top of page


धनंजय मुंडेचा मर्डर होणार होता, भय्यू महाराजांनी वाचवले!
आमदार रत्नाकर गुट्टेंचा खळबजनक दावा बीड: धनंजय मुंडेची हत्या झाली असती मात्र ते वाचले, रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी हा दावा केला आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी गंगाखेडमध्ये जाऊन रत्नाकर गुट्टेंवर सडकून केलेली टीका यास कारणीभूत ठरली आहे. याच टीकेला प्रत्यूत्तर देताना रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडेच्या हत्येबाबत खळबळजनक दावा केला आहे. धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी परळी येथे जाहीर सभेत आपल्याला राजकारणातूनच नाही तर जीवनातून संपवण्याच कट रचला जात असल्याचा आरोप केला होता
Dec 31 min read


मुख्यमंत्री फडणवीस शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांची भेट
मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची नुकतीच मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुक प्रचारात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या शिवाय काल मतदाना वेळी अनेक ठिकाणी राडा झाला. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उबाठा) चे नेते संजय राऊत यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. मु÷ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उबाठा) गटाचे नेते संजय राऊत यांची एका खासगी कार्यक्रमात त्यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये 20 निनिटं चर्चा झाली. या भ
Dec 32 min read


डॉ. गौरी गर्जे प्रकरण; वरळी पोलिसांनी अनंतच्या कथीत प्रेयसीचा जबाब नोंदवला
अनंतला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी, पॉलोग्राफी टेस्टची पोलिसांची कोर्टाकडे मागणी. मुंबई: डॉ. गौरी पालवे- गर्जे आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलीसांनी आता एफआरमध्ये नमूद अनंतर गर्जे यांच्या जुन्या प्रयसीचा जबाब नोंदवला आहे.वरळी पोलिसांनी हा जाबब नोंदवला आहे. त्यात काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे अनंत गर्जे याची पोलीस कोठडी संतप असताना त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे
Dec 22 min read


बुलढाण्यात आमदार पुत्रासह एकावर गुन्हा दाखल
बोगस मतदारास पळून लावले; कुणाल गायकवाड, श्रीकांत गायकवाड यांच्यावर शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा बुलढाणा: येथील शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड आणि नातेवाईक श्रीकांत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्थानिक नागरिकांनी पकडलेल्या बोगस मतदाराला पोलिसांच्या तावडीतून पळवून लावण्यास मतद केल्या प्रकरणी कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बुलढा
Dec 22 min read


राज्यातील मतदान प्रक्रियेत धक्कादायक प्रकार; ईव्हीएम मशीनच फोडल्या !
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडले. निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडला आहे. काही जिल्ह्यांमध्ये ईव्हीएम मशिन फोडल्या आहेत. ज्या केंद्रावर या मशीन फोडल्या आहेत तेथील मतदारांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. सर्वच मतदान केंद्रावर सुरक्षा वाढवण्यात आली. अकलुज नगरपालिका निवडणुक प्रभाग 7 मध्ये उमदवाराच्या नवन्याने ईव्हिएम मशिन फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदान करताना बटण दाबत नसल्याने उमेदवारा
Dec 21 min read


निवडणुक स्थगितीवरून लातूर कडकडीत बंद महाराष्ट्रात मतदानाच्या दिवशी पहिल्यांदाच घडलं, अमित देशमुखांचे भाजपवर गंभीर आरोप
लातूर: राज्यभरात नगर पंचायत, नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. पण, अनेक ठिकाणी बोगस मतदार आणि मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. तर लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषद निवडणूक ही भाजपच्या सांगण्यावरूनच स्थगित करण्यात आल्याचा आरोप काँग्रेससह इतर पक्षांनी केला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशीच निलंगा बंदची हाक देण्यात आली होती. ऐन मतदानाच्या दिवशी निलंगामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. आजच्य निलंगा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक व्यापार्यांनी आपली दुकानं, प्रतिष्ठानं बं
Dec 22 min read


सर्व नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरलाच!
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय नागपूर: राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल हे 21 डिसेंबर रोजी एकत्रित जाहीर करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे. त्यामुळं 3 डिसेंबर रोजी जाहीर होणारे निकाल आता 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. यापूर्वी राज्य निवडणूक अयोगानं जवळपास 24 ठिकाणच्या निवडणुका ऐनवेळी पुढे ढकलल्या होत्या. त्या निवडणुका या 20 डिसेंबर रोजी होणार आहेत. त्यामुळं आता आज 2 डिसेंबर रोजी होणारं मतदान आणि 20 डिसेंबर रोज
Dec 21 min read


