top of page


शिवसेना शिंदे गटाकडून महापौरपदासाठी कोणताच प्रस्ताव आलेला नाही- मंत्री बावनकुळे
मुंबई: महानगरपालिकेच्या निवडणूकीनंतर महापौरपदावरुन राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असतानाही महासपौरपद कोणाकडे जाणार या बाबत अद्याप स्पष्टता नव्हती . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अडीच वर्षेे महापौरपद मिळणार, अशा चर्चांनी राजधानीत वातवरण तापले होते. मात्र आता या विषयावर भाजपकडून मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी “ बहुमत हे चंचल असतं, आज असतं उद्या नसतं” असे विधान करत मुंबईतील सत्तासमिकरण बदल
Jan 181 min read


राज्याच्या राजकारणात मोठा भुकंप?: मुंबईत शिवसेनेचं ‘ऑपरेशन टायगर’ , ठाकरे गटाचे दोन अंकी नगरसेवक नॉट रिचेबल; शिंदे गटाच्या संपर्कात!
मुंबई: महानगरपालीकेच्या निकालानंतर महापौरपदाचा संस्पेन्स कायम असताना एकनाथ शिंदे यांनी आपले विजयी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले आहेत. एकनाथ शिंदेना ‘ऑपरेशन लोटस’ की ‘मातोश्री’ची भीती अशा चर्चा होत असतानाच आता पुन्हा मोठ्या राजकीय उलथापालथची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना शिंदे गट ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत असल्याची चर्चा आहे. ठाकरे सेनेचे दोन अंकी नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान विरोधी बाकावर बसण्यास उदासिन असलेले नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्या
Jan 181 min read


मुंबईत 45 हजार शासकीय निवास्थाने बांधणार, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मुख्यालयासाठी भूखंड महापालिका निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई: राज्यातील 29 महापालिका निवडणुकीच निकाल लागले आहेत. त्यात बहुतांश महापालिका भारतीय जनता पार्टीनं वर्चस्व राखले आहे. या महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीत 10 मोठे निर्णय घेण्यात आले. त्यात सर्वात मोठा निर्णय म्हणजे मुंबईतील पोलीस दलातील अधिकारी, कर्मचार्यांसाठी 45 हजार शासकीय निवास्थाने बांधली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलिस हा
Jan 172 min read


अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसणासाठी जागेची चाचपणी!शिरुरची बाजारपेठ स्थिरावण्यासाठी व्यवसायिक कॉप्लेक्स उभारणार - मुख्याधिकारी दहिफळे
बीड : शिरुर कासार शहरातील वाढत्या रहदारीनुसार अवास्तव अतिक्रमणामुळे बाजारपेठेलाच स्थलांतराचे हादरे बसत आहेत. शहरची नावाजलेली बाजारपेठ स्थिरावण्यासाठी अतिक्रमणासह बाजारकरूंच्या मुलभूत सुविधांसाठी उपाययोजनांचा पर्यायासाठी नगरपंचातीचे मुख्याधिकारी गणेश दहिफळे यांनी शुक्रवारी (दि. 16) शहरातील अतिक्रमण हटवण्याच्या पहिल्या टप्यात प्रारंभ केला. लवकरच शहरातील मोकळ्या जागेत व्यवसायिक कॉम्पलेक्स उभारण्यासाठी जागेची चाचपणी करण्यात येणार असून बीओटी तत्वावर गाळे वाटपामध्ये अतिक्रमणधाराकां
Jan 172 min read


परांड्यात घरावर गुलाल उधळल्याचा जाब विचारल्याने राडा; 40 जणांच्या टोळक्याकडून दगडफेक, मारहाण वाहनांची तोडफोड
धाराशिव: परांड्यात घरावर गुलाल का उधळला, याचा जाब विचारल्यावरून 40 जणांच्या टोळक्याने एकास मारहाण करत घरांवर आणि वाहनांवर दगडफेक केली. या प्रकरणी परांडा पोलिस ठाण्यात तब्बल 40 जणांविरुद्ध इम्राण गणी कुरेशी (रा. कुर्हाड गल्ली, दर्गा रोड परंडा) यांच्या फिर्यादीवरून दंगल आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 14 जानेवारी 2026 रोजी रात्री. 8:30 वाजण्याच्या सुमारास परंडा शहरातील कुर्हाड गल्ली, दर्गा रोड भागत घडली. फिर्यादी इम्रान कुरेश
Jan 171 min read


