक नाराजांची समजूत काढण्यास यश मिळवले. शिवाय अपक्ष आणि प्रमुख विरोधी पक्षांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राज्यात महायुतीचे 65 उमेदवार बिनविरोध विजयी झाले. आता या उमेदवारांबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे या उमे
Jan 31 min read


राज्यात भाजप सरकारमुळेच लोकशाहीला गालबोट; निवडणुकीत गुंडगिरी, धमक्या, ब्लॅकमेलिंगचा असुरी प्रयोग- संजय राऊत
मुंबई : राज्यात भाजप सरकारमुळे लोशाहीला गालबोट लागत आहे, तर राज्यातील महापालिका निवडणुकांत व मुंबईतील निवडणुकांत धमक्या, ब्लॅकमेलिंग दहशतीचे गैरप्रकार सुरूच आहेत. कल्याण- डोंबिवलीत मोठा गोंधळ झाल्याचा गंभीर आरोप करत खासदार संजय राऊत यांनी बिनविरोध मिरवणूकां विषयी त्यांनी सरकावर तीव्र टीका केली आहे. म्हणाले. राज्यातील 29 महापालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना पक्षाचे एकून 66 नगरसेवक बिनविरोध घोषीत झाले आहेत. शिवाय राष्ट्रवादी ( अजित पवार) पक्षाचेही दोन नगरसेवक बिनविरोध घोषीत झाले
Jan 32 min read


विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या अडचणी वाढल्या, संजय राऊतांकडून व्हिडिओ व्हायरल.
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप- शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेना- मनसेमध्ये थेट लढत होत आहे. त्यासाठी या पक्षांमध्ये नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. खासदार संजय राऊत, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नार्वेकर यांनी उमेदवारांना धमक्या दिल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडिओच सोशल मिडियात पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये नार्वेकर आणि माजी
Jan 31 min read


गुंडगिरीमुळे बिनविरोध 65 नगरसेवक झाले - इम्तियाज जलील
छत्रपती संभाजीनगर : एमआयम नेते इम्तियाज जलील यांनी आमदार संजय शिरसाट यांनी एमआयएमवर केलेल्या “ पैशांची दलाली” च्या आरोपांना जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. जलील यांनी जालन्यात मुख्यमंत्र्यांकडून एका युवतीचा बुरखा काढल्याच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला, याला निंदनीय कृत्य संबोधत कारवाईची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याने केलेल्या टिप्पणीवरही त्यांनी आक्षेप घेतला. शिरसाट यांच्यावर पलटवार करताना जलील यांनी, “ खोक्यामध्ये विकणारे लोक माझ्यावर बोट दाखवणार का?” असा
Jan 31 min read


बिनविरोध आलेले नगरसेवक आयोगाच्या रडावर! निवडणूक आयुक्तांच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांना सूचना
मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रक्रियेत संशयास्पद बाबी घडल्याचा आरोप करत विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. छाननीनंतर अर्ज वैध ठरल्यापासून राज्यभरातून सत्ताधारी नेत्यांकडून तसेच यंत्रणांकडून अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हाधिकार्यांकडे करण्यात येत आहेत. त्या पार्श्
Jan 32 min read


महापालिकां निवडणुक: बंडखोर कोणाचा खेळ बिघडवणार?
मुंबई: महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. सर्व राजकीय पक्षांमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी उफाळून आल्याचे दिसून आले. यात भाजपमधल्या नाराजांची संख्या अधिक होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नाराज कार्यकर्त्यांना फोन करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, यातल्या बहुतेकांनी त्यांचे उमेदवारी अर्ज घेतले. पण काही ठिकाणी नाराज मागे हटले नाहीत, त्यामुळे आता निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. मुंबईमध्ये आध
Jan 21 min read


मुंबईत मनसेला खिंडार, 11 जणांचा भाजपात प्रवेश मातोश्रीचा प्रभाव असलेल्या वांद्रेतील पदाधिकार्यांचा राज ठाकरेंना जयमहाष्ट्र !
मुंबई: महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना नाराजांनी थेट बंडाचे निशान फडकवले. सत्ताकरणांसाठी गोळाबेरजेतील हातचा गायब करू पाहणार्या बंडखोरांना थंड करण्यासाठी पक्षश्रेष्टींची प्रतिष्ठा पणाला लागली, तर स्थानिक नेतृत्वाचे नाके नऊ आल्याचे दिसून आले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. एकीकडे कल्याण- डोंबिवली आणि मुंबई मनपा निवडणुकीत मनसे उमेदवारांनी अर्ज मागे घेत असताना दुसरीकडे मातोश्रीचा प्रभाव असलेल्या वांद्र
Jan 21 min read


नांदेड महापालिका निवडणुक: भाजप उमेदवारीसाठी अशोक चव्हाणांनी 50 लाख घेतले- भानुसिंग रावत ; शिवसेना (शिंदे) गटाचे दोन अधिकृत उमेदवार पळवल्याचा आमदार कल्याणकरांचा आरोप
नांदेड : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आयाराम-गयारामांची संख्या वाढली असून बाहेरून आलेल्या लोकांना तिकिट दिलं जात असल्याचा आरोप सर्वच पक्षातून होत आहे. नांदेडमध्येही तशीच काहीशी स्थिती आहे. दरम्यान भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर उमेदवारीसाठी 50 लाख रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप त्यांचे जुने सहकारी माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांनी केला आहे. या आरोपमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे भानूसिंग रावत यांनी निष्ठावंत कार
Jan 21 min read


