top of page


अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी डीजीसीएचा प्रथमिक अहवाल प्रसिद्ध; दुर्घटनेपूर्वी विमान झाडाला धडकले, अंतिम अहवालास वेळ लागणार !
मुंबई : उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवार यांच्यासमवेत एकून पाच जणांना या भीषण अपघातात जीव गमवावा लागला. या घटनेला आज एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. अजित पवार यांचा अपघात कि घातपात यावर शंका उपस्थित करत रोहित पवार, आमोल मिटकरी यांचा घटनेचा सखोल आणि निष्पक्षपाती तपासाठी पाठपुरवा सुरू आहे. त्यातच आता अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत डीजीसीएचा प्रथामिक अहवाल समोर आला आहे. यामध्ये धक्कादाय
Feb 282 min read


अजित पवार धुक्याने गेले, का धोक्याने; इथेच संशयाची सुई जास्त - राज ठाकरे
मुंबई : अजित पवारांचा अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला? अशी शंका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी आज शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत रोहित पवारांनी राज ठाकरेंसमोर आपल्या मनात असणार्या शंका बोलून दाखवल्या. तसंच पोलिस ठाण्यात गेल्यानंतर एफआयआर दाखल करण्यास नकार देताना काय घडलं हे देखील सविस्तरपणे सांगितलं. यानंतर राज ठाकरेंनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली आहे. “ अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, त्या घटनेबद्दल अनेक शंका-
Feb 272 min read


दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया निर्दोष
नवीदिल्ली: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आज (दि.27) दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आले. दिल्ली न्यायालयाने सीबीआयला कड शब्दांत फटकारले आणि फिर्यादी पक्ष आपले अरोप पुरव्यांसह सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचा निकाल दिला. मोठा कट आणि गुन्हेगारी हेतू असल्याचे दावे न्यायालयीन छाननीत टिकले नाहीत, असे नमूद केले. न्यायालयाने ताशेरे ओढले : या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने सीबीआयच्या तपासावर म
Feb 271 min read


अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी, अनेक पुरावे मिळाले आहेत सीआयडीची पत्रकार परिषदेत माहिती
पुणे : अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास अत्यंत योग्य दिशेने प्रोफेशनल पद्धतीने सुरू असल्याचं सीआयडीने सांगितलं आहे. पहिल्या दिवसापासून प्रोफशनल पद्धतीने तपास सुरू आहे. या आकस्मित मृत्यूमागे घातपात आहे का हा देखील तपासाचा भाग आहे. दुसरा भाग म्हणजे गुन्हेगारी कट आहे का याचा देखील तपास होत असल्याची माहिती सीआयडीचे अप्पर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली. पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अतापर्यंत सुरू असलेल्या तपासाची दिशा आणि वेग याबद्दल माहिती दिली
Feb 262 min read


दादा नाहीत असलं विलिनीकरण काय कामाचं? एफआयआर घेण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद नाही, पोलिसांवर कोणाचा दबाव - रोहित पवार
बारामती : अजित पवार यांच्या बारामती विमानतळावरील विमान अपघाती मृत्यूला एक महिना पूर्ण होत आहे. डीजीसीएच्या कंपनीवरील कारवाई नंतर रोहित पवार यांनी सहकार्यांसमवेत बुधवारी (दि.25) मरिन ड्राईव्ह पोलिस ठाणे गाठत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिस प्रशासन एफआयआर घेत नसल्याचा आरोप करत त्यांनी आज गुरुवारी (दि.26) बारामती पोलिस ठाणे गाठले. मात्र,इथेही पोलिस प्रशासनकडून एफआयआर दाखल करुन घेण्यास पोलिस प्रतिसाद देत नसल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत भा
Feb 263 min read


वाल्मिक कराडला ‘सुप्रिम’ दणका, सर्वोच्च न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळला
नवीदिल्ली : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या जामीनबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वाल्मिक कराडचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती एम.एस. सुंदरेश यांच्यासमोर आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने आज जरी जामीन नाकारला असला तरी वाल्मिक कराडला पुन्हा जामीनसाठी अर्ज करता येणार आहे, पण त्यासाठी वाट पहावी लागणार आहे. कारण जरी ट्रायल पुढे
Feb 262 min read


पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायल दौर्यावर, इस्त्रायली संसदेत हमासवर पंतप्रधान मोदींचा शब्दीक हल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ वर्षानंतर पुन्हा इस्त्रायलच्या दौर्यावर गेले आहेत. इस्तायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नीने विमानतळावर पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना विशेष गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी इस्त्रायली संसदेला संबोधित केले. यावेळी मोदी म्हणाले की, भारतीय जनेतच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. संसदेला संबोधित करणारा हा माझ्यासाठी पहिला भारतीय पंतप्रधान असण्याचा अभिमानाचा क्षण आहे. मला पुन्हा येथे येऊन खूप आनंद झाला आहे. पंतप्र
Feb 251 min read