मुंबईत महापौर कोण? मुख्यमंत्री फडणवीस देणार धक्का यांची नावे आघाडीवर
मुंबई: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अखेर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचा पराभव झाला. भाजप आणि शिवसेनेने बहुमताचा आकडा पार करत मुंबईची सत्ता काबीज केली. त्यानंतर आता मुंबईचा महापौर कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबईत भाजप सार्वात मोठा पक्ष ठरल्याने भाजपचाच महापौर होणार, हे स्पष्टच आहे. मुंबईतील ठाकरेंची 25 वर्षांपासूनची सत्ता उखडून टाकण्यात अखेर भाजपला यश आले आहे. भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर मित्रपक्ष अस
Jan 171 min read


प्रवीण दरेकरांनी उत्तरभारतीयांचे आभार मानले , नव्या वादाला तोंड फुटणार?
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईकरांचे आभार मानले आहे. “ भाजप मुंबई तोडणार नाही, तर जोडणार” अशी ग्वाही देत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. विशेषत: उत्तर भारतीय आणि हिंदीभाषक मतदारांनी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांना कृतज्ञता व्यक्त केली. प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरे
Jan 171 min read


महाराष्ट्र हादरला, एमपीएसी 2012 चे टॉपर वरिष्ठ जीएसटी अधिकारी कारमध्ये मृतअवस्थेत अढळले
बीड: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत 2012 साली राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेले आणि इंग्रजी व्याकरणाचे लेखक म्हणून ओळख असलेले राज्यकर अधिकारी सचिन नारायण जाधवर यांचा बीड जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हा मृत्यू हत्या की आत्महत्या याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलिस प्रशासानाकडून सखोल तपास सुरू आहे. अधिक माहिती अशी की, सचिन जाधवर यांच्या पत्नीने आज सकाळी ते रात्री घरी परत न आल्याने शिवाजीनगर
Jan 172 min read


महापालिका निवडणूकीत असुद्दीन ओवेसीच्या एमआयएमची मुसंडी 95 पेक्षा आधिक जागा ताब्यात ; छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 33 नगरसेवक
राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. या महापालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीने जबरदस्त कामगिरी केली आहे. मात्र, या निकालांमध्ये असुद्दीन औवेसी यांच्या एमआयएमच्या यशाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. राज्यातील महापालिकांच्या निकालांमध्ये 95 हून अधिक एमआयएमचे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यात मुंबईत 4 जागांवर एमआयएमचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात मानखुर्द- गोवंडी या भागात एमआयएमने समाजवादी पक्षाला मोठा धक्का दिला. त्यामुळे मुंबईत काँग्रेससह सपासाठी हा मोठा धक्का म
Jan 171 min read


भल्या-भल्यांना नाही जमलं, ते एका मुख्याधिकार्यांनी केलं अखेर शिरुर नगरपंचायतीचे अतिक्रमणावर बुडलडोझर; टप्प्या-टप्प्याने शहराचा श्वास मोकळा करणार!
बीड: शिरुर शहराच्या अतिक्रमणाचा विषय एवढा गंभीर होता की, भल्या,भल्यांनी अतिक्रमणाच्या कारवाईपुढे नांग्या टाकल्या. शहर विस्तारीकरणाच्या नावाखाली बाजारपेठेलाच पाय फुटले मात्र, कारवाईला कोणी धजावले नाही. मात्र, निर्भिड, निष्पक्ष, कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून लाभलेले नगरपंचायतीचे नायब तहसीलदार तथा सीओ गणेश दहिफळे यांनी कायद्यापुढे सर्व समान या न्यायाने शहरातील संभाजी चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर चालवले. शिरुर कासार शहराची बाजारपेठ तालुक्यासाठीच नव्हे तर परजिल्ह्यातही नावाजलेली आहे.
Jan 162 min read


