top of page


संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्राम; शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांचा तडखाफडकी माघार !
छ. संभाजीनगर : महापालिका रणधुमाळीत छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युतीमध्ये मोठी ठिणगी पडली आहे. जागावाटपाच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या असंतोषामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी थेट निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जंजाळ यांनी घेतलेला हा पवित्रा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. सोमवारी दुपारी शिवसेनेच्या प्रचार कार्यालय
Dec 29, 20252 min read


छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर
छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने (अजित पवार) 18 उमेदवारांची पहिली यादी रविवारी (दि.28) जाहीर केली. पुढील दोन दिवसांत आणखी दोन याद्या जाहीर होतील, अशी माहिती पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी दिली. सत्तेत एकत्र व महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने (अजित पवार) महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेना व भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला. शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी 18 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात काही माजी नगरसेवकांचा
Dec 29, 20251 min read


मुंबई महापालिकेत काँग्रेस- वंचित युती; वंचित 62 जागा लढवणार!
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या युतरीची रविवारी घोषणा झाली. मुंबई 227 जागांपैकी वंचित 62 जागा लढणार आहे. तर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला 10 च्या आसपास जागा सोडून काँग्रेस 150 च्या आसापास जागा लढवणार आहे. राज्यातील इतर 28 महापालिकेतील आघाडी संदर्भात स्थानिक पातळीवर सकारात्मक निर्णय घेतला जाणार असून तसे अधिकार दोन्ही पक्षाने स्थानिक पातळीवर दिले आहेत. काँग्रेसचे मुख्यालय असेलल्या टिळक भवन मध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपक
Dec 29, 20251 min read


कोल्हापूरात महविकास आघाडीत फूट; राष्ट्रवादी (श.प)बाहेर पडणार !
कोल्हापुर : राज्यातील महाविकास आघाडी बनली त्याच कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी फुटली आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतून बाहेर पडणार आहे. समाधानकारक जागा न मिळाल्याने राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आता आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांची तिसरी आघाडी निर्माण झाली आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवेसना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून एकम झालं आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्
Dec 27, 20251 min read


दोन्ही राष्ट्रवादीचं घडण्यापूर्वीच बिनसलं, युती फिस्कटली ?
पुणे: मागील बर्याच दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी आगामी महापालिका निवडणुका सोबत लढवणार असल्याच्या चर्चा होत्या. शरदचंद्र पवार पक्षाच्या वतिने शुक्रवारी अंकुश काकडे, बापू पठारे, प्रकाश म्हस्के आणि विशाल तांबे यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाच्या पुणे अध्यक्षांची भेट घेतली. मात्र या चर्चेतून काही समोर आलेलं नाही. उलट ही युती फिस्कटली असल्याचं सांगितल जात आहे याला अजित पवारांनी केलेल्या मागणीचं करण दिल आहे. पुण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत
Dec 27, 20251 min read


अजित पवारांना होम पिचवरच रोखण्यासाठी भाजपने रणनीती आखली!
पिंपरी-चिंचवड : भाजपाने पुण्याबरोबर आता पिंपरी चिंचवड महापालिका जिंकण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. 128 जागांसाइी पिंपरी- चिंचवड महापालिकेची निवडणूक होत आहे. अर्ज भरण्यासाठी धामधूम सुरू असतानाच भाजपाचे आमदार शंकर जगताप यांनी भाजपा 125 जागा जिंकणार, तर अजित पवारांना 3 जागा मिळतील असा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार) नेते राहुल कलाटे यांनी ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपची ताकद आणखी वाढली आहे. दुसरीकडे हा अजित पवारांच्या राष
Dec 27, 20251 min read


पुण्यात शिंदेसेनेच्या बैठकीत राडा; शहरप्रमुख नाना भानगिरे रागात बाहेर पडले
पुणे: पुणे महापालिका निवडणुकीमध्ये शिंदेसेनेला सोबत घेण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. मात्र शिंदेसेनेला जागा देण्याबद्दलच्या मुद्यावरून संघर्ष सुरू झाला आहे. शिंदेसेनेच्या नेत्या निलम गोर्हे यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी धरणे दिले होते. त्यानंतर आता शिंदेसेनेच्या दोन नेत्यांमध्येच बैठक सुरू असताना राडा झाला. यानंतर शिंदेसेनेचे पुणे शरप्रमुख नाना भानगिरे रागारागात निघून गेले. त्यामुळे शिंदेसेनेत जागांवरून खदखद असल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपान
Dec 27, 20252 min read