आयुष समग्र क्रांतीचे दर्शन... राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी अनुभवली भव्य आरोग्य प्रदर्शनी !
बुलढाणा: भारताच्या महामाहीम राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्याहस्ते आज बुधवार (दि.25) श्रीक्षेत्र शेगाव येथे आयुष मंत्रालय भारत सरकार व अखिल भारतीय आर्युवेद महासंमेलनाच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय ‘ राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026’ चा अत्यंत उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी राष्ट्रपती महोदयांनी मेळाव्यातील भव्य आरोग्य प्रदर्शनीच्या विविध स्टॉल्सला भेट देऊन पाहाणी केली. पारंपारिक चिकित्सा पद्धती आणि आधुनिक आरोग्य सुविधांचा संगम असलेल्या या प्रदर्शनाने र
Feb 251 min read


रोहित पवार आक्रमक: मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात खडाजंगी? सुरु असलेली एफआयआर प्रक्रिया का थांबवली?,डीसीपींना फोन कोणाचा आला?; बारामतीत एफआयआर दाखल करणार
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी डिजीसीएने व्हीएसआर कंपनीच्या विमान उड्डाणास प्रतिबंध लावला आहे. त्याअणुषंगाने आज (दि.25) रोहित पवार व त्यांचे सहकारी कंपनीविरोधात एफआयर दाखल करण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात पोहोचले. मात्र, पोलिसांनी शेवटच्या क्षणी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने आमदार रोहिती पवार व पोलिसांत चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी रोहित पवार यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. डीसीपींना कोणाचा फोन आला आणि त्यांनी प्रक्रिया थांबवली? असा प्र
Feb 252 min read


रोहित पवारांच्या मागणी यश, डिजीसीएची मोठी कारवाई; व्हिएसआर कंपनीच्या विमानांना भारतात उड्डाण बंदी
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. पण हा अपघात की, घातपात याबद्दल वेगळाच संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषदा घेऊन विमान अपघाताबद्दल धक्कादायक माहिती आणि गंभीर आरेाप केले . त्यांनी मुख्य म्हणजे, त्या विमानाचा अपघात झाला, त्या विमानाच्या कंपनीवरही गंभीर आरोप केले होते. अखेरीस रोहित पवारांच्या या लढ्याला यश आलं आहे. व्हीएसआर कंपनीच्या उड्डाणावर देशभरात बंदी घालण्यात
Feb 252 min read


भटक्यांच्या पंढरीत मुस्लिम दुकानदारांना पुन्हा विरोध मढी ग्रामपंचायतीचा ठराव; हिंदू- मुस्लिम वाद कोर्टात पोहचला, न्यायालयाकडून ठरावाला स्थगिती
आहिल्यानगर, दि. 24: मढी (ता. पाथर्डी) श्री क्षेत्र कानिफनाथ संस्थानची यात्रा रंगपंचमीला भरते. भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या या देवस्थान स्थळी जात-पात, धर्म-पंथा च्या सर्व भिंती गळून पडतात. असे असताना गेल्या दोन वर्षापासून येथील यात्रेला हिंदू-मुस्लिम भेदभावाचं गालबोट लागताना दिसत आहे. गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना दुकाने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. मढी ग्रामपंचायतीने तसा ठराव घेतला आहे. सरपंच संजय मरकड यांनी ठाराव जाहिल केल्याने पुन्हा
Feb 242 min read


महाराष्ट्र प्रदूषण नियंतण मंडळाचा औद्योगिक अस्थापनांसाठी मोठा निर्णय; संमतीपत्र मंजूरी व नुतनीकरणाचा कालावधी केला 50 टक्क्यांनी कमी
मुंबई: राज्य शासनाच्या इज ऑफ डुईंग बिजनेस धोरणातंर्गत राज्यातील लाल, नारिंगी आणि हरित आस्थापनांच्या उदयोग उभारणी, संमतीपत्र मंजुरी व त्याचे नुतनीकरण यासाठी मंजूर करण्याचा कालावधी हा ५० टक्क्यांपेक्षा कमी केल्याने राज्यातील औदयोगिक आस्थापनांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र शासनाचे इज ऑफ डुईंग बिजनेस धोरण व राज्य शासनाने आखलेले विकसित महाराष्ट्र २०४७ या धोरणाअंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील औदयोगिक आस्थापनांना हरित संवर्गातील उदयोग उभारणीसाठी, उदयोग सुरू
Feb 241 min read


दिल्लीला जाणारं विमान कोसळलं, उड्डाण घेताच संपर्क तुटला... रांची विमानतळावरुन केलं होतं उड्डाण
रांची: झारखंडमधून मोठी बातमी समोर येत आहे. रांची येथे एक मोठा विमान अपघात झाला आहे. टेकऑफनंतर काही वेळातच एका एअर अॅम्ब्यूलन्सचा अपघात झाला. हे विमान दिल्लीला जाण्यासाठी निघाले होेते. मात्र उड्डाण केल्यानंतर या विमानाचा संपर्क तुटला आणि काही वेळातच हे विमान कोसळलं. ही एअर अॅम्ब्यूलन्स एका रुग्णाला दिल्लीला घेऊन जात होती. चतरा आणि सिमरियाच्या सीमेवर विमान कोसळले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या विमानात एकूण 7 जण प्रवास करत होते अशीही माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर
Feb 231 min read