राज्यात मतदानाला गालबोट, निकालाकडे लक्ष
महायुती, महाविकास आघडीतील घटक पक्षच आमने-सामने राज्यात नगरपालिका, नगरपरिषदांसाठी आज मतदान प्रक्रिया संपन्न झाली. कडाक्याच्या थंडीतही सकाळी 7:00 पासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. किरकोळ कारणावरून बहूतांश मतदान केंद्रावर वादाला तोंड फुटल्याचे दिसून आले. काही ठिकाणी महायुती तर काही ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षच आमने- समाने आल्याने मतदान केंद्राला संघर्षाचा वेढा पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. राज्यभरात महायुतीसह महाविकास आघाडीतील घटक आमने- सामने आल
Dec 24 min read


भाजपच्या सुडाचा कोकणात बदला?; आमदार निलेश राणे मध्यरात्रीच मालवण पोलिस ठाण्यात!
भाजपच्या देवगड तालुकाध्यक्षाच्या गाडीत अढळली रोकड; आमदार निलेश राणेंनी तडजोड उधळून लावल्याचा दावा मालवण: कोकणात भाजप आणि शिवसेना (शिंदे) गटात संघर्ष पेटल्याचे पहायला मिळत आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रकर्षाने दिसून येत आहे. मालवणमध्ये भाजप पदाधिकार्याच्या बेडरुमध्ये अचानक धाड टाकून लाखो रुपयांची रोकड पकडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदार निलेश राणे यांची ‘पक्षाला हिरा’ मिळाला अशी प्रशंसा केली. त्यानंतर मतदानाला आवघे काही तास शिल्लक असताना मंगळवारी (दि.1) मध्यर
Dec 22 min read


हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका
पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा; बिहाराचा निकाल येऊन खूप दिवस झाले! नवीदिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी बिहारच्या निकालांचा उल्लेख केला. अनेक पक्ष त्यांच्या पराभवामुळे नाराज आहेत. पीएम मोदी यांनी विरोधकांना पराभवाच्या निराशेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले. सोमवारपासून सुरू होणार्या अधिवेशनात सरकार 14 विधेयके सादर करू शकते असे मानले जात आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले “ मित्रांनो या अधिवेशाना संसद देशासाठी काय
Dec 11 min read


सांगोल्यात शिवसेना (शिंदे) गटातील माजी आमदाराच्या कार्यालयावर पथकाची धाड
माजी आमदार शहाजी बापू पाटील भाऊक; भाजपवर निशाना सोलापूर : शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर स्थनिक गुन्हे अन्वेशन आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने धाड टाकली. कार्यवाहीत रेकॉर्डिंग करण्यात आल्याची माहिती आहे. माजी आमदार शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. हेच नाही तर काल रात्री सांगोल्यातील आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाची तपासणी निवडणूक अधिकार्यांकडून करण्या
Dec 11 min read


निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला- मुख्यमंत्री फडणवीस
निवडणुका पुढे ढकलल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस संतापले मुंबई : राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यपदासाठीच्या निवडणुका न्यायालयाच्या कार्यवाहीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अयोगाने पुढे ढकलल्या आहेत. गेल्या पंधरवाड्यापासून ज्या ठिकाणी प्रचार जोरात होता, तिथे निवडणुका अचानक पुढे ढकलल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा उत्साह मंदावला आहे. ज्या भागांतील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, त्यांचा नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या ठिकाणी मतदान 20 डिसेंबर रोजी होईल आणि मतमोजणी 21 डिस
Dec 12 min read


पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील एफसी मुख्यालयावर दहशतवादी हल्ला
बलूचिस्तान : पाकिस्तान बलुचिस्तान प्रांतात दहशतवादी हल्ला झाला. नोक्कुंडी येथील फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वत:ला उडवून दिले. ज्यामध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांनी प्रत्यूत्तर म्हणून किमान तीन तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान दहशतवादी ठार झाले. रिको डिक आणि संदक खाण प्रकल्पांशी संबंधित परदशी तज्ञांच्या निवास्थानाच्या कंपाऊंडला लक्ष्य करण्यात आले. बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट नेही या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही घटना पाक
Dec 12 min read


अनगर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाची निवडणुक स्थगित
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश; उज्ज्वला थिटेंना अर्ज दाखल करता येणार नाही सोलापूर: राज्यभर चर्चेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश जारी केले आहेत. आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार आहे. यामुळे एकच चर्चा रंगली आहे. अनगर नगरपंचायतीत प्राजक्ता पाटील यांचा नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज राहिला आहे. त्या बिनविरोध झा
Dec 12 min read