वादावादी करून पक्षाच्या बाहेर पडलो नाही, भाजपला टक्कर कोणी देऊ शकतो तर काँग्रेसच आहे; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
मुंबई: अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेससोबत आघाडीला विरोध करत पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप राष्ट्रवदी काँग्रेस (शदरचंद्र पवार) पक्षातून बाहेर पडले. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप यांना काही पक्षातून ऑफर आल्या. मात्र, त्यांनी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यानंतर जगताप यांनी भूूमिका मांडली. मुंबईतील टिळक भवनामध्ये प्रशांत जगताप यांचा पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार, विजय वडेट्टीवार
Dec 26, 20251 min read


मुख्यमंत्र्यांची टीका अन् संभाजीनगरमध्ये शिवसेना (उबाठा) ची रॅली रशीद मामू ठाकरेंनी बाजू पलटवली, निवडणुकी आधीच वातावरण तापले!
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकी आधीच वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. रशीद मामुंच्या भुमिकेची यामध्ये चांगलीच भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी रशीद मामू यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत आणि त्यातून मते मिळवायची आहेत, अशा शब्दात ठाकरे गटावर टीका केली होती. या टीकेनंतर उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये मोठी खेळी केली आहे. या खेळीमुळे संभाजीनगरच वातावरण आणखी तापण्याची शक्यता
Dec 26, 20252 min read


महाविकास आघाडी कायम, एकत्रित निवडणूक लढणार- जयंत पाटील
मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे चारच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज शुक्रवारी दुपारी मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली . त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. जयंत पाटील म्हण
Dec 26, 20251 min read


पुण्यात निलम गोर्हेंच्या घरासमोरच शिंदेसेनच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन भाजपाच्या म्हणण्यावर पक्ष चालणार का?; संतप्त शिंदेसेनच्या आंदोलकांचा सवाल
पुणे : महापालिका निवडणुकीत जागावाटपावरून महायुतीत नाराजी असल्याचे समोर आले आहे. इच्छुकांवर अन्याय होत असल्याचा आोप करत शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना नेत्या नीलम गोर्हे यांच्या घरासमारे गर्दी केली होती. शिंदेसेनेकडून भाजपाकडे 20 ते 25 जागांची मागणी केली आहे परंतु भाजपा इतक्या जागा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे शिंदेसेनेचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पुण्यातील गोखले रोड परिसरात गोर्हे यांच्या निवास्थानाबाहेर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नेत्यावर
Dec 26, 20252 min read


राजीनाम्यानंतर प्रशांत जगतापांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चाजगताप मुंबईकडे रवाना; काँग्रेसभवन येथे पक्षप्रवेश होणार?
पुणे : दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेनंतर नाराज झालेल्यामाजी महापौर तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाकडे आपला राजीनामा सोपवला आहे . हा राजीनामा सोपवताना प्रशांत जगताप यांनी आपण यंदा महापालिका निवडणुका लढणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसंच कोणता राजकीय पर्याृयी निवडायचा याबाबत देखील आपण लवकरच कळवणार असल्याचा देखील सांगितलं होतं. त्यानंतर गुरूवारी प्रशांत जगताप हे वेगळा राजकीय निर्णय घेणार असल्याचं सागितलं जात आहे. या
Dec 25, 20252 min read


महाराष्ट्राचे राजकारण युती,आघाडी व्हाया हाय होल्टेज ड्रामा
नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारण पक्षप्रवेश, युती, आघाड्यांनी ढवळून निघाले असतानाच आज पुन्हा नाशिकमध्ये हायहोल्टेज ड्रामा पहायला मिळाला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच मोठा राडा झाला. विरोध असताना भाजपने ‘त्या’ पाच जणांचा पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये मोठा गोंधळ पहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिमध्ये भारतीय जनता पार्टीतीलवाद चव्हाट्यावर आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी उद्धवसेनेला धक्का देण्याची रणनीती भाजपने आखले आहे. ठाकरे पक्षाच्या दोन बड
Dec 25, 20251 min read


