top of page


बीडमध्ये राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर! आमदार प्रकाश सोळंकेचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
बीड : आमदार प्रकाश सोळंके यांनी आ. धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धनंजय मुंडे माझ्याविरोधात रणनीती आखत आहेत. माझ्या उमेदवारांच्या परभावासाठी धनंज मुंडे बैठका घेत असल्याचा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्याच पक्षातील सहकारी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडे माझा पराभव
Nov 17, 20251 min read


गॅस सिलिंडर होणार स्वस्त, भारताचा अमेरिकेसोबत एलपीजी करार
भारताने अमेरिकेसोबत एक वर्षाचा ऐतिहासिक एलपीजी आयात करार केल्याची घोषणा पेट्रोलियम मंत्री सिंग पुरी यांनी आज केली. हा करार उर्जा स्त्रोतांमध्ये विविधता आणण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपन्या आता अमेरिकेतून दरवर्षी 2.2 दशलक्ष टन एलपीजी आयात करतील, ज्यामुळे देशांतर्गत बाजापेठेत पुरवठा स्थिर होईल आणि किमतींना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. या करारानंतर भारतातील एलपीजी सिलिंडरच्या किमतीही कमी होऊ शकतात, असे मानले जाते. कारण सरकार परवडणार्या इं
Nov 17, 20252 min read


लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ , महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ई-केवायसी करण्याची दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत निर्धारित अंतिम मुदत वाढवून आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहित
Nov 17, 20251 min read


स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक स्थगित होणार? सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोग, सरकारला सुनावले खडेबोल .
नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात संनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने आज सुनावणी दरम्यान राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या अधिकारांची परीक्षा घेऊ नका, 60 टक्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयेागाला इशारा दिला आहे. राज्य सरकार आणि निवडणूक आयोग हे घटनापिठाने दिलेल्या निर्णयाच्या पुढे जात असेल त
Nov 17, 20252 min read


एवढं नालायक सरकार पाहिलंच नाही, सरकारवर विश्वास राहिला नाही- जरांगे पाटील मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेना क्लिन चिट दिल्याचा गंभीर आरोप!
अंतरवाली सराटी : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट प्रकरणातील तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. धनंजय मुंडे यांनीच कट रचल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार जरांगे पाटील यांनी नार्कोटेस्ट ला तयारी दाखवत थेट जालना पोलिस अधिक्षकांकडे अर्ज केला होता. जरांगे पाटलांनी चौकशी, तपासणीला सामोरं जाण्याची तयारी दर्शविली मात्र, धनंजय मुंडे यांच्याकडून प्रत्यूर आले नाही त्यामुळे आज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री द
Nov 17, 20253 min read


शेजारच्या देशातून मोठी बातमी: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2024 च्या हिंसाचार प्रकरणात शेख हसीना यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यामध्ये शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बांगलादेशच्या इंटरनॅशनल ट्रिब्यूनलकडून शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मानवेतविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यांमध्ये बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांना आता बांगलादेशच्या इंटरनॅशन
Nov 17, 20251 min read


जातियवादी राजकारण करणार्यांना बिहारच्या जनतेने आरसा दाखवला- पंतप्रधान मोदी
सुरत: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए आघाडीने बंपर यश मिळवलं आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदी गुजरात दौर्यावर आहेत. सुरतमधील एका सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अनेक जातीयवादी नेते बिहारमध्ये जावून जातीवर आधारित भाषण देत होते. याद्वारे ते जातीयवादाचे विष पसरवत असत. त्यांना टात होते की यामुळे त्यांना यश मिळले, मात्र यावेळी बिहारने त्यांना आरसा दाखवला असून जातीवादाचे विष नाकारले आहे. हा देशासाठी अतिशय उ
Nov 16, 20252 min read


नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का; लोह्याचे माजी उपनगराध्यक्ष शरद पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सध्या मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. नांदेडमध्ये अजित पवार यांच्या पक्षात मोठ्या नेत्याने प्रवेश केला आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. जिल्हास्तरावर वर्चस्व स्थापित करण्यासाठी राजकीय पक्षांनी चंग बांधल्याने स्थानिक पातळीवरील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यापासून पक्षांतराचे पेव फुटले आहे. आपल्या पक्षात तिकीट म
Nov 16, 20252 min read


मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत डॉ. योगेश क्षिरसागरांचा भाजपात प्रवेश
छ.संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच 2012 च्या बीड नगरपालिका निवडणुकीत शुन्य आणि 2017 च्या निवडणुकीत 50 पैकी एक जागा जिंकणार्या भाजपला त्यावेळेसच्या निवडणुकीत दुर ठेवूनच महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये तयारी सुरु केली होती. त्यामुळे स्वबळावर लढण्याचा नारा देण्याशिवाय पक्षासमोर पर्याय नव्हता. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा देऊन भाज
Nov 16, 20252 min read


संगमनेरमध्ये निवडणूक आयोगाने जप्त केलेली एक कोटी रक्कम कोणाची? कंन्स्ट्रक्शन कंपनीची असल्याचे आले समोर
संगमनेर(अहिल्यानगर) : संगमनेर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या प्रवेशद्वारावर आढळलेल्या एक कोटींच्या रोकड प्रकरणाचा मोठा खुलासा झाला आहे. खांडगाव फाटा येथे शनिवारी दुपारी निवडणूक आयोगाच्या सर्वेक्षण पथकाने एका कारमधून तब्बल एक कोटींची रक्कम जप्त केली होती. या घटनेमुळे राजकीय खळबळ उडाली होती. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची धामधूम सुरू ओ. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करून काही ठिकाणी प्रचारालाही
Nov 16, 20251 min read


आरक्षणामुळे प्रस्थापित राज्यकर्त्यांचे धाबे दणाणले!अस्तित्वासाठी कार्यकर्त्यांना चिरडणार !!
महापालिका निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच प्रस्थापित राज्यकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत. पाण्याविना जशी माशांची तडफड होते तशीच काहीशी तडफड या प्रस्थापित राजकीय घराण्यांची होऊ लागली आहे. आपल्या तलावतील पाणी संपले असे समजताच या प्रस्थापित राज्यकर्त्यांनी शेजारी असलेल्या दुसऱ्यांच्या तलावात डुबकी मारून आपला राजकीय जीव वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या कार्यकर्त्याच्या आहेत असे सांगणारे हेच राजकीय नेते निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा कार्यकर्त
Nov 16, 20253 min read


निवडणुका या पारदर्शी आणि मोकळ्या पद्धतीने व्हाव्यात- शरद पवार
पुणे : बिहार निवडणुकीमध्ये महायुतील प्रचंड बहुमत मिळाले. तर विरोधकांचा सुपडासाफ झाला आहे. निवडणुकांच्या निकालाबाबत विविध पातळ्यांवर वेगवेगळे विश्लषण केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील बिहार निवडणुकांच्या निकालाबाबत आपले मत मांडले आहे. माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, बिहार निवडणुकीच्या मतदानानंतर मी काही लोकांशी बोललो होतो. त्या लोकांकडून मला असं फीडबॅक मिळाला की या निवडणुकीचे मतदान हे महिलांनी हातात घेतले होते. महिलां
Nov 15, 20252 min read


बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न?,...तर जित कर हारने वालों को..
बिहार विधानसभेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मात्र, रात्री उशीरा अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला असून 89 जागांवर विजय त्यांनी मिळवला आहे. तर, त्यांचा मित्र पक्ष जेडीयू हा केवळ चार जागांनी त्यांच्या मागे आहे. जेडीयू ला 85 जागांवर विजय मिळवता आला आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षांचा सुफडासाफ झाला असून तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला 25 तर, काँग्रेसला 6 जागांवर विजय मिळवता आला आहे. विशेष म्हणजे भाजपसोबत असलेल्या चिराग
Nov 15, 20252 min read


बिहार निवडणुक निकालाचे पडसाद : अखेर काँग्रेसची शरद पवार, उद्धव ठाकर गटाशी फारकत, ..मुंबई महापालिका स्वबळावर लढणार !
बिहार निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. ज्या जागा निवडून आल्या. त्यासाठी मोठी कसरत आणि संघर्ष करावा लागला. आता या पराभवावर सकाळी सकाळी दिल्लीत बैठक घेत काँग्रेसने मंथन केले आणि महाराष्ट्रात त्याचे धक्के जाणवायला लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला पहिला मोठा झटका दिला आहे. हा बिहार निवडणुकीचा साईड इफेक्ट तर नाही ना अशी चर्चा रंगली आहे. काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्योच काँग्रेस प्रभारी
Nov 15, 20252 min read