महापालिकेतही ‘भाजप’च बाहूबली: मुंबई ठाकरेंच्या हातून निसटली, महापालिकेवर महायुतीची सत्ता
मुुंबई: महापालिका (इचउ) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव झाला आहे. मागील 25 वर्षे सत्तेत बसलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई मकहापालिका निवडणुकीत भाजप (88) शिवसेना - णइढ (73), शिवसेना शिंदे गट (29) काँग्रेस 18 आणि मनसे (10) जागांवर आघाडीवंर आहे. इचउ चा निकाल हा भाजप-शिवसेना (शिंदे) महायुतीच्या बाजूने लागल्याने उद्धव ठाकरेंना गड राखण्यात अपयश आलं आहे. मुंबईतील ‘ मराठी माणुस’ हा मुद्दा ठकारेंनी उचलून
Jan 164 min read


मतदनापूर्वी नवी मुंबईत पाचशे च्या नोटांनी भरलेली बॅग आढळली खारघरमधील प्रकार, पाकीटामध्ये भरलेल्या अढळल्या पाचशेच्या नोटा
मुबई: निवडणुक हा लोकशाहीचा उत्सव आहे, याच लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट लावण्याचे महापात महापालिका निवडणुकीत घडत असल्याचे आनेक उदाहरणं समोर येत आहेत. राज्यातील 29 महापालिका निवडणुक मतदनाला काही तास आवधी उरला आहे. नामनिर्देशनपत्र सादर करण्यापासून मागे घेण्याची प्रक्रिया असो वा प्रचार या सगळ्या प्रक्रियेत नियमांची ऐशी तैशी दिसून आली. अगदी जाहिर प्रचारातून आरोप- प्रत्यारोपांसह उमेदवारांच्या भाषेची ढासळलेली पातळी. पण आता त्याहूनही भयंकर कृत्य समोर येत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडण
Jan 141 min read


भारतीय पासपोर्टची ताकद वाढली! आंतरराष्ट्रीय प्रवास सोपा होणार 55 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
नवी दिल्ली: हन्ले पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार, जागतिक स्तरावर पासपोर्टच्या शक्तीमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. या वर्षी आशियाई देशांचे वर्चस्व कायम आहे. सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली राहिला आहे, जो 192 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास करण्याची परवानगी देतो. त्यानंतर जपान आणि दक्षिण कोरिया (188 देशांसह) आहेत. संयुक्त अरब अमिराती या वर्षी विशेषत: प्रमुख आहे. पाचव्या स्थानावर पोहोचले आहे. भारताच्या पासपोर्ट रँकिंगमध्येही सुधारणा झाली आहे. भारताने पाच स्थानांनी प्रगती
Jan 141 min read


मतदानापूर्वीच धुळ्यात बोगस मतदान कार्डाचा साठा सापडला रस्त्याच्या बाजूला हजारो बोगस मतदान कार्ड अढळले; राज्यभरात खळबळ
धुळे: महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच धुळे येथे हजारो बोगस मतदान कार्डाचा साठा आढळला आहे. यामुळे उमेदवारामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हा साठा कोणाच्या मुळावर आणण्यासाठी आणला होता. याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस याप्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. निवडणूक अयोगाच्या आचारसंहिता कक्षाच्या पथकाला प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत. धुळे शहरातील देवपूर भागात हजारो मतदान कार्ड बेवारस अवस्थेत सापडले आहेत. या घटनेची म
Jan 141 min read


बिनविरोध निवडी विराधातली याचिका हायकोर्टाने फेटाळली मनसेचे अविनाश जाधव यांना धक्का
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांना धक्का देणारा निर्णय कोर्टाने दिला आहे. राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकींच्या मतदान प्रक्रियेेला अवघे काही तास उरले आहेत. मतदानापूर्वीच महापालिकांमध्ये 60 पेक्षा जास्त नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. दरम्यान या बिनविरोध निवडीला अविाश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात अव्हान देणारी याचिका दाखल केली होती. मात्र, आज मा. न्यायालयाने अविनाश जाधव यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे दरम्यान वकील असीम सरोदे यांनी सकाळी
Jan 141 min read


बसस्थानकवरील प्रवासी सुविधांसाठी आंदोलनाचा इशारा शिवसेना (उबाठा) चे तालुका प्रमु, सोपान मोरे, उपजिल्हा प्रमुख अजिनाथ खेडकर आक्रमक
बीड: तालुका निर्मितीपासून उपाय योजनांच्या प्रतिक्षेत शिरुर कासारच्या बसस्थानकावरील प्रवासी सुविधांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख सोपान मोरे, उजजिल्हा प्रमुख अजिनाथ खेडकर यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिरुर कासार तालुका बसस्थानक गेल्या 25 वर्षापासून स्वच्छता, पाणी, विज यासह प्रवासी सुरक्षेच्या उपाय योजनांपासून दूर्लक्षीत आहे. बीड- अहिल्यानगर मार्गावर शिरुर कासारच्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या शिरुरच्या बसस्थानकास संभाव्य काळातील विकासाचा दृष्टी
Jan 142 min read