..आता तुम्ही तुमचा स्वार्थ पहा, मराठी माणसांचं हित आम्ही पाहू - मंत्री संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर: ठाकरे बंधूच्या युतीची घोषणे नंंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, एवढ नव्हे तर भाजपकडूनही सावध पावित्रा घेत ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका टाळण्यात येत असतानाच आता शिंदे गटाकडून मात्र टीका केली जात आहे. मुंबईवर तीस वर्षे तुमचीच सत्ता होती. आडीच वर्षे राज्यात होती, त्यावेळेस कुठे गेला होता मराठी माणुस. आता तुम्ही तुमचा स्वार्थ पहा मराठी माणसाचं हित पाहण्यासाठी आम्ही आहेत अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री संजय शिरसाट यांनी केली
Dec 25, 20251 min read


ठाकरे बंधूच्या युतीची गाडी वसई विरारमध्ये अवघड वळणावर!
मुंबई: एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षांनी नुकतीच युतीची घोषणा केली आहे. त्याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बहुजन विकास आघाडीची वसई विरार माहापालिका निवडणुकीसाठी झालेली युती तुटली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर आणि नेते शिरीष चव्हाण यांनी ही माहिती दिली. जागा वाटप आणि चिन्हाच्या मुद्यावर या दोन्ही पक्षांचे एकमत न झाल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला
Dec 25, 20252 min read


अखेर ठाकरे बंधूचे मनमिल; संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अणि शिवसेना ठकारे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (दि.24) संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीच्या चर्चंना पूर्णविराम दिला. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसाठी शपथ घेत सूचक इशारा दिला. उद्धव ठाकरे म्हणाले “ संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली. तो जो मंगलकलश आणला गेला तो काही सत्यनारायणाच्या पूजेसारखा आणला नाही. त्याच्यामागे खूप मोठा संघर्ष झालेला आहे. 105,107
Dec 24, 20253 min read


ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला, उद्या जाहीर घोषणा ! खासदार संजय राऊत यांचा ट्विट संदेश
मुंबई: अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा अखेर मुहूर्त ठरला आहे. उद्या 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता पत्राकर परिषदेत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल असे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्विटवरून जाहीर केले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे, आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्यांची जागावाटपासंदर्भात बैठक झाली असून आता दोन्ही पक्षप्रमुख नेते एकत्र येणार आहेत. या दोन्ही नेत्यांकडून उद्या दुपारी ठाकरे बंधूंच्या युती आणि जागावाटपाची घोषणा केली जाऊ शकते
Dec 23, 20252 min read


पंतप्रधान मोदींचे दृष्टीकोन बरोबर नाहीत, हे संविधान नष्ट करण्याचे षडयंत्र - राहूल गांधी
नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर देशाच्या संस्थात्मक संरचनांचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. जर्मनीतील बर्लिन येथील हर्टी स्कूलमध्ये ‘ पॉलिटिक्स इज द आर्ट ऑफ लिसनिंग’ या विषयावर बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकार तपास यंत्रणांना राजकीय शस्त्रांमध्ये बदलत आहे. त्यांनी कडक शब्दांत टिप्पणी केली की, अंमलबजावणी संचनालाय (इडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) सारख्या संस्था निवडणुकपणे वापरल्या जातात, म्हणूनच भाजपविरुद्ध नाममात्र खटले आहेत आणि बहुतेक राजकीय खटल
Dec 23, 20252 min read


काँग्रेसचे नेते राहुल गांधी शंभर टक्के पंतप्रधान होणार!
नवीदिल्ली: माहाराष्ट्रात सध्या राजकीय धुराळा उडालेला आहे. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचे विधानसभा निवडणुकीसारखे निकाल लागले आहेत. भाजपचा वरचष्मा आहे तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपची मजबूत पकड, मगरमिठ्ठी विविध राजकीय संस्थांना पडत असल्याचे चित्र आहे. त्यातच नवीन वर्ष आले की भविष्यात काय होणार, याची चर्चा होतेच. अशीच एक चर्चा सध्या देशाचं लक्ष वेधून घेत आहे. काँग्रेसचे नेते आणि सध्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे 100 टक्के पंतप्रधान असा दावा एका ज्योतिषाने केला आहे
Dec 23, 20252 min read


ठाकरे बंधूच्या आधी काँग्रसने डाव साधला; काँग्रेस- वंचितची हातमिळवणी?,बीएमसीत तिहेरी लढतीचे संकेत
मुंबई: महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत आता मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे या ठाकरे बंधूंनी मुंबईत एकत्र लढण्याचे संकेत दिल्यामुळे महाविकास आघाडीत मोठी दरी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर काँग्रेसचे मुंबई प्रभारी रमेश चेन्निथला आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या एका वरिष्ठ शिष्टमंडळाने आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Dec 22, 20251 min read
bottom of page