जरांगे पाटील हत्या कट प्रकरण: दोघांचीही नार्कोटेस्ट करा- आमदार सोळंके
बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची हत्येचा कट रचल्या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांनीच हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी केलेल्या नार्कोटेस्टच्या मागणीला जरांगे पाटलांकडून नार्कोटेस्टचेच प्रत्यूतर देण्यात आल्याने वाद शिगेला पेटला असतानाच आता आमदार प्रकाश सोळंके यांनी दोघांचीही नार्कोटेस्ट करा अशी मागणी केली आहे. जरांगे पाटलांनी हत्येचा कट रचल्याचा आरोप करताच धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेतून ब्रेन
Nov 15, 20251 min read


दिल्ली पाठोपाठ जम्मु-काश्मीर हादरलेनौगामा पोलिस ठाण्यात भीषण स्फोट, दोन पोलिस अधिकार्यांसह नऊ जणांचा मृत्यू
श्रीनगर : दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील स्फोटाची घटना ताजी असतानाच जम्मू- काश्मीरमध्ये देखील स्फोटाची भयंकर घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री श्रीनगरच्या नौगामा पोलिस ठाण्यात भीषण स्फोटाची घटना घडली आहे. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. पोलिस ठाण्यामध्ये उपस्थित असलेल्या 2 पोलिस अधिकार्यांसह 9 जणांचा या स्फोटामध्ये मृत्यू झाला. तर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नौगामा पोलिस ठाण्यामध्ये शुक्रवारी रात्री 11:30
Nov 15, 20251 min read


जरांगे पाटील हत्या कट प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी
जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी मोठी माहिती समोर आल आहे. जरांगे पाटील यांच्या घातपाताचा कट रचल्या प्रकरणातील आरोपींची पोलिस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अमोल खुणे, दादा गरुड, कांचन साळवीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जरांगे पाटील हत्ये कटप्रकरणातील आरोपींना आज जालन्यातील अंबड प्रथमवर्ग न्याय दंडाधिकार्यांच्या कोर्टात पोलिसांनी आज हजर केले होते. यावेळी न्यायालयानं त्यांना पोलिस कोठडीत
Nov 14, 20252 min read


बिहारमध्ये भाजपला बंपर यश; दिल्लीत हालचालींना वेग विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी!
नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं दमदार कामगिरी केली आहे. एनडीएकडे 200 पेक्षा अधिक जागांवर आघाडी आहे. बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती होना दिसत आहे. विरोधकांचा दारुण पराभव झाला आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता दिसेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपच्या दोन शिलेदारांनी बिहारमध्ये विरोधकांचा अक्षरश: धुव्वा उडवला आहे. बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची जोडी सुपरहिट ठरली. मोदींनी त्यांच्या भाषणातून जंगलराजवरून लालू प्रसाद या
Nov 14, 20251 min read


निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजप सत्ता स्थापन करेल! - कुणाल कामरा
बिहार विधानसभा निवडुणुक 2025 च्या महासंग्रामाचा निकाल लागत आहे. सुरुवातील जे कल हाती आले, त्यानुसार एनडीएची वाटचाल आता 206 जागाच्या दिशेने सुरू आल्याचे पाहायला मिळत आहे. तर महागठबंधन अवघ्या 30 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. यानंतर आता विरोधकांकडून एनडीए, भाजपा आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली जात आहे. स्टँड अप कॉमेडियन कुणार कामरा याने निवडणूक आयुक्तांवर निशाणा साधला. आम आदमी पक्षाचे नेते संयज सिंह यांनीही निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. भाजपाने आता निवडणूक आयोगाचे मुख
Nov 14, 20251 min read


15 लाखाची लाच घेताना लिपिक एसीबीच्या जाळ्यात, न्यायाधीशही अडकले
माझगाव: दिवाणी सत्र न्यायालयातल्या लिपिकाने 15 लाखा रुपयांची लाच स्वीकारली. याशिवा लिपिकानं अतिरिक्त सत्र न्यायाधिशांना कॉल करून रक्कम स्वीकारु का विचालं त्यावर न्यायाधीशांनी देखील संमती दिली. यामुळे आता लिपिकासह न्यायाधीशांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिपिकासह न्यायाधीश लाच प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लिपिक चंद्रकांत हनमंत वासुदेव याला 15 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली. तक्रारदाराच्या
Nov 13, 20251 min read
bottom of page