ठाकरे बंधूंचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप प्रचारानंतर मतदारांच्या गाठीभेटीवर आक्षेप; तीन प्रश्नांचे कोडे मुळात ही मुभा मिळाली का?, दिली का?, हा कायदा बदलला का?
मुंबई: राज्यात 29 महानगरपालिका निवडणूकीच्या मतदानासाठी अवघे काही तास उरले आहेत. काल सायंकाळी 5:00 जाहिर प्रचार थंडावला असला तरी निवडणूक अयोगाने अटी व शर्थी घालून उमेदवारांना प्रचार संपल्यानंतर मतदारांच्या गाठीभेटीची परवानगी दिली आहे. शिवाय मतदान प्रक्रियेमध्ये आता ईव्हिएम सोबतच ‘पाडू’ यूनिट मशिन कार्यान्वीत केली आहे. निवडणूक अयोगाच्या या निर्णया विरोधात संताप व्यक्त करत आज राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी तातडीच्या पत्रकार परिषदेतून निवडणूक अयोगावार गंभीर आरोपक केले. महापालिका मत
Jan 142 min read


निवडणुकीच्या आखाड्यात मुख्यमंत्री ठरले महायुतीसाठी ‘सुपरमॅन’ राज्यभरात 77 कार्यक्रमांना हाजेरी, 37 सभा, रोडशोचा उडवला धडाका
मुंबई: 15 जानेवारी रोजी होणार्या राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीची प्रचाराची रणधुमाळी अखेर शांत झाली आहे. गेल्या 2 आठवड्यांपासूनसुरू असलेल्या या धामधुमीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. या संपूर्ण प्रचार मोहिमेत सत्ताधारी महायुती आणि विशेषत: भारतीय जनता पार्टीचा प्रमुख चेहरा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा काना कोपरा पिंजून काढला. आता प्रचाराची सांगता झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या झंझावाती दौर्याची आकडेवारी समोर आली
Jan 132 min read


अण्णामलाईची लूंगी काढणार्यास लाखाचे बक्षीस! शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्याचे आव्हान, ‘ हटाव लूंगी, बजाव पुंगी’ ची घोषणा
मुंबई: भाजप नेते अण्णामलाई यांनी मुंबईमध्ये येऊन वादग्रस्त वक्तव्य केलं. मुंबई ही केवळ महाराष्ट्राचीच नसून हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. असं विधान केलं होतं. अण्णामलाईच्या याच वक्तव्यावरून ऐन महापालिका निवडणुकीच्या प्रचारात वाद उफाळला. यावरून ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी अण्णामलाईची लुंगी काढणार्याला तब्बल एक लाखांचं बक्षीस देण्यात येईल अशी घोषणाच केली आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर अण्णामलाई मुंबईत एक पाय ठेवण्याच्या प्रयत्न करशील तर तुझे दोन्ही पाय तोडण्यात येतील आणि
Jan 131 min read


बीडमधील त्या रक्तरंजीत हत्याकांडाचे गुड उलगडले; बालपणीच्या भांडणाचा बदला, तारुण्यात जीवानिशी घेतला !
बीड: शहरातील अंकुशनगर भागात मंगळवारी (दि.6) भरदुपारी नगरपालिकेतील कंत्राटी कर्मचारी हर्षद शिंदे याच्या निर्घुण हत्येने संपूर्ण शहर हादरले होते. नळ दूरुस्तीचं काम करणार्या हर्षद शिंदेवर पिस्टलमधून प्रथम गोळ्या झाडण्यात आल्या, नेम चुकल्याने हर्षदने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, आरोपीने त्याचा पाठलाग करत धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केले यातच हर्षदचा जागेवरच मृत्यू झाला. या थरारक हत्याकांडामागचं कारण अखेर समोर आलं आहे. नगरपालिका कंत्राटी कर्मचारी हर्षद शिंदे (वय 38) य
Jan 132 min read
bottom of page