एपस्टीन फाईल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा- अॅड. प्रकाश आंबेडकर , 2 मार्चला मुंबईत सीएसएमटी समोर निदर्शने; सहभागी होण्याचे आवाहन
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एपस्टीन फाईलमधील उल्लेखावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ 2 मार्च 2026 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) समोर भव्य निदर्शने करण्याची घोषणा त्यांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे केली आहे. विविध समाजिक संघटनांच्या वतिने मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रामुख्याने तीन मुद्यांवर चर्चाकरण्यात आली. ज्यामध्ये एपस्टीन फाईलमध्ये पंतप्रधान मोदींच्
Feb 221 min read


जगाची झोप उडाली : रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला, 200 ड्रोन 50 मिसाईल्स डागल्या
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालूच आहे. हे युद्ध अजूनही थांबलेले नाही. येत्या 25 फेब्रूवारी रोजी या युद्धाला चार वर्षे पूर्ण होतील. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या युद्धाबाबत तोडगा काढण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु तरीदेखील सर्वमान्य असा तोडगा निघालेला नाही. असे असतानाच आता हे युद्ध नव्याने पेटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये युक्रेनमधील अने इमराती उद्ध्
Feb 221 min read


कर्नाटकात नेतृत्व बदलाचे वारे, मुख्यमंत्री सिद्धरामैया विरोधात आमदार एकवटले
कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदावरून सिद्धरामैया आणि उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांच्यातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. काँग्रेसमधील काही आमदारांनी नेतृत्व बदलाची उघडपणे मागणी केली आहे. डी.के. शिवकुमार 26 फेब्रूवारी रोजी दिल्लीमध्ये पक्षाच्या हायकमांकडची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, लिंगायत आणि वोक्कालिगा मतदारांना सांभाळण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर उभे आहे. रविवारी (दि.22) काँग्रेस आमदार एच.ए.इक्बाल हुसेन यांनी नेतृत्व बदलाच्या मागणीला दुजोरा
Feb 221 min read


मध्यपूर्वेत युद्धाला सुरूवात?, इस्त्रायलचा पहिला एअर स्ट्राइक; दहाजणांचा मृत्यू, प्रचंड नुकसान
जगाच्या मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. अमेरिका आणि इराण आमने-सामने आले आहेत. गेल्या वर्षी इराण आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध झालं होतं. त्यानंतर आता इराणमध्ये सुरू असलेल्या अण्विक प्रकल्पांवरुन अमेरिका आणि इराणमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. अमेरिकेनं मध्य पूर्वेत आपल्या युद्ध नौका तैनात केल्या आहेत. तसेच सैन्यबळ देखील वाढवलं आहे. एका खात्रीलाय वृत्तानुसार तर इराणवर हल्ला नेमका कसा करायचा? याचा एक रिपोर्ट अमेरिकेच्या संरक्षण विभागानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक
Feb 211 min read


व्हिएसआर कंपनीला मोठ्या राजकीय नेत्याचा पाठिंबा - रोहित पवार
केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी; मोदी-शहाच अजितदादांना न्याय देऊ शकतात नवी दिल्ली: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले होते. मात्र, हा विमान अपघात घातपात असल्याचा संशय राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदां घेवून व्यक्त केला होता. त्यानंतर आज शनिवार (दि.21) रोहित पवारांनी पुन्हा दिल्लीत पत्रकार परिष घेत केंद्रीय मंत्री नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी करत अनेक धक्कादायक दावे
Feb 211 min read


अजित दादांच्या विमानाचं सीसीटिव्ही नाकारलं, लवकरच प्राथमिक अहवाल समोर येणार?
मुंबई : अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवरुन सातत्यानं घात की अपघात हा प्रश्न समोर येत आहे. आमदार रोहित पवार यांनी दोन वेळा पत्रकार परिषदे घेऊन या संशयाचं धुकं वाढवलं असतानाच अजून एक घटना समोर आली आहे. बारामतीच्या नितीन यादव यांनी आरटीआयच्या माध्यमतून अजितदादांच्या अपघाताआधी मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे केली. मात्र 28 जानेवारीचे हे सीसीटिव्ही फुटेज देण्यास मंत्रालयानं नकार दिल्यानं संशयाचं धुकं अधिक गडद होत चाललं आहे. अजितदादांच्
Feb 201 min read


ट्रम्प यांच्या टॅरिफचा गेम ओव्हर, सुप्रीम कोर्टाचा दणका; भारतासह जगाला मोठा दिलासा
अमेरिकन राजकारणात आणि जागतिक अर्थव्यवस्थेत खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ लावण्याच्या निर्णयाला तिथल्या सुप्रीम कोर्टाने जोरदार दणका दिला आहे. कोर्टानं ट्रम्प यांनी लावलेले टॅरिफ पूर्णपणे बेकायदेशीर ठरवले आहेत. शुक्रवारी झालेल्या ऐतिहासिक सुनावणीमुळे ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांना मोठा झटका बसला असून, यामुळे भारत आणि इतर देशांवरील व्यापारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड
Feb 202 min read
bottom of page