top of page


सोनम वांगचुकांच्या विरोधात पोलिसांचा वापर, ...तरी देशातील विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाणार नाही.
नवी दिल्ली: पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतील जंतरमंतरवरून पोलिसांनी बळजबरीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वांगचुक यांच्या विरोधात केलेल्या बळाच्या वापरानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, “ सोनम वांगचुक जी हे अहिंसक उपोषणावर असताना त्यांना जंतर मंतरवरून हटवणे ही चुकीची कृती आहे” वांगचुक यांच्या अटकेचा निशेध करून राहुल गांधी यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवर आणि विद
Jul 201 min read


रुग्णालयातूनच सोनम वांगचुक यांनी वाढवलं मोदी सरकारचं टेन्शन?
नवी दिल्ली: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी (18 जुलै) दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवरील आंदोलन स्थळावरून जबरदस्ती उचलून सफदजंग रुग्णालयात दाखल केलं. त्यांना रुग्णालयात नेल्यानंतर अभिजीत दिपकेंनी उपोशण सुरू केलं आहे. त्यामुळे 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्यात येणार होता तो पुढे एकलला जाणार की काय? असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता खुद्द सोनम वांगचुक यांची पत्नी, गीतांजली आंगमो यांच्यामार्फत रुग्णालयातून आंदोलकांसाठी खास संदेश पाठवला आहे. यामध्ये त्यांनी 20
Jul 202 min read


‘ मी अंधभक्त नाही, देशभक्त आहे’ सोनम वांगचुक, अभिजीत दिपकेंच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंचे मुंबईत आंदोलन
मुंबई: शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आज मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नेते सहभागी होते. सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ आयोजीत आंदोलनामध्ये पक्षकार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकही सहभागी झाले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. नीटपेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या वतिने सोनम व
Jul 192 min read


अभिजीत दिपके यांच्या संसदेवरील मोर्चाला दिल्ली पोलिसांची परवानगी नाही!परवानी मिळो ना मिळो मोर्चा होणारच - अभिजीत दिपके; उद्धव ठाकरे उद्या दिल्लीला रवाना
नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी 20 जूनपासून नीट पेपरफुटीविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू केलेले आहे. अशातच आता दिपके यांनी 20 जुलै रोजी संसद चलो मोर्चाचे आयोजन केले आहे. यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी जंतरमंतर येथे जमावे असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी अशा कोणत्याही मोर्चासाठी परवानगी मागण्यात आलेली नाही, ना ती देण्यात आली आहे, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे या मोर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. सोमवारी संसदेच्या पा
Jul 192 min read


सोनम वांगचुक यांना दिलासा नाहीच! हायकोर्टानं याचिका फेटाळली
नवी दिल्ली : गेल्या तिन आठवड्यापासून बेमुदत उपोषण करत असलेल्या सोनम वांगचुक यांच्या पत्नीने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. सोनम वांगचुक यांंना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. न्यायालयानं त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. वांगचुक यांची ढासळती प्रकृती पाहता त्यांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय योग्य होता, असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. उपचारांबद्दलचे सगळे वैद्यकीय निर्णय डॉक्टरांचं पथक सोनम वांगचुक यांच्या सहमती
Jul 191 min read


अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा; आई - वडिलांनी सरकारला सुनावले
आज सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 21 वा दिवस होता. पहाटेच पोलिस जंतरमंतरवर दाखल झाले. त्यांनी तातडीने वांगचुक यांना उचलून रुग्णालयात उपचारासाठी नेले . यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला. मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केला, तर आंदोलनप थांबणार नसल्याचा इशारा देत त्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली. अभिजीत दीपके यांच्या या निर्णयानंतर त्यांच्या आई-वडीलांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. नीट परीक्षे
Jul 182 min read


दिल्ली पोलिसांची कारवई; सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरुन रुग्णालयात हलवलं; अभिजीत दिपके यांचे गंभीर आरोप
नवी दिल्ली : गेल्या 20 दिवसांपासून बेमूदत उपोषणावर असलेले कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलनस्थळावरुन उचलून घेऊन गेल्याचं समोर आलं आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केल्याचं पोलिसांच म्हणणं आहे. आता कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल मोठी माहिती दिली आहे. बेदमुदत उपोषणावर असलेले कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आलं आहे. दिल्ली पोलिस जंतर-मंतरवर कठो
Jul 182 min read


मुंबईत बिल्डिंगच्या 16 मजल्यावरून क्रेन कोसळली,24 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
मुंबई: मुंबईतील मीरा रोड परिसरात गुरुवारी (दि.16) धक्कादायक घटना घडली आहे. मिरारोडच्या जेपी नौर्थ कॉम्प्लेक्समध्ये एका बांधकाम साईच्या 11 व्या मजल्यारील क्रेन अचानक कोसळून खाली उभ्या वाहनांवर पडली. या अपघातात वाहनांचा चक्काचूर झाला. क्रेनच्या ढिगार्याखाली एक जण आडकून गंभीर जखमी झाला. तर एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मीरारोडच्या विनय नगर येथील जेके आयरीस बिल्डिंगच्या बाजूला नव्या बिल्डिंगचे बांधकाम सुरू ह
Jul 181 min read