खासदार संजय राऊतांचे सरसंघचालक मोहन भागवतांना आव्हान, भाजपलाही इशारा
मुंबई: महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना दिसून आलेल्या बंडखोरीमुळे एकीकडे राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता मराठी अमराठीवादची भर पडली आहे. मराठी मुद्यावरून सुमारे 20 वर्षानी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले यानंतर सुरुवातील बेस्टची निवडणुक आणि आता मुंबई मनपा निवडणुक एकत्र लढण्याचा निर्णय ठाकरे बंधूंनी घेतला आहे. मुंबई मनपा निवडणुकीतही ठाकरे बंधुंनी मराठीचा मुद्दा लावून धरला आहे. मुंबई उपनगरांसह लगतच्या परिसरात मराठी बोलण्याच्या मुद्यावरून मनसे आक्रमक अस
Jan 21 min read


शरद पवारांच्या खासदाराचा अजित दादांसोबत हेलिकॉप्टर प्रवास?
बीड: उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आज बीड दौर्यावर होते. शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रशासकीय दौर्यामध्ये नियोजित कामे आटोपून उपमुख्यमंत्री पवार हेलीकॉप्टरद्वारे पुण्याकडे रवाना झाले. विशेष म्हणजे बीडचे खासदार बजरंग सोणवने अजित दादांसोबत हेलिकॉप्टरने रवाना झाल्याने चर्चांना उधान आले आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नुकत्याच नगरपरिषद, नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर महानगरपालिकांची निवडणुक सुर
Jan 11 min read


भाजपच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज मागे घेतला; पूजा मोरेंना अश्रू अनावर
पुणे: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग क्रमांक 2 मधून पूजा मोरे यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली होती. मात्र, या उमेदवारीवरून प्रचंड टीका भाजपा कार्यकर्त्यांकडून पक्षावर होत होती. अखेर भाजपा कार्यकर्त्यांनी उघडलेल्या मोहिमेनंतर पूजा मोरे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आहे. पूजा मोरे यांनी पहलगाम हल्ल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया आणि फडणवीसांवर केलेले टीका यावरून कार्यकर्त्यांकडून प्रचंड ट्रोल केले जात होते. त्यानंतर अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे यांच्या डोळ्यात पा
Jan 12 min read


पुण्यात अखेरच्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं
पुणे : पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 110 तर शरद पवार गटाला 50 आणि 5 जागा इतर पक्षांना देण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गुप्त बैठका आणि गाठिभेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं ठरलं आहे. आता पिंपरी चिंचवड पाठोपाठ पुण्यातही काका- पुतणे एकत्र आले आहेत. चिन्हांबाबत चालू असलेल्या वादावर आज मार्ग तोडगा यशस्वी तोडगा काढण्यात आला आहे. आज अखेरच्या बैठकीत चिन्ह आणि जागावाटप बाबत निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला
Dec 30, 20251 min read


शिवसेनेने दिलेल्या 15 नावांची यादी वाचून भाजपने चर्चाच बंद केली
पुणे: पुण्यात भाजप आणि शिवेसेनेच्या गोटात प्रचंड हालचाली सुरू आहेत. विशेष म्हणजे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजप आणि शिवसेनेची युती होणार का? याबाबत सस्पेन्स राहीला. अखेर ही युती तुटली आहे. पण ही युती नेमकी का फिस्कटली? याची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे. भाजप- शिवसेना युतीच्या चर्चा व उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तासापर्यंत सुद्धा संपलेल्या नव्हत्या. शिवसेना पस्तीत ते चाळीस जागेची मागणी भाजपकडे करत होती. मात्र भाजप फक्त 15 जागा देण्यास तयार होते. यावरून
Dec 30, 20252 min read


छ.संभाजीनगरमध्ये निष्ठावंत आक्रमक, तिकीट कापल्याने आक्रोश
छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा झाला आहे. निष्ठावंतांना डावलून नवीन आलेल्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप करत भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. शेकडो कार्यकर्ते पेट्रोल कॅनसह भाजप नेते अतुल सावे यांच्या कार्यालवर पोहोचले. नाराज कार्यकर्त्यांनी अतुल सावे यांच्या कार्यालयाला घेरावो घालत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजीनगर मध्ये इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते, प
Dec 30, 20251 min read


नाशिकमध्ये भाजपच्या एबीफॉर्मची पळवा-पळवी; कार्यकर्त्यात राडा!
नाशिक: नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी भाजपचे अधिकृत एबीफॉर्मची पळवा पळवीचा प्रकार घडला. निष्ठावंतांना डावलून आयारामांना उमेदवार्या वाटल्याचा आरोप करत आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणुक लढवत आहे. एकून 122 जागांसाठी आज भाजपकडून अधिकृत एबीफॉर्म वाटप करण्यात आले. एबीफॉर्म वाटपासाठी सकाळी भाजप आमदार सिमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल डकले यांच्यासह मंत्री गिरीश
Dec 30, 20252 min read
bottom of page