नवी मुंबईतून अल्पवयीन एकून सहा मुली रहस्यमयरित्या गायब !
काल चार तर आणखी दोन मुली बेपत्ता, तुर्भे, एनआरएल पोलिस ठाणे हद्दीतील घटना मुंबई: शहरात अल्पवयीन मुली बेेपत्ता होण्याच्या घटनांनी चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. 28 नोव्हेंबर, शुक्रवारी तुर्भे आणि एनआरएल पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चार मुली बेपत्ता झाल्या होत्या. अद्याप त्यांचा शोध लागलेला नसतानाच पुन्हा दोन मुली रहस्यमयरित्या गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीया दंड संहितेच्या कलम 363 (अपहरण) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्
Nov 302 min read


पुण्यातील डॉक्टर महिलेचा खळबळजनक दाव्याचा व्हिडिओ; डॉ. गौरीनंतर माझा खून..
पुणे: पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेंची पत्नी डॉ. गौरी गर्जे-पालवे यांच्या आत्महत्यने राज्यभरात खळबळ उडाली. पतीचे अफेयर, सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून गौरीने आत्महत्या केली. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण चर्चेत असतानाच आता पुण्यामधून स्नेहल घुगे या डॉक्टर महिलेचा खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये डॉक्टर गौरी नंतर माझा बळी जाणार आहे असे म्हणत आपबिती सांगितली. डॉ. स्नेहल घुगे यांचे साडे तीन वर्षापूर्वी रविंद्र महादेव घुगे यांच्याशी लग्न झाले, ते जालन्यातील अंबडचे र
Nov 302 min read


दोन बसेसची समोरासमोर भीषण धडक ; 11 जणांचा मृत्यू 40 जण जखमी
तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यात झालेल्या भिषण रस्ते अपघातात 11 जणांचा मृत्यू तर 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दोन सरकारी बसेसची समोरासमोर टक्कर झाल्याने हा अपघात झाला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. अपघातानंतर बसच्या ढिगार्यात नऊ महिला आणि दोन पुरुष अडकलेले आढळले. ज्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तात्काळ कराईकुडी आणि तिरुपत्तूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक चालक आणि रहिवाशांनी तातडीने बचाव कार्यात मदत केली. मदुराईहून कराई
Nov 301 min read


राज्यातील 10 नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित प्रचारच्या शेवटच्या टप्प्यात निवडणूक अयोगाचा निर्णय
मुंबई: राज्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुका ऐनवेळी स्थगित करण्यात आल्या आहेत. प्रचाराची मुदत संपायला अवघे काही तास बाकी असताना राज्य निवडणुक आयोगाने हा महत्वाचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणुक प्रक्रियेबाबत दाखल झालेल्या याचिकेवर जिल्हा न्ययालयाचा निकाल येण्यासाठी वेळ लागणार असल्याचे स्पष्ट झाल्याने आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे बारामती, फलटण, महाबळेश्वर, अंबरनाथ, कोपरगावसह दहा नगरपरिषदांमध्ये मतदार आणि उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण
Nov 301 min read


संतोष देशमुख हत्या प्रकरणात धन्या मुंडेंना सहआरोपी करा - मनोज जरांगे
बीड: संतोषभैय्या देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणार्यांची आठवण धन्या मुंडेला येते, यावरून या हत्या प्रकरणात त्याचाही हात असल्याचे एकप्रकारे त्याने कबुली दिली आहे. अशा लोकांना अजित पवार आणि त्यांचा पक्ष पाठीशी घालतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याच्यावर कारवाई करत नाहीत. मग तुमचाही यात हात आहे का? अशी शंका उपस्थितीत होते. मराठा समाज शांत आहे, पण संतोषभैय्या देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. मराठ्यांच्या मनात ज्वालामुखीसारखी आग आहे. संतोषभ
Nov 302 min read


राजधानी दिल्लीत आग्नितांडव: चार मजली इमारतील भीषण आग 4 जणांचा होरपाळून मृत्यू अनेक जखमी
नवीदिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये 4 मजली इमारतीला भीषण आग लागल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीत 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री 6:30 च्या दरम्यान आगीचा भडका उडाला. इमरातीलच्या ग्राऊंड फ्लोअरला असणार्या शू शॉपला आग लागली. ही आग क्षणात पूर्ण इमारतीमध्ये पसरली अन् जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही तासात त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पण तोपर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला होता. राज
Nov 301 min read
bottom of page