पुण्याच्या श्रावणी कुदळे हिचा नीट परीक्षेत ट्रीपल विक्रम, मुलींमध्ये देशात पहिली बारामतीच्या नावे नवा रेकॉर्ड
पुणे: नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या नीट यूजीचा निकाल जाहीर झाला आहे. नीट परीक्षेत पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाची पानशुल बन्सल यांनी 720 पैकी 715 गुण मिळवून संयुक्तपणे देशात अव्वल स्थान पटकवले आहे. या नीट परीक्षेत पुण्याच्या श्रावणी कुदळेने ट्रीपल रेकॉर्ड केला आहे. श्रावणी देशात मुलींमध्ये पहिली आहे. बारामतीत राहणार्या श्रावणीने बारामतीच्या नावे नवा विक्रम रचला आहे. पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील श्रावणी कुदळे नीट परीक्षेत देशात पाचवी तर मुलींमध्ये पहिली आली आहे. तर म
Jul 171 min read


महायुती सरकारचा ‘ लाडक्या बहीणींना’ आणखी धक्का; ‘मोफत साडी’योजना बंद
मुंबई: महायुती सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी अनेक लोप्रिय योजना सुरू केल्या होत्या. मात्र, सत्तेवर येताच त्यांनी या योजनांमध्ये अटी-शर्तीच्या आडून मोठी कपात करायला सुरूवात केल्याचं दिसत आहे. त्याचं मोठं उदाहरण म्हणजे नुकतंच सरकारने बहुचर्चित ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ तून तब्बल 92 महिलांची नावे वगळली आहेत. या निर्णयामफॅळे राज्यातील लाखो महिलांना मोठा धक्का बसला होता, या धक्क्यातून त्या सावरत नाहीत तोच आता राज्य सरकारने महिलांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. सरकारने आत
Jul 172 min read


खासदार सुप्रिया दिल्लीच्या जंतरमंतरवर सोनम वांगचुक यांच्या भेटीला
संसदेत आवाज उठवण्याची ग्वाही, उपोषण मागे घेण्याची विनंती नवी दिल्ली:दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 20 वा दिवस आहे. सोनम वांगचुक यांचे 9 किलो वजन घटले असून प्रकृती अत्यंत खालवली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या वतिने सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास देशभरातून सिने कलाकार, सामाजिक कार्यकर्त्यांसह विरोधीपक्ष, संघटनांचा पाठिबा वाढत आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर करत देशभरातील विरो
Jul 172 min read


महाराष्ट्रातील शेतकर्यांना महायुती सरकारचे दुहेरी गिप्ट ; कर्जमाफीनंतर आता थकीत वीजबिलंही माफ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई: राज्यातील शेतकर्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणखी एक मोठी घोषणा केली. राज्यातील शेतकर्यांची तब्बल 48 हजर कोटी रुपयांची थकीत वीजबिले माफ करण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे. भाजप प्रदेश समितीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज (दि.15) सत्कार आयोजीत करण्यात आला होता. यावेळी फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली. यावेळी ते म्हणाले , “ शेतकर्यांची पाटी पूर्णपणे कोरी झाली पाहिज
Jul 151 min read


सोनम वांगचुक यांचे 18 व्या दिवशीही उपोषण सुरूच, दोन दिवसात जीवाला धोक्याची शक्यता! दिल्ली हायकोर्टाने दिले केंद्र,आणि दिल्ली सरकारला उत्तर देण्याचे निर्देश
नवी दिल्ली: गेल्या 17 दिवसांपासून जंतरमंतरवर उपोषण करत असलेल्या पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत चालली आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला नोटिस धाडली आहे. दोन्ही सरकारांना उत्तर देण्यासाठी बुधवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोनम वांगचुक यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती दिवसागणिक खालावत चालली आहे. त्यांचं वजन 8 किलोनं घटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल क
Jul 152 min read


मुंबईतील शालिमार आणि नूर मोहोम्मद हॉटेलच्या किचनमध्ये अस्वच्छता तुकाराम मुंढेची भेंडीबाजारात मोठी कारवाई; हॉटेलचे परवाने रद्द, आहिल्यानगरमध्ये मावा बनवणार्या कारखान्यांवर छापा
मुंबई: राज्यभरात प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात धडक मोहिम राबवणार्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेल्सवर मोठी कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा नियमांचे उल्ंघन करणार्या हॉटेल- रेस्टॉरंटचे अन्न सुरक्षा परवाने रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईत प्रसिद्ध रेस्टॉरंटचाही समावेश असल्याने या कारवाईसाठी मोठी चर्चा सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने सेफ फूड, सेफ महाराष्ट्र या
Jul 142 min read


मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट, खरिप पेरणीचा वेग मंदावला! पावसाची दडी, शेतकरी हवालदील; 65 % पेरणी, लाखमोलाचं बी-बीयाणं मातीत?
बीड : मराठवाड्यात यंदाच्या खरिप हंगामातील परेणीची स्थिती दिवसें दिवस अधिक चिंताजनक बनत आहे. जुलै महिना अर्धा संपवत आला असतानाही विभागात केवळ 65 % पेरणी पूर्ण झाली आहे. पवावसाच्या दीर्घ खंडामुळे अनेक भागांत शेतकरी अद्याप पेरणीयोग्य पावसाच्या प्रतिक्षेत आहेत, तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकटही निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी याच दिवशी 45.58 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा मात्र केवळ 32.15 लाख हेक्टर क्षेतावर झाली आहे. सर्वाधिक पेरणी नांदेड जिल्ह्यात 78%
Jul 143 min read


सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाचा आज 16 व्वा दिवस: प्रकृती खालावली , 7 किलो वजन घटले ; दिल्लीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला शिवसेनेचा पूर्ण पाठींबा- उद्धव ठाकरे
नवी दिल्ली/मुंबई : पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे सोमवारी (दि.16) व्या दिवशी बेमुदत उपोषण सुरूच असून, त्यांची प्रकृती खालवली आहे. उपोषण सुरू झाल्यापासून त्यांचे वजन 7.8 किलोने घटले आहे. रक्तदाबही कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दिल्लीत जंतरमंतरवर सुरू असलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ च्या वतिने सोनम वांगचुक यांच्यासह सर्व आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतिने पूर्ण पाठींबा जाहीर करत देशभरातील राजकीय पक्षांना समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याचे आवाहन उद्धव ठाकरे
Jul 132 min read


मद्रास उच्च न्यायालयाच्या गोवंश हत्या बंदी आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
नवी दिल्ली: तामिळनाडूमध्ये गोवंश हत्येवर पूर्णपणे बंदी घालण्याचा मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. गोवंश हत्या हा इस्लाम धर्मातील अत्यावश्यक धार्मिक प्रथेचा भाग नसल्याचं नमूद करीत बकरी ईद किंवा इतर कोणत्याही दिवशी तमिळनाडूमध्ये गाय किंवा वासरांच्या कत्तलीवर पूर्ण बंदी घालण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने 27 मे रेाजी दिला होता. या आदेशाला तमिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत
Jul 131 min read


बीडमधील ज्ञाणेश्वर वाकडे हत्या प्रकरण: सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा, 5 आरोपी गजाआड आरोंपींना आश्रय देणार्यांवर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
अंबाजोगाई: तालुक्यातील घाटनांदूर येथे एका तरुणाची चाकू भोसकून आणि डोक्यात वीट मारून निर्घृण हत्या करण्यात आली. ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे (वय २१, रा. पट्टीवडगाव) असे या मृत तरुणाचे नाव आहे. क्षुल्लक वादातून आणि सोशल मीडियावरील वर्चस्वाच्या रागातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, पळून जाण्याच्या प्रयत्नात एका आरोपीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. दरम्यान, आरोपींना आश्रय देणाऱ्या मंगल कार्यालय मालक आणि व्यवस्थापकावर मुख्य आरोपी म्
Jul 132 min read


राऊत कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ; दोघांना अटक भोंदूबाबाला मध्यरात्रीच उचललं, गिरीजा राऊत यांचे गंभीर आरोप
माजी खासदार विनायक राऊत त्यांच्या कुटुंबीयांविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणात नवे वळण आले आहे. या प्रकरणात आता दोघांना अटक करण्यात आली असून, त्यातील एका भोंदू बाबाला मध्यरात्री उचलण्यात आले आहे. यामुळे राऊत कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी राऊत कुटुंबीयांशी वारंवार संपर्क साधण्याच प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांच्या कोणत्याही संपर्काला राऊत कुटुंबाकडून प्रतिसाद मिळाला नाही, असा पोलिसांचा दावा आहे. सूनेच्या तक्
Jul 131 min read


सासवड- जेजूरी मार्गावर पालखी सोहळ्यतील वारकर्यांचा भीषण अपघात; ट्रकची धडक बसून तिन वारकरी महिलांचा दुर्दैवी मृत्यू उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची रुग्णालयास भेट ,प्रशासनाला अवश्यक सूचना
जेजुरी : संत ज्ञाणेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान सोमवारी (दि.13 जुलै) सकाळी सासवड- जेजुरी मार्गावर वारकर्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिला वारकर्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर चार महिला वारकरी जखमी झाल्या आहेत. सासवड येथील मुक्कामानंतर सोमवारी (दि.13) सकाही माऊलींचा पालखी सोहळ्याने जेजुरीकडे प्रस्थान करण्याच्या तयारीत असतानाच हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या 4 महिलांना तातडीने जेजूरी येथील आयसीयू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर वैद्य
Jul 132 min read
bottom of page